क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे नाते तसे काही नवीन नाही. जेव्हा केव्हा कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीने पडद्यावर जादू दाखवली आहे, तेव्हा कोणी ना कोणी क्रिकेटपटू क्लीन बोल्ड नक्कीच झालेला आहे. क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या एक दोन नाही तर आपण अश्या कित्येक जोड्या पाहिल्या आहेत, जिथे अभिनेत्रींचे क्रिकेटपटुंवर मन आले आहे. मग ती जोडी शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतोडी असो किंवा मग विराट आणि अनुष्का शर्मा असो. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपले जीवनसाथी बनवले आहे. ह्याच लिस्ट मध्ये अजून एका जोडीचा समावेश होतो आणि ती जोडी म्हणजे युवराज सिंग आणि हेजल कीच ह्यांची. युवराज एक लोकप्रिय स्टार क्रिकेटर आहे तर हेजलने बॉलिवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री आहे. ह्या दोघांची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आणि मनोरंजक आहे. कपिल शर्माच्या शो मध्ये जेव्हा कपिलने युवराजला तुमची लव्हस्टोरी कशी सुरु झाली असे विचारले तेव्हा युवराजने दोघांची प्रेमकहाणी सांगितली. सोबतच हेजलने दोघांमधील गोष्टी सुद्धा शेअर केल्या. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला दोघांच्या अनोख्या प्रेम कहाणीचा आगळा वेगळा किस्सा सांगणार आहोत.
युवराज एक हँडसम क्रिकेटर आहे आणि मस्तीखोर सुद्धा. सोबतच युवराज भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज. लाखों मुलींच्या मनातील क्रश असलेल्या युवराजला हेजल इग्नोर करत होती. होय तुम्हाला विश्वास बसणार नाही, युवराज ने स्वतः सांगितले कि जेव्हा त्याची पहिल्यांदा हेजल सोबत भेट झाली तेव्हा त्याने तिच्यासमोर कॉफी प्यायचा प्रस्ताव ठेवला. हेजलने त्यावेळी तर होकार दिला, परंतु येण्याच्या वेळी फोन बंद केला. हेजल नेहमी युवराजपासून दूर असायची. आणि त्याचा फोन उचलत नव्हती. ह्यामुळे रागातच युवराजने तिचा नंबरच डिलीट केला होता. एक दिवस युवराज फेसबुक चालवत होता, तेव्हा त्याने हेजल आणि त्याच्यामध्ये एक कॉमन फ्रेंड पाहिला. युवराजने त्या मुलाला हेजलपासून लांब राहायला सांगितले. सोबत हे सुद्धा सांगितले कि, तो एक दिवस हेजल सोबत नक्कीच लग्न करेल. युवराज हेजलच्या प्रेमात वेडा झाला होता, परंतु हेजल सतत त्याला टाळत होती. एक दिवस युवराजने हेजलसमोर लग्नासाठी प्रस्ताव ठेवला. तेव्हा हेजलने सांगितले कि बघते.
युवराजने सांगितले कि, हेजलने मला लग्नासाठी होकार देण्यासाठी तीन वर्षे लावली. आणि होकार दिल्यानंतरसुद्धा एक वर्षापर्यंत काही नक्की नव्हतं. हेजलचे मानणं होतं कि, प्रपोजलच्या अगोदर तिने युवराजला सिरिअसली घेतले नव्हते. परंतु प्रपोजलच्या नंतरच ती त्याला समजू लागली. आपण असं बोलू शकतो कि, युवराजच्या प्रेमाने शेवटी हेजलचा हट्ट तोडला आणि तिच्या हृदयात सुद्धा युवराजसाठी प्रेम निर्माण केले. ह्यानंतर ३० नोव्हेंबर २०१६ ला जालंधर येथील गुरुद्वारामध्ये दोघांनी लग्न केले. ह्यानंतर हिंदू परंपरेनुसार दोघांनी गोवा येथे लग्न केले. हेजल आणि युवराजचे लग्न शीख आणि हिंदू परंपरेने झाले आहे. ह्यानंतर ह्या जोडीने दिल्लीमध्ये रिशेप्शन सुद्धा ठेवले होते. हेजलने बॉलिवूड चित्रपटांत अनेक आयटम सॉंग केले, परंतु तिला सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ ह्या चित्रपटातूनच ओळख मिळाली. ह्या चित्रपटात तिने करीनाच्या मैत्रिणीची भूमिका केली होती, जी करीनाला शेवटी दगा देऊन सलमान सोबत लग्न करते. हा चित्रपट पडद्यावर सुपरहिट झाला होता, परंतु हेजलने ह्यानंतर कोणत्याच चित्रपटांत काम केले नाही. तर दुसरीकडे युवराजने क्रिकेटमधून सन्यास घेतलेला आहे. हे जोडपे एकत्र आपल्या कुटुंबासोबत सुखी जीवन जगत आहे.