Breaking News
Home / माहिती / एटीएममधून पै’से काढताना हि महत्वाची गोष्ट तपासायला विसरू नका, बघा हा व्हडिओ

एटीएममधून पै’से काढताना हि महत्वाची गोष्ट तपासायला विसरू नका, बघा हा व्हडिओ

महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या कर्तव्य दक्षतेचा मराठी गप्पाच्या टीमला अतिशय अभिमान आहे. आपण मराठी गप्पावर याआधी विविध लेखांच्या माध्यमांतून महाराष्ट्र पोलिसांनी वेळोवेळी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल वाचलं आहेच. मग ते एका आ’त्मह’त्या करणाऱ्या स्त्रीला स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवणं असो वा धारावीत अडकलेला अजगर सोडवणं असो. आजचा हा लेख काहीसा वेगळा आहे. या लेखाच्या माध्यमातून आमच्या टीमने पाहिलेल्या एका वायरल व्हिडियो बद्दलची माहिती तुम्हाला येथे वाचायला मिळेल. बाकीच्या व्हिडियोत, अप्रिय घटना होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी इन ऍक्शन दिसत होते. पण या व्हिडियो द्वारे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी नागरिकांनी इन ऍक्शन राहून सतर्क कसे राहावे आणि का राहावे हे सांगताना दिसतात.

या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे अशोक कदम साहेब. उभा व्हिडियो वरून ते नगर पोलीस स्टेशन येथून कार्यरत असल्याचे कळते. गेल्या वर्षी त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ए.टी. एम. चे फ्रॉड होण्याच्या घटना वाढीस लागल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचा हा माहितीपर व्हिडियो समोर आल्याचं कळतं. या व्हिडियोत कदम साहेब आपल्याला ए.टी. एम. मशीन जवळ उभे असलेले दिसतात. एरवी नेहमीसारखी वाटणारी ए.टी. एम.मशीन मात्र तशी नसते हे ते दाखवून देतात. जिथून ए.टी. एम. अथवा डेबिट वा क्रेडिट कार्ड मशिन मध्ये आत टाकू शकतो त्या जागी अजून एक खोटा पण अगदी हुबेहूब दिसणारा भाग बसवलेला असतो. कदम साहेब हा भाग ओढून बाहेर काढतात. या भागात ए.टी. एम. कार्ड घातलं असता आपली माहिती चो’रीस जाऊ शकते हे आपल्याला कळतं. पण केवळ ए.टी. एम. कार्ड वापरून थोडी पै’से काढता येतात. त्यासाठी पिन किंवा पासवर्ड टाकावा लागतो. पण अनेक चो’र हे वरताण असतात हे हा व्हिडियो बघून कळतं.

कारण जिथून आपण आपला हा पासवर्ड किंवा पिन टाकू शकतो त्याच्या वरच्या बाजूस एक अतिरिक्त भाग जोडलेला असतो. कदम साहेब हा भाग काढून घेतात आणि आपल्याला दाखवतात आणि त्यात असलेला कॅमेराही दाखवतात. त्यांनी दाखवलेली ही माहिती बघून चो’रांच्या डोकेबाजपणाला काय बोलावं तेच कळत नाही. पण ए.टी. एम. मशीनला असणाऱ्या दोन अतिरिक्त गोष्टी दाखवून कदम साहेब थांबत नाहीत. तर त्यांच्या पासून आपलं सं’रक्षण कसं करावं, हे ही सांगतात. पहिलं म्हणजे जिथून कार्ड मशीन मध्ये टाकतो तिथे एखादा अतिरिक्त भाग तर जोडलेला नाही ना, हे पाहणे. तसेच आपला पा’सवर्ड वा पिन नंबर टाकत असताना आपल्या एका हाताचा वापर टाइप करायला आणि दुसऱ्या हाताचा वापर हा पा’सवर्ड आत कॅमेरा असेल तर दिसू नये यासाठी करावा असं ते सांगतात. तसेच त्याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक ते करून दाखवतात आणि हा व्हिडियो संपतो.

हा व्हिडियो खरंच आपल्या फायद्याचा. अनेक वेळेस घाईघाईत असल्यामुळे किंवा चो’री कशी होईल याविषयी अनभिज्ञ असल्यामुळे आपण गाफील राहतो. याच गाफीलपणाचा गैरफायदा कोणीही समाजकंटक घेऊ नये यासाठी या व्हिडियो चे महत्त्व. आपण हा लेख शेअर करा आणि आपल्याला जी उपयुक्त माहिती मिळाली आहे ती आपल्या आप्त-स्वकीयांपर्यंत पोहोचूद्यात. काय कल्पना, ही माहिती आणि ती ही एका अधिकारी व्यक्तीने दिलेली कधी आपल्याला उपयोगी पडू शकेल. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवर्जून वाचा बरं का.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.