Breaking News
Home / मनोरंजन / एसटी कर्मचाऱ्याने स्टेजवर सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, बघा हा अतरंगी डान्स व्हिडीओ

एसटी कर्मचाऱ्याने स्टेजवर सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, बघा हा अतरंगी डान्स व्हिडीओ

तुम्ही कायमच तणावाच्या वातावरणात असाल तर त्याचे परिणाम भविष्यात वाईट असतात. म्हणून मनोरंजन जरुरी है बॉस… पंधरा-वीस दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यात तडजोड होण्याची चिन्हे अद्याप तरी दिसत नाही. सरकार आपल्या हेक्यावर ठाम आहेत. कर्मचारीही मागण्यांच्या पूर्ततेवर अढळ आहेत. आता तर ‘शेंडी तुटो की पारंबी’ अशा दृढ निश्चयाने ते निर्वाणीच्या यु’द्धात उतरले आहेत. तळहातावर शीर घेऊन रणात उतरलेले हे उपाशी जीव म’रणाच्या तयारीनेच पुढे सरसावले असल्याचा प्रत्यय येत आहे. त्यांची विविध ठिकाणी आं’दोलने चालू आहेत. प्रचंड तणावाचे वातावरण आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आ’त्मह’त्या झाल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. शेवटी हे सगळं कशासाठी चाललं आहे तर पोटासाठी… काही वर्षांपूर्वी एका तमाशात नाचणाऱ्या महिलेने गर्भवती असताना स्टेजवर डान्स केला होता. नंतर स्टेजवर तिला प्रसुतीवेदना जाणवल्या. तिची प्रसूती स्टेजच्यामागे झाली. आणि डिलिव्हरी झाल्यावर काही वेळातच ही बाई पुन्हा स्टेजवर नाचू लागली.

किती तो त्याग, किती तो आत्मविश्वास, किती मोठी प्रेरणा… जेव्हा डिलिव्हरी होऊन ही बाई स्टेजवर नाचायला आली तेव्हा तिने म्हटलेली लावणी होती… पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची… ती बाई होती विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर… सध्या एसटी कर्मचाऱ्यांची अवस्थाही तशीच झाली आहे. पगार कमी, कष्ट जास्त… त्यातच वेळेवर पगार नाहीच. म्हणून आता आंदोलनाचा पवित्रा घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. आणि आता आंदोलनातच लावणीच्या या प्रबळ लोककला माध्यमातून सरकारला जागं करण्यासाठी एका एसटी कर्मचाऱ्याने याच लावणीवर डान्स केला आहे. खरंतर एका पुरुषाने एका महिला करत असलेल्या नृत्य प्रकारावर नाचणे आणि त्यातल्या त्यात लावणीवर नाचणे, थोडे आश्चर्यचे आहे. पण शेवटी जे काही आहे ते पोटासाठी आहे, असं म्हणत एसटी कर्मचाऱ्याने जबरदस्त लावणी सादर केली आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्याला लाखोंनी विव्ज मिळत आहेत.

“लाज धरा पाव्हणं जरा, जनाची मनाची. लाज धरा पाव्हणं जरा, जनाची मनाची.. जनाची मनाची.. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची.. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची.. अहो ध्यान धरा जरा, हिची कदर करा.. हीचं काळीज समजून घ्या.. हीचं काळीज समजून घ्या.. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची.. पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची..”

अशा शब्दात सरकारला जाग करण्याचं काम या लावणीतून एसटी कर्मचाऱ्याने केलं आहे. यातून 2 गोष्टी साध्य झाल्या. पहिलं म्हणजे लोककलेच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपली भावना पोहोचवली. आणि दुसरं म्हणजे सगळीकडे तणावाचे वातावरण असताना… एसटी कर्मचारी निलंबित केले जात असताना त्या एसटी कर्मचाऱ्याने सगळ्यांचे मनोरंजन करून डोक्याचा ताण काही वेळासाठी का होईना… हलका केला. त्या एसटी कर्मचाऱ्याला हे सुचणं ही खूपच मोठी बाब आहे. आपली भावना लोकांपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी थेट लावणीवर ठेका धरणाऱ्या या एसटी कर्मचारी बांधवाला आमचा मानाचा मुजरा… त्याने केलेला हा अफलातून लावणी डान्स नक्कीच बघा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.