Breaking News
Home / मनोरंजन / एसटी ट्रेन मध्ये प्रवास करताना तुमचीदेखील अशी फसवणूक होऊ शकते, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील हि चूक करणार नाही

एसटी ट्रेन मध्ये प्रवास करताना तुमचीदेखील अशी फसवणूक होऊ शकते, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीदेखील हि चूक करणार नाही

सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंने भरलेले आहे. दररोज हजारो लाखो व्हिडीओ येथे पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यांपैकी काही खरोखरच खूप मजेदार असतात जे आपलं मनोरंजन करतात.म्हणून मग आपण त्यांना सारखेसारखे पाहतो, एवढेच काय तर आपण आपल्या मित्रांना देखील पाठवतो आणि या व्हिडीओंचा आनंद लूटतो. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरतात. म्हणजेच काही व्हिडीओ हे आपल्याला शिकवण देणारे, धडा देणारे असतात. हे व्हिडीओ गंभीरपणे पाहिले जातात. असाच एक व्हिडीओ आमच्या टीमकडे आला. कायम मनोरंजन करणारे व्हिडीओ बघणारे आम्ही हा व्हिडिओ पाहून शॉक झालो. कारण हा व्हायरल झालेला व्हिडीओ एका चोरीचा होता. आणि ही चोरी हजारो माणसांच्या समोर केलेली होती. तरीही कुणाच्याच लक्षात आली नव्हती. इथून पुढे तुमचीही अशी फसवणूक होऊ नये, म्हणून आम्ही हा व्हिडीओ समोर आणण्याचे ठरवले. आतापर्यंत तुम्ही अनेक चोरीचे व्हिडीओ पाहिले असतील परंतु ही चोरी काहीशी वेगळं आहे, कारण यामध्ये ज्यांची चोरी होत आहे, त्यांना काही समजण्याच्या आत सहजपणे चोरी केली जाते.

गर्दीच्या ठिकाणी चोरी करणं काही सोपं काम नाही. चोर सर्वप्रथम जी वस्तू चोरायची आहे तिचं व्यवस्थित निरिक्षण करतात. त्यानंतर पळण्याचा मार्ग निश्चित करतात. व शेवटी कोणाच्याही नकळत ती वस्तू उचलतात. अर्थात हा प्रयोग फसला तर मात्र त्यांची खैर नसते. आसपासची लोकं बदडून काढतातच. पण सोबतच पोलीस देखील धुलाई करतात. अशाच काही चोरांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. एक बॅग चोरण्यासाठी एका चोरट्यांच्या टोळीने लढवलेली युक्ती पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

बस स्टँडवर नेहमी ही एसटी मध्ये गर्दी असते. लांबचा प्रवास असेल आणि जर बसायला जागा मिळाली नाही तर आपले प्रवासात खूप हाल होतात. मग लोकांनी त्यावर उपाय शोधला. बसायच्या आधीच खिडकीतून आतमध्ये रुमाल किंवा आपल्यासोबत असलेली सामानाची बॅग टाकायची आणि मग ती सीट आपली. मात्र चक्क बस स्टँडवर जिथे हजारो लोक असतात, तिथे चोर एकदम सहज चोरी करतात. आणि आपले सामान असलेली बॅग काढून नेतात. असाच एक प्रकार समोर आला आहे, एका एसटी स्टँडवर.

जेव्हा ही चोरी झाली, तेव्हा एसटी स्टँडवरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आणि त्यातून हा भयंकर चोरीचा रचलेला सापळा समोर आला. 6-7 लोक एकत्र येऊन अवघ्या 3 मिनिटात कशी चोरी करतात, हे पाहून तुम्हीही चक्रावून जाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका चोराची नजर एसटीतुन आत टाकलेल्या बॅगवर आहे. सर्वप्रथम तो इकडे तिकडे फिरतो. एसटीच्या जवळ जातो. बॅग आत टाकलेल्या माणसाचे निट निरिक्षण करतो. मग त्याचे बाकीचे साथीदार त्या बॅग टाकलेल्या माणसावर नजर ठेवतात. अवघ्या 1 मिनिटात सगळं प्लॅन रेडी होऊन बॅग चोरी होते आणि एसटी स्टँड बाहेर पण जाते.

कोणाच्याही नकळत ती बॅग घेऊन दोन चार फरार होतात. लक्षवेधी बाब म्हणजे त्याच्या या सर्व हालचाली समोरच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. अन् हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपलीही अशी फसवणूक होऊ नये, याची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करून इतरांची फसवणूक टाळा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *