Breaking News
Home / मनोरंजन / ‘ए आई मला पावसात जाऊ दे’ ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील ह्या मुलाच्या प्रेमात पडाल

‘ए आई मला पावसात जाऊ दे’ ह्या मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील ह्या मुलाच्या प्रेमात पडाल

सोशल मीडियावर कधी काय समोर येईल हे सांगता येत नाही. या इंटरनेटच्या मायाजालाच्या मंचावर रोजच नवनवे आणि हटके असे व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. विशेष बाब म्हणजे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओज मध्ये लहान मुलांचे व्हिडीओ जास्तीचे व्हायरल होत असतात. सध्या मात्र, एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. लहान मुलं म्हटलं की खट्याळपणा, तरतरीतपणा हा आलाच. छोटी मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये याचीच प्रचिती आली आहे. एका लहान मुलाचा गोडवा आणि त्याची कला बघून सगळे त्याचा व्हिडीओ परत परत बघत आहेत. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ उभ्या महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. हा एक लहान गोंडस मुलगा एक गाणं म्हणताना दिसत आहे.

अवघ्या 2 च ओळी तो म्हणतो. पण त्या 2 ओळी म्हणताना तो जे एक्स्प्रेशन्स दिले आहेत ते पाहून सगळे त्याचे फॅन झाले आहेत. इतक्या कमी वयाच्या मुलाला या गाण्याच्या भावना इतक्या तंतोतंत समजल्या आहेत म्हणूनच तो एकदम भन्नाट असे अतरंगी एक्स्प्रेशन्स देऊ शकला आहे. “ए आई मला पावसात जाऊ दे… एकदाच गं भिजूनी मला… चिंब चिंब होऊ दे” या ओळी त्याने म्हटल्या आहेत. त्याने यावर डान्स वगैरे केलेला नाही. तो एका साध्या खुर्चीवर बसलेला आहे. आणि तो एकदम साध्या पध्दतीने हातवारे करत आहे. आणि ‘चिंब चिंब होऊ दे’ म्हणताना त्यानं खरी कलाकारी करून दाखवली आहे. गम्मत म्हणजे त्याला बघताना आपणही अचानक खुदकन हसतो. त्याचा व्हिडीओ आपल्याला आनंद देणारा आहे. आपण हा व्हिडीओ बघताना एकदम तल्लीन होतो. हा व्हिडीओ बघून एकदम टेन्शनमध्ये असलेला माणूससुद्धा टेन्शनफ्री होईल.

काही गाण्यांची/ कवितांची/ गझलाची ही जादू असते, ज्यात आपण गाणे ऐकताना एकनिष्ठ होतो आणि आपल्याला समाधान प्राप्त होत असते. असाच हा व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल, याची आम्हाला खात्री आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर या व्हिडीओवर एकदम हटके शैलीत कमेंटस केलेल्या आहेत. काही लोकांनी या बाळाचे पोटभर कौतुक केले आहे तर अनेकांनी ‘हा छोटा भविष्यात एकदम मोठा कलाकार बनणार’ असेही म्हटले आहे. तर काही लोकांनी या व्हिडीओला अतिशय क्यूट असल्याचे म्हटले आहे. आमच्या टीमतर्फेही या छोट्या मुलाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *