कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे लॉकडाऊनच्या दरम्यान लोकं सोशिअल मीडियावर सर्वात जास्त वेळ घालवत आहेत. हेच कारण आहे कि सोशिअल प्लॅटफॉर्मवर लोकांच्या मनोरंजनासाठी बॉलिवूड कलाकार मंडळींचे घडून गेलेले किस्से, गोष्टी, फोटोज, व्हिडीओज खूप वायरल झाले. ह्याच दरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या राय ह्यांचा एक किस्सा देखील वायरल झाला. चला तर जाणून घेऊया नक्की कोणता होता तो किस्सा. हा किस्सा ऐश्वर्या राय संदर्भात आहे. ऐश्वर्याने ‘गुजारिश’ चित्रपटात ह्रितिक रोशन सोबत काम केले होते. हा चित्रपट २०१० साली संजय लीला भन्साळी ह्यांच्या दिग्दर्शनाखाली बनला होता. मजेशीर गोष्ट अशी कि ह्या चित्रपटात सलमान खानला काम करायचे होते. खरंतर, सलमान आणि ऐश्वर्या ह्या दोघांनी संजय लीला भन्साळीच्या ‘हम दिल दे चुके सनम’ ह्या चित्रपटात एकत्र काम केले होते. ह्या चित्रपटानंतर सलमान खान हा ऐश्वर्याच्या प्रेमात पडला होता. आणि म्हटले जाते कि त्याला त्याच्या प्रत्येक चित्रपटात ऐश्वर्याला घ्यायचे होते. ह्याच गोष्टींमुळे सलमानला ‘गुजारिश’ चित्रपटामध्ये ऐश्वर्यासोबत मुख्य भूमिकेत काम करायचे होते.
गुजारिश मध्ये सलमानच्या जागेवर ह्रितिकला घेतले गेले
ह्याच दरम्यान ऐश्वर्याचे सलमानसोबत ब्रेकअप झाले आणि तिने शपथ घेतली कि पुन्हा कधी सलमान सोबत काम करणार नाही. जरी दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतरही ते दोघेही दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ह्यांचे मित्र होते. परंतु ‘गुजारिश’ चित्रपटात सलमान ऐवजी ह्रितिकला घेतल्यामुळे सलमान खान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ह्यांच्यावर नाराज झाला. ह्यानंतर सलमानने ह्या चित्रपटाविरुद्द चुकीचा प्रचारसुद्धा केला आणि इंडस्ट्री मध्ये सलमान आणि भन्साळी ह्यांच्यात मतभेद झाल्याची गोष्ट पसरू लागली. सलमानचे मानणे होते कि ऐश्वर्याच्या बोलण्यानुसार भन्साळीने त्याला चित्रपटांत घेतले नाही. खरंतर, संजय लीला भन्साळी ह्यांचा ‘गुजारिश’ चित्रपट बनवण्यामागे सलमान खानचाच हात असल्याचे बोलले जाते. भन्साळी ह्यांना एकदा सलमानने हॉलिवूड चित्रपट ‘द प्रेस्टिज’ची डीव्हीडी दिली होती, हा चित्रपट पाहून भन्साळी खूप प्रभावित झाले होते आणि त्यांना चित्रपट बनवण्याची कल्पना आली होती.
सलमानला जेव्हा ह्याबद्दल कळले कि भन्साळी ‘गुजारिश’ चित्रपट बनवणार आहेत, तेव्हा त्याला आपली एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या सोबत काम करायचे होते. तर दुसरीकडे, भन्साळी ह्यांनी सलमानला चित्रपटात कास्ट केले नाही, त्यामुळे सलमानचा रागाचा पारा चढला. हेच कारण आहे कि एका इव्हेंटमध्ये सलमान खानने मीडियासोबत बोलताना ‘गुजारिश’ चित्रपटाची खूप टर्र उडवली होती आणि चित्रपटाची स्टार कास्ट सोबत दिग्दर्शक भन्साळी ह्यांना सुद्धा खूप काही बरेवाईट म्हटले होते. त्याने म्हटले होते कि, “हा चित्रपट तर कुत्रा सुद्धा पाहायला गेला नाही. चित्रपटात सारखं एक माशी (मक्खी) उडत होती. फक्त तिनेच चांगला अभिनय केला होता.” एका रिपोर्टरने जेव्हा ह्या विषयी सलमानला प्रश्न विचारला तेव्हा त्याने उत्तर दिले कि, “जा आणि भन्साळीला भेट. तो तुझ्यावर चित्रपट बनवेल. परंतु तुला एक फुटकी कावडीसुद्धा देणार नाही.”
ह्रितिक रोशनने दिले होते हे उत्तर
ह्या संपूर्ण घटनेवर ऐश्वर्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती, परंतु ह्रितिक रोशनने म्हटले होते कि, “मी सलमान खानला नेहमी एका चांगल्या माणसाच्या रूपात जाणले आहे, त्याने नेहमी मला सपोर्ट केले. तो माझ्यासाठी नेहमी हिरो होता आणि पुढे सुद्धा राहील. परंतु, एका दिग्दर्शकाची थट्टा केवळ ह्यासाठी नाही उडवू शकत कि त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. हि काही हिरो वाली गोष्ट नाही आहे.”