बॉलिवूड मधे सगळ्या अभिनेत्री एकापेक्षा एक सरस आहेत, आणि या सर्व अभिनेत्रींची संपूर्ण दुनिया दिवानी आहे. पण काही अशा आहेत, सुंदरतेचं नाव घेतल्या नंतर या अभिनेत्री ची नावे पुढे येतात. त्यांच्यात एक ऐश्वर्या राय आहे. पणआपल्याला माहिती आहे का, कि तिच्या सुंदरतेला पाठी टाकले सुष्मिता सेनेन. आणि यामुळे ती ऐश्वर्याला हरवून बनली मिस इंडिया बनली होती. 19 नोव्हेंबर 1975 साली हैदराबाद मधे जन्म घेतलेली सुष्मिता सेनने मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्सचे ताज मिळवले. सुष्मिताला बॉलिवूड मधे आपले नशीब अजमावून जितकी प्रसिद्धी मिळाली नाही, तितकी ती सुंदरतेसाठी आणि पर्सनल लाईफ साठी ओळखली जाते. या अभिनेत्रीने फक्त नाव नाही कमावले तर भारताचे नाव संपूर्ण दुनियेत उंच शिखरावर नेले. सुष्मिता सेन हि भारतातील पहिली मुलगी आहे जिने पहिल्या वेळी भारताकडून मिस युनिव्हर्सचा ताज मिळवला. त्या आधी सुष्मिता सेनेन मिस इंडिया चा पुरस्कार जिंकला आणि १८ व्या वर्षी मिस युनिव्हर्स चा ताज मिळवला. काय आपण जाणता १९९४ मधे सुष्मिता सेनेने ऐश्वर्या राय ला हरवून मिस इंडिया बनली.
मिस इंडिया च्या शेवटच्या फेरीत ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन या दोघींत बरोबरी झाली होती. दोघींचे पॉईंट समान होते आणि एका प्रश्नाने याचा निकाल होईल असे ठरवले. त्या नंतर दोघींना प्रश्न विचारले आणि सुश्मिताने तिच्या उत्तराने जजला इम्प्रेस केले. त्या नंतर तिला मिस इंडिया चा पुरस्कार मिळाला. ऐश्वर्याला विचारले होते कि, “जर तुला तुझ्या भावी नवऱ्यामध्ये गुण पाहायचे असतील तर तू कोणते गुण पाहिल. ‘द बोल्ड अँड ब्युटीफुल’ चित्रपटामधील ‘रिडज फॉरेस्टर’ सारखे कि मग ‘सँटा बार्बरा’ चित्रपटामधील ‘मॅसोन कॅपवेल’ सारखे. ह्या दोघांपैकी तू कोणाला निवडेल.” त्या नंतर ऐश्वर्याने ‘मॅसोन कॅपवेल’ची निवड केली आणि स्पष्टीकरण देताना म्हणाली, “आमच्या दोघांत काही गोष्टी समान आहेत. मॅसोन खूप काळजी घेणारा आहे आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. जो माझ्या कॅरेक्टर सारखा वाटतो.”
ऐश्वर्याचे उत्तर आणि स्पष्टीकरण चांगले होते. आता सुश्मिताची वेळी होती. परीक्षकांनी तिला प्रश्नदेखील थोडासा कठीणच विचारला. परीक्षकांनी सुष्मिता सेनला विचारले, “तुम्ही देशाच्या वस्त्रोद्योगा विषयी काय जाणता? हा केव्हा सुरु झाला आणि तुम्हाला घालायला आवडेल?” या प्रश्नाचे उत्तर सुष्मिताने असे दिले. ‘मला वाटतंय देशातील वस्त्रोद्योग हे महात्मा गांधी ह्यांच्या खादी पासून सुरु झाले, जरी आता खूप वर्षे झाली असली तरी भारतीय वस्त्रोद्योग वारसाची मूलभूत माहिती तिथून आहे. मला इंडियन आणि एथलीक वियर घालायला आवडेल.” सुश्मिताच्या ह्या उत्तराने तिने ऐश्वर्याला ०.२% ने हरवले होते. त्यानंतर सुश्मिता हि स्पर्धा जिंकली होती. ह्यास्पर्धेनंतर ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड हि स्पर्धा जिंकली होती तर सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला होता. एकाच वर्षी हे दोन्ही पुरस्कार आपल्या देशाला मिळवून दिले होते.