Breaking News
Home / बॉलीवुड / ऐश्वर्या आणि कतरीना सोबतच नाही तर ह्या ५ अभिनेत्रींसोबत होते सलमानचे अफेअर, एक तर होती पाकिस्तानी अभिनेत्री

ऐश्वर्या आणि कतरीना सोबतच नाही तर ह्या ५ अभिनेत्रींसोबत होते सलमानचे अफेअर, एक तर होती पाकिस्तानी अभिनेत्री

बॉलिवूडचा दबंग खानचे सध्याचे वय ५४ आहे. आपल्या चित्रपट कारकीर्दीत सलमानला जी प्रसिद्धी मिळाली आहे, जी खूप कमी कलाकारांना मिळाली आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी इंदोर येथे झाला होता. हे फार कमी लोकांना माहिती आहे कि, सलमानचे पूर्ण नाव अब्दुल रशीद सलीम खान असे आहे. सलमान प्रसिद्ध लेखक सलीम खान आणि त्याची पहिली पत्नी सलमा यांचा मोठा मुलगा आहे. सलमान बॉलिवूडमधील आपल्या अफेयरबाबत खूप चर्चेत राहिला आहे. सलमानने आपल्या करिअरची सुरुवात ११८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटापासून केली होती. मात्र, सलमानला सहकलाकार म्हणून पाहिले जात होते. पण १९८९ मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटापासून सलमानने मुख्य अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यात भाग्यश्री त्याच्यासोबत दिसली होती.

( फोटोत सलमानसोबत संगीता बिजलानी )

पण चित्रपटात येण्यापूर्वीच सलमानचे नाव अभिनेत्रींशी जोडले जाऊ लागले होते. अभिनेत्री संगीता बिजलानीने सलमानच्या आयुष्यात प्रथम प्रवेश केला. १९८० मध्ये जेव्हा संगीताने मिस इंडियाचा मुकुट जिंकला, तेव्हापासून सलमानबरोबर तिचे संबंध जोडल्याच्या बातम्या खूप चर्चेत आल्या होत्या. पण हे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत आणि दोघांमध्ये कटुता निर्माण झाली. संगीता बिजलानीने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले.

८ वर्षांपासून पाकिस्तानी अभिनेत्रीशी संबंध होते
संगीता बिजलानी आयुष्यातून गेल्यानंतर १९ वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अलीने सलमानच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघांमध्ये खूप चांगले संबंध होते. सोमीने एका मुलाखतीत सांगितले होते की वयाच्या १५ व्या वर्षापासूनच तिचे सलमानवर क्रश आहे आणि तेव्हापासून तिला सलमानशी लग्न करायचं आहे. आणि हेच कारण होते की सोमीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. पण या दोघांचे नाते पण जास्त वेळ टिकू शकले नाही. आठ वर्षानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर ते वेगळे झाले. सोमीने सलमानपासून वेगळे होण्याचे कारण त्याचे अल्कोहोलचे व्यसन आणि मारहाण करण्याची वागणूक असे सांगितले होते.

( फोटोत सलमानसोबत सोमी अली )

अगोदर ऐश्वर्या नंतर आली स्नेहा उल्लाल

सोमीच्या ब्रेकअपनंतर सलमानची प्रेमकथा ऐश्वर्यासोबत सुरू झाली. १९९९ मध्ये आलेल्या “हम दिल दे चुके सनम” या चित्रपटादरम्यान दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण २००२ मध्ये त्यांच्या प्रेमकथेचा अंत झाला. त्यांचे वेगळे होण्याचे कारणही तेच होते. सलमानच्या एब्यूसिव वागणुकीमुळे ऐश्वर्याला त्रास होत होता आणि यामुळेच तिने सलमानपासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला.

ऐश्वर्या आयुष्यामधून गेल्यानंतर सलमानने स्नेहा उल्लालला इंडस्ट्रीमध्ये आणले. या दोघांमधील नात्याबाबत बरीच चर्चा झाली होती, पण दोघांनीही मीडियासमोर कधीच काही बोलले नाही. आता स्नेहा साऊथ इंडस्ट्री मध्ये काम करत आहे. यानंतर कैटरीना कैफने सलमानच्या आयुष्यात प्रवेश केला. सलमानने कैटच्या बुडलेल्या करियरला पाठिंबा दिला आणि आज कैट बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कैटरीना सलमानसोबत “मैने प्यार क्यूं किया” मध्ये दिसली होती. सलमान कैटबद्दल खूपच गंभीर होता, पण यावेळी सुद्धा सलमान रिकाम्या हाताने राहिला आणि कैट रणबीरबरोबर निघून गेली होती.

( फोटोत सलमानसोबत स्नेहा उल्लाल)

सलमान लुलियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे

यानंतर सलमानचे नाव कैटच्या डुप्लिकेट झरीन खानशी संबंधित होते पण ती केवळ चर्चा होती. यानंतर बिग बॉस एक्सची स्पर्धक क्लोउडियाबरोबर जोडीही बनली. पण सर्व हवेतच बाहेर गेले. आजकाल सलमान आपली गर्लफ्रेंड लुलिया वेंचरसोबत बिझी आहे. लुलिया ही एक रोमानियन अभिनेत्री आणि अँकर आहे. सलमानच्या परदेशी दौऱ्यात सलमानने लुलियाची भेट घेतली होती, त्यानंतर ती भारतात पण आली होती. इतकेच नाही तर सलमानने अर्पिताच्या लग्नात लूलियाची ओळख ही गर्लफ्रेंड म्हणून केली होती. सलमान आणि लुलिया यांच्यात हे संबंध किती दिवस टिकते हे पाहणे बाकी आहे.

( फोटोत सलमानसोबत लुलिया )

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *