Breaking News
Home / मनोरंजन / दुबईमधील ऑफिसमध्ये ह्रितिक रोशनची एंट्री होताच ह्या मुलांनी जे काही केले ते पाहून स्वतः ह्रितिक थक्क झाला, बघा व्हिडीओ

दुबईमधील ऑफिसमध्ये ह्रितिक रोशनची एंट्री होताच ह्या मुलांनी जे काही केले ते पाहून स्वतः ह्रितिक थक्क झाला, बघा व्हिडीओ

कलाकार आणि त्यांच्याभोवती असणारं वलय याचं आपल्याला कायम अप्रूप असतं. खासकरून सिने कलाकारांविषयी असलेलं हे अप्रूप जास्त असल्याचं दिसून येतं. पण यातुनच मग आपण काही सिनेकलाकारांचे चाहते होतो तर काहींचे टीकाकार. पण काही कलाकार असेही असतात की बहुतेक सगळ्यांचेच ते लाडके असतात. यातील एक नाव म्हणजे हृतिक रोशन. कहो ना प्यार है या पदर्पणातील चित्रपटापासूनच ते सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनले. उत्तम अभिनय, नृत्य, राजबिंड व्यक्तिमत्व असं सगळं या कलाकाराच्या ठायी आपल्याला दिसून येतो. पण याच सोबत त्यांचं नम्र असणं ही भावतं. यामुळेच हृतिक सगळ्यांचे लाडके कलाकार होऊन जातात. असा हा लाडका कलाकार आपल्या कडे पाहुणा म्हणून येतो आहे कळल्यावर त्याची उत्तम बडदास्त ठेवली जाणारच की. होय अर्थातच. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला आणि त्याविषयी लिहावं असं ठरलं.

हा व्हिडियो आहे दुबई स्थित एका रेडियो स्टेशनच्या ऑफिस मधला. काही वर्षांपूर्वी आलेल्या काबिल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हृतिक आणि यामी गौतम दुबई येथे गेले होते २०१७ साली. त्यावेळी सिटी १०१६ या रेडियो स्टेशनच्या ऑफिसला त्यांनी भेट दिली होती. हृतिक आणि यामी येणार म्हंटल्यावर या सगळ्यांनी एकदम जय्यद तयारी केली होती. पण हृतिक आणि यामी यांना याची सुतराम कल्पना नसल्याने त्यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का ठरतो. यामुळे होणार आनंद त्यांना लपवता येत नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून हे कळून येतं.

व्हिडियो ची सुरुवात होते तेव्हा हृतिक आणि यामी ऑफिसच्या प्रवेश द्वारात येतात आणि त्यांना कळतं की त्यांच्या साठी फ्लॅश मॉब चं आयोजन केलेलं आहे. सुरुवातीस येतात ते सहा जण. हृतिक यांच्या पहिल्या चित्रपटातलं ‘ए मेरे दिल तू गाए जा’ हे गाणं ही सहा जण अगदी मस्त सादर करतात. त्यात या गाण्यातील सिग्नेचर स्टेप तर अफलातून स्लो मोशन मध्येही सादर करतात. हृतिक आणि यामी यांना आनंद झालेलाच असतो. पण ही तर केवळ सुरुवात असते. स्टार्टर म्हणा ना. मग येतो एक चमू ज्यात लहान मोठी अशी सगळी मुलं समाविष्ट असतात. मग सुरू होतं हृतिक यांचं सुप्रसिद्ध ‘बँग बँग’ हे गाणं. मूळ गाण्यात हृतिक आणि कतरीना कैफ झळकले आहेत. अशा या सुप्रसिद्ध गाण्यावर हा चमू असा नाचतो की ज्याचं नाव ते. खुद्द हृतिक एकदम अचंबित होऊन बघत असतात. खासकरून त्या लहान मुलांचा डान्स त्यांना भारी आवडलेला वाटतो.

या डान्सला असलेली हृतिक यांची प्रतिक्रिया हीच सगळ्यांची प्रतिक्रिया असते. कारण एका क्षणाला मधेच हे गाणं थांबतं. पण डान्सर्स थांबत नाहीत आणि उपस्थित सगळेच जण यात इतके मश्गुल असतात की ते स्वतः मोठ्याने हे गाणं म्हणायला सुरुवात करतात. यात आघाडीवर हृतिक असतात. डान्स संपतो आणि हृतिक यांच्या कडून सगळ्यांची विचारपूस होते. यांना कार्यक्रमासाठी खास डान्स करायला बोलवलंय का असं विचारतात पण उत्तर नकारार्थी येतं.

एवढं सगळं झाल्यावर हृतिक आणि यामी यांना वाटतं स्वागत तर झकास झालं. पण अहो हा तर मेन कोर्स असतो. अजून स्वीट डिश तर बाकी असते. अजून एक चमू दुसऱ्या एका ऑफिस दालनात तयार असतो. जागा कमी असली तरी हृतिक समोर डान्स करण्याचा उत्साह सगळ्यांना असतो. हृतिक ही एकदम खुश झाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. त्यांना उत्सुकताही असते. या उत्सुकतेला पूरक असाच डान्स होतो. सगळी जणं अगदी मनापासून डान्स करतात. तेवढ्यात हृतिक आणि यामी यांना पुढे घेऊन जायला एक व्यक्ती येते. त्या व्यक्तीसोबत पुढे जात असताना हृतिक आणि यामी या सगळ्यांशी संवाद साधत पुढे जात असतात. आपलं झालेलं जंगी स्वागत दोघांनाही आवडलेलं तर दिसत असतंच. सोबतच या सगळ्यांनी ज्या मेहनतीने डान्स बसवले आणि सादर केले याचं कौतुकही या दोघांना असतं. हृतिक तर बोलूनही दाखवतात की यातील सगळ्यांनी उत्तम परफॉर्मन्स दिला. हृतिक यांच्या या मताशी आपणही संमत असतो. खरंच या सगळ्या जणांनी हृतिक आणि यामी यांचं केलेलं जंगी स्वागत आपल्यालाही आवडून जातं.

आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मधून कळवायला विसरू नका. तसेच नेहमीप्रमाणे आपले लेखही शेअर करत चला. सकारात्मक कमेंट्स आणि लेख शेअर करण्यातून आपला स्नेह आपल्या टीमशी वृद्धिंगत होतो आहे हे कळून येतं. आपला पाठिंबा आमच्या पाठीशी असाच सदैव राहू दे. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *