Breaking News
Home / मनोरंजन / ऑस्ट्रेलियन मुलाने केले भारतीय मुलीशी लग्न, बघा दोघांनी लग्नात केलेला हा अप्रतिम डान्स

ऑस्ट्रेलियन मुलाने केले भारतीय मुलीशी लग्न, बघा दोघांनी लग्नात केलेला हा अप्रतिम डान्स

आजपर्यंत आपण लग्नाचे अनेक वायरल व्हिडियोज बघितले असतील. त्यात आपल्या मराठमोळ्या लग्न समारंभातील अनेक व्हिडियोज असतील. तसेच भारतातील अन्य प्रदेशांमधील व्हिडियोज ही असतात. यातील अनेकांवर आपल्या टीमने लेखन केलेलं आहे. आज मात्र आपल्या टीमने असा एक व्हिडियो बघितला ज्यात लग्न होणारी ताई होती भारतीय आणि आपले भावोजी होते ऑस्ट्रेलियन. गंमत वाटली हा व्हिडियो बघताना आणि वाटलं की आपल्या वाचकांना याविषयी कळलं तर नक्कीच आवडेल. म्हणून हा लेखन प्रपंच. चला तर मग जाणून घेऊयात या मस्त आणि धमाल व्हिडियो विषयी.

या व्हिडियोतील आपल्या भारतीय ताईचं नाव आहे मिनू. तर तिच्या अहोंच नाव आहे ज्युलियन हिल. या दोघांचं लग्न २०१८ साली झालं आणि त्यावेळी या दोघांनी लोकप्रिय बॉलिवूड संगीतावर मस्त असा डान्स परफॉर्मन्स केला होता. त्याचाच हा व्हिडियो. सुरुवातीला आपली ताई आणि तिच्या काही मैत्रिणींचं आगमन होतं ते जल्लोषात. सोबत काहीसं मंद चालीचं संगीत सुरू असतं.

पुढे यात भर पडते ती प्रेम रतन पायो या गाण्याची. कारण या गाण्याच्या सुरुवातीला असलेले शब्द अगदी हळुवारपणे उलगडत जातात. त्यामुळे ताई करत असलेले स्टेप्स ही अगदी हळुवार पण मनमोहक असतात. मग जसं गाणं पुढे सरकतं तसं ताईच्या स्टेप्स ही जलद होत जातात. ताई डान्स करत असलेलं हे गाणं संपतं न संपतं तो पर्यंत दुसरं गाणं सुरू झालेलं असतं. त्यात परफॉर्मन्स असतो तो अर्थातच ज्युलियन यांचा. ज्युलियन अगदी गंमतीदार चालीने धावत येतात तेव्हा त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळतो. पुढेही हा प्रतिसाद कायम राहतो. खरं तर परदेशी नागरिकांनी भारतीय संगीतावर डान्स करताना चुका होऊ शकतात किंवा ते व्यवस्थित दिसेलच अशी खात्री नसते. पण ज्युलियन मात्र मस्त डान्स करत असतात. डान्स करणारा गाण्यावर मनापासून नाचत असेल तर डान्स मस्तच होतो. ज्युलियन यांचंही तसंच असतं. या तडकत्या फडकत्या दोन परफॉर्मन्स नंतर सगळ्यांच्या आवडीची अजून दोन गाणी सादर होतात. त्यात एक तर असतं, प्रियांका चोप्रा त्यांच्यावर चित्रित झालेलं ‘देसी गर्ल’ हे गाणं. या गाण्यावर या नवपरिणीत जोडप्याने केलेला डान्स हा अतिशय उत्तम परफॉर्मन्स मानता येईल. कारण उपस्थितांकडून या डान्सवर सगळ्यांत जास्त प्रमाणात प्रतिक्रिया मिळताना दिसतात.

दुसरं गाणं असतं ‘चोघडा सारा’. दोन तीन वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याने अगदी धमाल केली होती. त्यावेळी अनेकांची रिंगटोन म्हणजे हे गाणं असे. अशा या लोकप्रिय गाण्यावरही उत्तम परफॉर्मन्स होतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायला हवी. चतुर कोरिग्राफर हे नेहमीच एखादी महत्वाची मनोरंजक गोष्ट परफॉर्मन्सच्या शेवटच्या काही क्षणांसाठी राखून ठेवत असतात. इथेही ज्यांनी कोरिओग्राफी केलेली आहे त्यांनी ही बाब लक्षात घेतलेली दिसते. कारण जसं ‘काला चष्मा’ हे उडतं गाणं वाजायला लागतं तसं आजूबाजूला बसलेल्या अनेक स्त्रिया मंचावर येतात आणि या नवीन जोडप्यासोबत डान्स करायला लागतात. यात नवरा आणि नवरीकडील घरचे, इतर कुटुंबीय आणि मित्र परिवार असतो. त्यामुळे मंच एकदम भारल्यासारखा जाणवतो. ही सगळीच मंडळी त्यांच्या त्यांच्या परीने या गाण्यावर डान्स करतात. याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपलं होत असलेलं मनोरंजन. त्यातही शेवटची स्टेप तर कमाल गंमतीदार. सगळ्यांनाच ही स्टेप आणि एकंदर परफॉर्मन्स आवडून जातो.

व्हिडियोच्या शेवटी जेव्हा कॅमेरा सगळ्या उपस्थितांवरून फिरतो तेव्हा जवळपास प्रत्येक जण या डान्स परफॉर्मन्स साठी टाळ्या वाजवत असतात. हा व्हिडियो आहे जवळपास साडे नऊ मिनिटांचा. पण हा व्हिडियो बघायला नक्कीच मजा येते. ज्युलियन आणि मनू यांचं कौतूक वाटतं. या जोडीला आपल्या टिमकडून येत्या काळातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आपल्याला हा व्हिडियो तर आवडला असेलच. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम ही विविध विषयांवर लेखन करत आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असते. आपणही त्यास उत्तम असा प्रतिसाद देत असता. आपल्या टीमने लिहिलेले लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता, कमेंट्स मधून कौतुक करत असता. आपल्या या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद. आपली टीम यापुढेही आपलं मनोरंजन करत राहण्यास कटिबद्ध आहे. आपलाही लोभ आमच्यावर कायम असू द्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.