Breaking News
Home / मनोरंजन / ऑस्ट्रेलियात भारतीय लग्नामध्ये सर्वांनी मिळून केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियात भारतीय लग्नामध्ये सर्वांनी मिळून केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

भारतातील लग्नांचे व्हिडियोज वायरल होतात आणि त्यांच्याविषयी चर्चा ही होतेच. त्याचप्रमाणे परदेशात होत असलेल्या भारतीय लग्नांच्या बाबतीत ही बोललं जातं. आपल्या टीमने या विषयावर जास्त प्रमाणात लेखन केलं नव्हतं. पण आपल्या वाचकांचा कल लक्षात घेता आपली टीम येत्या काळात परदेशात संपन्न झालेल्या भारतीयांच्या लग्नाबाबत लेखन करणार आहे. तेव्हा नवनवीन विषयांच्या यादीत अजून एका विषयाची भर पडली आहे. या मांदियाळीतील एक व्हिडियो आपल्या टीमने नुकताच पाहिला आणि त्याच्याचवर आपल्या टीमने आजचा हा लेख लिहिण्यास घेतला आहे. चला तर मग सुरू करूयात हा नवीन प्रवास. हा व्हिडियो आहे ऑस्ट्रेलियात संपन्न झालेल्या एका भारतीय लग्नाचा. एका पंजाबी कुटुंबातील हे लग्न असावं असा कयास आपण करू शकतो. पंजाबी माणसं स्वभावाने मजा मस्ती करत, तेवढीच मेहनत करत पण मस्त असं आयुष्य व्यतीत करणारी असतात. त्यांच्या या स्वभावाचं प्रतिबिंब त्यांच्या लग्न समारंभातही दिसून येतं.

मस्त राजेशाही सजावट असलेल्या मंचावर अगदी बॉलिवूड स्टाईल ने चालत असलेली धमाल आपल्यालाही आवडून जाते. आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो सुद्धा असाच आहे. यात समोर मस्तपैकी सजवलेलं टेबल आणि त्यावर असलेली सगळी आरास तसेच सोबत डी जे आणि या डी जे च्या तालावर नाचायला तयार असणारी तरुण मंडळी असतात. व्हिडियोची सुरुवात करते ती एक मुलगी. प्रेम रतन धन पायो या गाण्याच्या सुरुवातीच्या शब्दांना ती अभिनय स्वरूप देते आणि कार्यक्रम सुरू होतो. मग दाखल होतात सगळ्या मुली. एकापेक्षा एक डान्स करणाऱ्या या मुली मग विविध गाण्यांवर मस्तपैकी डान्स करतात. त्यांनी खास या कार्यक्रमासाठी म्हणून डान्स बसवलेला असतो आणि तेवढीच तालीम ही केलेली असते हे कळून येतं. पण मग मुली एवढ्या मस्त डान्स करत असताना मुलं पाठी राहतील का? शक्यच नाही. त्यांची ही एन्ट्री एकदम धमाकेदार होते. गुलाबो सीताबो या चित्रपटाच्या मुख्य गाण्यावर ही मुलं आणि मुली धमाल डान्स करतात. त्यांच्या स्टेप्स एखाद्या चित्रपटातील डान्स ला शोभतील अशा असतात. त्यातही ‘लडकी ब्युटीफुल कर गयी चूल’ या गाण्यावरचा परफॉर्मन्स तर जबरदस्त. पुढे मुलांचा स्वतःचा असा परफॉर्मन्स होतो तो ही भाव खाऊन जातो.

शेवटच्या परफॉर्मन्स मध्ये अजून रंगत भरली जाते कारण त्याआधी पंजाबी भाषेत बोलला गेलेला संवाद आणि मग सगळ्यांनी एकत्र नाचत या परफॉर्मन्स ची केलेली सांगता. एखादा बॉलिवूड चित्रपट बघितल्यासारख आपल्याला न वाटलं तरच नवल. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. या सगळ्यांनी त्यात जीव ओतून केलेले डान्स या दहा मिनिटांच्या व्हिडियोत आपलं लक्ष खिळवून ठेवतात. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्यालाही हा अनुभव आला असेलच. या व्हिडियो सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे आपल्या टीमला कळू द्या. तसेच त्यात काही सुधारणा करता आल्या तर उत्तमच आहे. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्यात. तत्पूर्वी आपण वाचक म्हणून आपल्या टीमला जो उदंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद ! आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या टीमने लिहिलेले लेख शेअर करत असता त्याबद्दल धन्यवाद. आपला हा पाठिंबा येत्या काळातही आमच्या पाठीशी असू द्या. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.