Breaking News
Home / मनोरंजन / ‘ओ पप्पा उतरवा ना..’ आता यापुढे हा मुलगा कधी पाळण्यात बसणार नाही, शेवट पाहून हसू आवरणार नाही

‘ओ पप्पा उतरवा ना..’ आता यापुढे हा मुलगा कधी पाळण्यात बसणार नाही, शेवट पाहून हसू आवरणार नाही

काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी को’रोना काळाच्या आधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक तरुण पॅराग्लायडिंग इंस्ट्रक्टरला त्याला जमीनीवर उतरवण्यासाठी विनवण्या करत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पडताच तो वाऱ्यासारख व्हायरल झाला. त्यावर अनेक मीम्स बनले. या व्हिडीओतील तरुण त्याच्या या विनोदी व्हिडीओमुळे एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन बनला.

‘भाई लँड करा दे’ म्हणत म्हणत त्याने जो काही कारनामा केला होता, तो फक्त देशातच नाही तर जगभरात गाजला होता. हा तरुण त्याच्या इंस्ट्रक्टरला व्हिडीओमध्ये म्हणत होता की, “भाऊ बस लँड कर, भाऊ 500 जास्त घेऊन घे पण लँड कर”. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला होता. उंचीवर जाण्याची भीती असणारे अनेक लोक असतात. अगदी एखाद्या 4-5 मजली इमारतीची भीती वाटणारे अनेक लोक आपल्या आसपास वावरत असतात. जत्राची गम्मत पण तशीच असते. अनेक लोक हौसेने जत्रेत असणाऱ्या उंचच उंच अशा पाळण्यात हौसेने बसायला जातात. मात्र उंच गेल्यावर त्यांचे काय हाल होतात, हे मात्र खाली आल्यावर कुणी सांगत नाही.

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध लोकांचे डान्स व्हिडीओ तर खास चर्चेचा विषय ठरतात. अशा व्हिडीओंना आवडीने पाहिले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लहान मुलांचे अनेक कॉमेडी व्हिडिओ रोजच व्हायरल होताना आपल्याला दिसतात. हे व्हिडीओ असे आहेत की, ते कुणाचेही मन जिंकतात. लहान मुलांचे असे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच ते व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ आमच्या टीमकडे आला. या व्हिडीओत एक मुलगा आपल्या वडीलांसोबत पाळण्यात बसायला जातो. आता हा छोटासा पठ्ठ्या यापूर्वी कधीच पाळण्यात बसलेला नसतो. उंचीची भीती असूनही याला उंचीवर जाणाऱ्या पाळण्यात बसायचं असतं. हौसेने हा मुलगा पाळण्यात बसतो. सुरुवातीला त्याला मस्त वाटतं. तो एकदम भारी भारी डायलॉग मारतो. मजा येतेय, व्हेरी इंटरेस्टिंग, वगैरे तो म्हणत असतो.

अगदी उंची हवाई की उंचाइयो में… असले काही जमतील तसे हिंदी डायलॉग पण मारत असतो. जसा जसा पाळणा जलदगतीने वर जायला लागतो, तशी तशी त्याला भीती वाटायला लागते. मग अजून थोडा स्पीड वाढतो आणि आता त्याची भीतीने चांगलीच गाळण उडायला लागते. मघाशी हिरोप्रमाणे डायलॉग मारणारा हा पोरगा एकदम बारीक आणि रडके तोंड करून पाळणा थांबवायला सांगत असतो. आई, ताई, काका, मामा, मावशी अशा सगळ्या नातेवाईकांची नावे घेऊन तो थकतो, मात्र तरीही पाळणा काही थांबत नाही. त्याचे वडीलही त्याची मजा घेत असतात. कशी तुझी मज्जा केली आणि जिरवली, असेच त्यांना मनातून कदाचित म्हणायचे असेल. भारी हौस कधी कधी महागात कशी पडते, याचा हा व्हायरल व्हिडीओ उत्तम नमुना आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *