सकाळी दूधवाला आला, दूध घेत असताना शेजारच्या लहान मुलाला तो चेष्टेने म्हणाला… ओ शेठ… ते लहान पोरगं ‘तुम्ही नादच केलं थेट’ असं म्हणत घरात पळालं. सध्या हे गाणं उभ्या, आडव्या आणि अख्ख्या महाराष्ट्रात ट्रेंडिंगला आहे. ‘ओ शेठ, तुम्ही नादच केला थेट’ या गाण्याने महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला आहे, ते पाहून अगदी सैराटच्या गाण्यांची आठवण झाली. या गाण्यावर अगदी सेलेब्रिटीपासून तर सामान्य माणसापर्यंत सगळेच रिल्स बनवत आहेत. व्हाट्सएपपासून इन्स्टाग्रामपर्यंत या एकाच मराठी गाण्याची क्रेझ आहे. या गाण्यामुळे अनेक साधी माणसं व्हायरल होत आहेत. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही.
या गाण्यावर बनवलेली अशीच एक क्लिप व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये एक शेतकरी आणि त्याची एकदम भन्नाट असा डान्स करणारी मुलगी दिसत आहे. अवघ्या 4 वर्षांच्या या मुलीने अवघ्या मराठी जनांना भुरळ घातली आहे. ही चुणचुणीत मुलगी एकदम मांडीवर थाप वगैरे देऊन डान्स करताना दिसते. हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे एक महत्वाचे कारण आहे, ते म्हणजे या मुलीचे एक्सप्रेशन्स.
‘कृषीकन्या’ या टॅगखाली तिचं हे गाणं खूप व्हायरल झालं आहे. ‘आताशीक गाणं शोभलं’ अशा प्रतिक्रिया लोकांच्या आहेत. ही कृषिकन्या अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणीची आहे. कृपा दीपक वाकचौरे असे तिचे नाव आहे. तिला डान्सची आवड असल्याचेही समोर आले आहे. एवढेच नाही तर ती नृत्य प्रशिक्षणही घेत असल्याचे समजते. रानाच्या बांधावर कृपाचा डान्स आणि यात तिच्या वडिलांनी दिलेली साथ आता सोशल मीडियावरही कौतुकाची ठरत आहे. हा व्हिडीओ बघता ही रानाच्या बांधावर डान्स करणार आणि आपलं मन जिंकणारी लहानगी पोरगी एखाद्या डान्स रिऍलिटी शोमध्ये झळकणार, याचा विश्वास आपल्याला वाटतो. इतक्या कमी वयात तिचा असणारा आत्मविश्वास, बिटवर दिलेले एक्सप्रेशन्स आणि प्रत्येक ठिकाणी एकदम तालेवार असणारे नृत्य पाहून भले भले नाचणारे थक्क झाले असणार, यात काही शंकाच नाही.
सध्या खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांची मुले टीव्हीवर झळकत आहेत. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम’ असं म्हणत ही खेड्यातील पोरं शहरी पोरांना टशन देत आहेत. अर्थात शहरातील मुले काही कमी नाहीत. पण त्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा आणि तुलनेने एकदम साध्या साध्या गोष्टींसाठी करावा लागणारा संघर्ष हा मोठा असतो. आणि म्हणूनच खेड्यातील मुलांचे कौतुक थोडे जास्त केले जाते.
कृपाच्या या व्हायरल व्हिडीओच्या निमित्ताने पुन्हा एकदा खेड्यातील अस्सल टॅलेंट बाहेर आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने व्हिडीओ व्हायरल झाला त्यावरून लोकांनी हे टॅलेंट मान्यही केलं आहे, असं समजतं. कृपाला भविष्यात नक्कीच मोठे यश मिळणार, हे या व्हिडीओमधून दिसून येतं कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
बघा व्हिडीओ :