को’रोनाचा सुरुवातीच्या काळात म्हणजे पहिल्या लॉकडाऊन दरम्यान लोकांमध्ये प्रचंड नकारात्मकता पसरलेली होती. त्याच दरम्यानच्या काळात चीन-भारताचे यु’द्ध होणार, अशाही वावड्या उठू लागल्या होत्या. भारत सरकारने चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. त्यामुळे भारताच्या कंपन्यांनी बनवलेले खूप नवनवीन ऍप्स येत होते. शॉर्ट व्हिडीओचे, गेमिंगचे तसेच इतरही अनेक मनोरंजन करणारे ऍपचा सुळसुळाट झाला होता. को’रोना, परीक्षा, नोकरदारांचे पगार, गरिबांचे काम यापेक्षा जास्त चर्चा टिकटॉक ऍपला येणाऱ्या पर्यायाची होत होती. आणि मग टिकटॉकला पर्याय ठरणाऱ्या ऍपची लाट आली. आणि मग सुरू झाला मनोरंजनाचा धमाका. उठसूट कुणीपन व्हिडीओ बनवू लागलं होतं. आता सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवणे, हे पैसे कमवण्यापेक्षा जास्त महत्वाचे वाटू लागले होते.
कारण लोक कामावर असतानाही व्हिडीओ बनवायचे. सोशल मीडियावर येणाऱ्या वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये सहभागी व्हायचे. त्यादरम्यान काही मोजके व्हिडीओ असे व्हायरल झाले की, ज्याने त्या नकारात्मक काळात लोकांना खूप हसवले. त्यातलाच एक व्हिडिओ आता आमच्या हाती लागला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ कंडक्टर मंडळींचा होता. मात्र त्यात धमाल फक्त एकच कंडक्टरने आणली होती.
कंडक्टर म्हटलं की, आपल्यासमोर एक खडूस, चेहऱ्यावर सतत बारा वाजले, रागीट स्वभाव, खेकसून बोलणे, अशी मूर्ती येते. तुम्ही एसटीने प्रवास करताय आणि कंडक्टरची कुणासोबत किरकिर झाली नाही, असा प्रवास कुणालाच आठवत नाही. अर्थात काही कंडक्टर अगदी याच्या विरुद्ध स्वभावाचे असतात. आता कंडक्टरही हसू शकतात, मजा करू शकतात, या गोष्टी सहजासहजी कुणाला पटत नाहीत, कारण आपण प्रवासात त्यांचा अनुभव वेगळाच घेतलेला असतो.
मात्र को’रोना दरम्यानच्या काळात अनेक कंडक्टर मंडळी लोकांना हसवत होती, लोकांचे मनोरंजन करत होती. आता तुम्ही म्हणाल कसे… लांबचा प्रवास असेल तर एकदा तिकीट काढले की कंडक्टर निवांत होतात. अशाच मधल्या वेळेत कंडक्टर मंडळी शॉर्ट व्हिडीओ काढायचे. स्टँडवर अनेक कंडक्टर व्हिडीओ काढायचे. त्यामुळे कंडक्टर असणाऱ्यांची खडूस प्रतिमा लोकांच्या मनातून दूर झाली. आणि अशातच एका कंडक्टरच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला. ‘आखीयो से गोली मारे’ या गाण्यावर त्यांनी मनोरंजनसाठी हा व्हिडीओ काढला… मात्र निसर्गाची किमयाच न्यारी… जोरदार वारा आला आणि हा व्हिडीओ भलताच कॉमेडी झाला. आता नेमकं काय घडलं हे बघण्यासाठी व्हिडीओ तर बघावाच लागणार ना भाऊ… आम्ही व्हिडीओ खाली देत आहोत नक्की पाहून घ्या. आणि आपले युट्युबवरील ‘मराठी गप्पा’ हे चॅनेल सुद्धा सबस्क्राईब करा.
बघा व्हिडीओ :