Breaking News
Home / मनोरंजन / कधीकधी अतिआत्मविशास घा’तक ठरू शकतो म्हणून कधीच कोणाला कमी समजू नका, बघा हा व्हिडीओ

कधीकधी अतिआत्मविशास घा’तक ठरू शकतो म्हणून कधीच कोणाला कमी समजू नका, बघा हा व्हिडीओ

खेळाचा सामना म्हंटला म्हणजे दोन प्रतिस्पर्धी आले, त्यांच्यातील ल’ढत आली आणि त्यातील एक विजेता ही आलाच. पण या सगळ्यांसोबतच अजून दोन गोष्टी आपल्याला अतिशय आनंद देऊन जातात. त्या म्हणजे, खेळाडूंनी सामना जिंकण्यासाठी दिलेली चुरशीची ल’ढत आणि वेळप्रसंगी दाखवलेली कल्पकता. एरव्ही केवळ जिंकणाऱ्या संघांचं किंवा खेळाडूचं कौतुक होतं. पण सोबतच प्रतिस्पर्धी संघाने कल्पकता दाखवत चुरशीची ल’ढत दिली असेल तर त्यांचं विशेष कौतुक होतं. अशाच एका चुरशीच्या सामन्यातील कल्पक क्षण एका व्हिडियोत कैद झाला आणि यथावकाश हा व्हिडीओ वायरल ही झाला. हा व्हिडियो आहे एका कबड्डीच्या सामन्याचा. यात एक संघ घरच्या मैदानावर खेळतो आहे असं जाणवतं. कारण, सर्व्हिस करायला येणाऱ्या खेळाडूला उपस्थितांकडून प्रचंड पाठिंबा मिळत असतो.

माहोल एकदम कबड्डीमय झालेला असतो. सर्व्हिस करायला आलेला हा खेळाडू असतो अगदी उंचपुरा आणि तगडा. तो येतो आणि पाहता पाहता प्रतिस्पर्धी संघाच्या एका खेळाडूला आउट ही करतो. उपस्थितांकडून एकच जल्लोष होतो. पाठीमागे चालू असलेलं गाणं थांबतं त्यामुळे हा जल्लोष एकदम घुमतो. पण प्रतिस्पर्धी खेळाडूला आउट केल्यानंतर सर्व्हिस करणारा खेळाडू परतून जात नाही. तो उलटा फिरतो आणि मधल्या रेषेवर येऊन उभा राहतो. कबड्डीत हे होताना आपण अनेक वेळेस पाहिलेलं आहे. पण सहसा अशा वेळी दोन्ही खेळाडू एकमेकांना हात लावून दूर जातात जणू काही एका अर्थाने यशस्वी सर्व्हिस केल्याचं दोन्ही खेळाडू मान्य करतात. पण इथे मामला थोडा वेगळा दिसतो. कारण सर्व्हिस केलेला खेळाडू तसाच उभा असतो म्हणून आउट झालेला खेळाडू सरळ त्याच्या समोर जाऊन उभा राहतो. आपल्याला क्षणभर वाटून जातं की आता दोघे यशस्वी सर्व्हिस मान्य करून आपापल्या भागात निघून जातील. पण कसंच काय.

दोघेही एकमेकांसमोर उभेच. अशावेळी काय होऊ शकतं याची एक शक्यता आपल्या डोळ्यासमोर येते न येते तोच ती शक्यता खरी होऊन जाते. कारण सर्व्हिस करायला आलेल्या खेळाडूचा अति आत्मविश्वास नडलेला असतो. होतं हे की आउट झालेला खेळाडू जेव्हा जवळ येतो, तेव्हा तो प्रतिस्पर्ध्याच्या अंदाज घेतो. त्याच्या लक्षात येतं. हा खेळाडू बेसावध आहे. सर्व्हिस करायला आलेला खेळाडू एवढा धिप्पाड तर आउट झालेला त्याच्या मानाने अगदी बारीक. पण म्हणतात ना, प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नये. तेच इथे घडताना दिसतं. कारण जो पर्यंत सर्व्हिस करायला आलेला खेळाडू रेषेच्या अलीकडे आहे तोपर्यंत त्याने हात लावलेला खेळाडू आउट म्हणून ग्राह्य धरता येत नाही. तसेच त्याला इतर खेळाडूही मदत करू शकतात. इथे तेच तर घडतं. सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूला आउट झालेला खेळाडू उचलून आपल्या भागात आणतो आणि त्याला मदत करायला अख्खी टीम धावून येते. गंमत अशी की आत्ता पर्यंत मोठ्या आवाजात वाजणारी गाणी तर बंद झालेली असतातच सोबत पाठिंबा देणारे प्रेक्षकही ‘हे काय झालं अचानक’ ह्या अविर्भावात गप्प बसलेले दिसतात.

उलट आत्ता आत्ता पर्यंत आपला एक गडी बाद झाला असं वाटणारी टीम मात्र उत्साहात त्यांनी कल्पकतेने मिळवलेला एक पॉइंटचा आनंद साजरा करत असते. आपणही त्यांच्या या आनंदात सामील झालेलो असतो. कारण चुरस आणि कल्पकता या दोन्ही गोष्टी प्रेक्षक म्हणून आपल्याला आवडतातच. हा लेखही आपल्याला आवडला असेलच, तेव्हा त्याला सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या टीमने वायरल व्हिडियोज वर लिहिलेले इतर लेखही डोळ्यांखालुन घाला आणि त्यांचाही आनंद घ्या. त्यासाठी आपल्या वे’बसा’ईटवर असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा. आपल्याला विविध लेख वाचायला मिळतील. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *