Breaking News
Home / मनोरंजन / कपल डान्स करताना मुलगी सोडून गेली, पण त्यानंतर मुलाने जे केलं ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

कपल डान्स करताना मुलगी सोडून गेली, पण त्यानंतर मुलाने जे केलं ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

गॅदरिंग म्हणजे शाळेतील पूर्ण वर्षाचा सुवर्णदिवस. शाळेत असताना आपण या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला स्नेहसंमेलन म्हणत असू. हे स्नेहसंमेलन म्हणजे शाळेतील सगळ्यात मोठा, महत्वाचा उत्सव. शाळेसाठी ही जणू दिवाळीच असते. शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे सगळीकडे एक टिपिकल कार्यक्रम असतो. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम सुरू होणार असतो पण 4 वाजल्यापासून मुले-मुली मेकअप करून आपल्या डान्स/नाटकाच्या वेशात बसलेली असतात. मोठया वर्गातील काही दनगट मुले ही स्वयंसेवक म्हणून काम पाहत असतात. पिटीचे सर किंवा मॅडम रांगोळीपासून तर सत्कार, बक्षिसे अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कार्यक्रम शेवटपर्यंत शांततेत पार पडेल, यावरही त्यांचंच लक्ष ठेवून असतात. ‘प्रोग्रॅम पाच मिनिटांत सुरू होईलच,’ अशी अधून-मधून घोषणा होत असते मात्र तरीही दर 5 मिनिटांनी स्टेजवरचा पडदा तसाच असतो. आणि मग सुरू होतात डान्स.. कुठे कुणी भारी डान्स करतो, कुणी नाचता नाचता पडतो… कुणी स्टेप्स आठवल्या नाही की स्टेज सोडून पळतो… अशी धमाल फजिती चालूच असते.

आज आमच्याकडेही असाच एक भारी डान्स व्हिडीओ आलेला आहे, ज्यात फजिती तर झालीच आहे पण त्यासोबत एका पठ्ठ्याने पोरगी सोडून गेली तरी डान्स एकट्याने कपल डान्स करण्याचा कॉन्फिडन्स दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या ना त्या कारणाने व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खळखळून हसायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसतो. कधी कधी व्हिडीओ चित्रित करताना एखादी गोष्ट घडते आणि ती वाऱ्यासारखी पसरते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान कलाकार सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतील. पण कधी-कधी चांगले काम करत असताना विचित्र घटना घडते. असंच काहीसं स्टेजवर नाचणाऱ्या मुलांसोबत घडलं आणि एकच धावपळ उडाली. मात्र आपली नाचणारी जोडीदार सोडून गेल्यावर या मुलाने जे केलं ते पाहून पब्लिकने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

तर झालं असं की, 2 मुले व 2 मुली अशा एकूण 2 जोड्या एका गाण्यावर डान्स करत होते. मात्र यातील एक मुलगी आपल्या जोडीदाराला सोडून जाते. तोही काही सेकंदासाठी तिच्या मागे पळतो पण परत स्टेजवर येऊन तो एकटाच डान्स सुरू करतो. अगदी ती मुलगी आहे, असे कल्पना करून तो डान्स करू लागतो. यानंतर पब्लिकने त्याच्यासाठी नादखुळा टाळ्या वाजवल्या.

व्हायरल व्हिडिओ एका कार्यक्रमादरम्यान रेकॉर्ड करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला सभागृह प्रेक्षकांनी भरलेला दिसेल. मोठा स्टेजही तयार आहे. यावर ही मुलं मुली नाचायला येतात. गाणं सुरु होताच यांचा परफॉर्मन्स सुरू होतो. प्रेक्षकही नृत्याचा आनंद घेताना दिसत आहे. दरम्यान नाचत असताना मुलगी पळाली आणि पुढे काय घडलं, हे तुम्हाला व्हिडीओत पाहायला मिळेल. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.