काजोल आणि अजय देवगण ११ वर्षानंतर एकत्र ‘तानाजी’ ह्या चित्रपटात दिसून येणार आहेत. तानाजी चित्रपटात काजोल वीर तानाजी ह्यांच्या पत्नी सावित्री बाई ह्यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज होत आहे. काजोल आणि अजय देवगण दोघेही ह्या चित्रपटाचे खूप जोरदार प्रमोशन करत आहेत. ह्या चित्रपटात सैफ अली खान सुद्धा दिसून येणार आहे. काही दिवसांअगोदरच काजोलने आपल्या जुन्या दिवसांना उजाळा देत एक दुःखद घटना शेअर केली. काजोलने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक पोस्ट शेअर केली. ह्यात तिने सांगितले कि ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाच्या दरम्यान तिचा गर्भपात झाला होता. इंस्टाग्रामवरील लोकप्रिय पेज ‘ऑफिशिअल ह्यूमन ऑफ बॉंबे’ ला दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने सांगितले कि, ‘आम्ही २५ वर्षांअगोदर हलचल चित्रपटाच्या सेट वर पहिल्यांदा भेटले होते. मी शूटिंग साठी तयार होती आणि विचारले होते कि माझा हिरो कोण आहे. कोणीतरी अजयच्या दिशेने इशारा केला.’
‘तो एका कोपऱ्यात बसला होता. अजयला भेटण्याअगोदर मी १० मिनिटे अगोदर मी त्याच्याबद्दल वाईटसाईट बोलली होती. नंतर आम्ही सेटवर बोलणं सुरु केले आणि आम्ही चांगले मित्र झालो. आम्ही दोघेही त्यावेळी कोणा दुसर्यांसोबत डेट करत होते. मी त्यावेळी त्याला माझ्या बॉयफ्रेंड बद्दल तक्रार केली. लवकरच आमचे ब्रेकअप झाले. आम्ही दोघांपैकी कोणीच एकमेकांना प्रपोज केले नाही. परंतु हे माहिती होते कि आम्ही सोबत आहोत. ४ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी अजय देवगणचे कुटुंब तर राजी झाले, परंतु माझ्या वडिलांनी माझ्याशी ४ दिवसापर्यंत बोलणं केले नाही. त्यांची इच्छा होती कि मी माझे लक्ष करिअर वर फोकस करावे, परंतु मी लग्नाचा निर्णय घेतला होता. आम्ही मीडियाला लग्नासाठी चुकीचे ठिकाण सांगितले.’
‘आमची अशी इच्छा होती कि, हा दिवस फक्त आमचा राहावा. ह्यामुळे आम्ही घरातच लग्न केले होते. मला एक मोठे हनिमून हवं होते. त्यामुळे आम्ही सिडनी, हवाई आणि लॉस एंजलीस येथे गेलो. तिथे अजय आजारी पडला. त्याने मला सांगितले कि आता घरी जाऊया, आमचा इजिप्त जायचा प्लॅन होता परंतु आम्ही तेथे जाऊ शकले नाही. काही काळानंतर आम्ही मुलांबद्दल प्लॅनिंग केली. कभी खुशी कभी गम चित्रपटाच्या वेळी मी गरोदर होती, परंतु त्यादरम्यान माझे गर्भपात झाले. चित्रपट थेटरमध्ये खूप चांगली कमाई करत होता, परंतु मी त्यावेळी हॉस्पिटल मध्ये होती. त्यानंतर माझे अजून एकदा गर्भपात झाले. मी खूप दुखी झाली होती. त्यानंतर मी निसा आणि युग दोघांना जन्म दिला. आणि आमचे कुटुंब पूर्ण झाले. अजय आणि मी दोघेही जास्त रोमँटिक नाही आहेत परंतु एकमेकांची काळजी घेत असतो.’