चित्रपटसृष्टीत काही चित्रपट असे असतात, जे अनेक वर्ष लोटली तरी लोकांच्या मनात घर करून राहतात. होय, यापैकी एक ‘कभी ख़ुशी कभी गम’ हा चित्रपट आहे. जो साल २००१ मधे प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन भलेही १८ वर्षे झाली असतील पण अजूनही लोकं या चित्रपटा बद्दल बोलतात आणि हा चित्रपट प्रेक्षकांना बघायला आवडतो. टेलिव्हिजन वर जेव्हा केव्हा हा चित्रपट येतो तेव्हा लोकं या चित्रपटा विषयी बोलतात आणि अगदी आवडीने पाहतात. या चित्रपटात लोकप्रियता कलाकारांनी काम केले आहे. जसे कि अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ह्रितिक रोशन, करीना कपूर, राणी मुखर्जी आणि जया बच्चन ह्या सारख्या स्टार्सनी मुख्य भूमिका निभावल्या होत्या. चित्रपटाची कथा लोकां मधे खूप जास्त लोकप्रिय आहे. या चित्रपटाची स्टोरी कोणीही तोंड पाठ सांगू शकेल.
आम्ही करीना कपूर बद्दल बोलत आहोत. चित्रपटात करीना कपूरचे बालपण दाखवले आहे. तिने चित्रपटात पूजा नावाच्या मुलीची भूमिका केली आहे. मोठ्या पूजाची भूमिका करीना कपूरने केली होती तर बालपणीच्या पूजाची भूमिका मालविका राज हिने केली होती. चला तर जाणून घेऊया चित्रपटातील हि बालपणीची पूजा आता कशी दिसते १८ वर्षानंतर.
खूप देखणी दिसते मालविका राज
‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात मालविका राजने छोट्या करीनाची भूमिका साकारली होती. तिला पाहून सगळ्यांचे डोळे भरून आले. या मुलीने चित्रपटातील आपल्या अभिनयाने सगळ्यांचे मन जिंकले होते. पण आत्ता हि मुलगी मोठी झाली आहे, जी दिसायला सुंदर आहे. खरं आहे मालविका राजचे फोटो सोशिअल मीडियावर खूप वायरल होत आहेत. या फोटोंना पाहून तुम्ही हे नाही सांगू शकणार की हीच पूजा आहे, जिने करिनाच्या बालपणीची भूमिका केली होती.
खूपच कमी लोकांना माहिती आहे कि मालविकाचे चित्रपटसृष्टीशी खूप जवळचे नाते आहे. मालविका लोकप्रिय अभिनेते जगदीश राज ह्यांची नात आणि स्क्रीन रायटर बॉबी राज ह्यांची मुलगी आहे. मालविकाने २०१७ साली आलेल्या ‘जयदेव’ ह्या तेलुगू चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती. मालविका चित्रपटांत पुन्हा एकदा दिसणार आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय व्हिलन डॅनी गोंजाप्पा ह्यांचा मुलगा रिनजिंग सोबत ती ‘स्कॉईड’ मध्ये मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत दिसेल. चित्रपटांशिवाय तिला मॉडेलिंगचासुद्धा शौक आहे. मालविकाने मिस इंडिया पेजेंट मध्ये सुद्धा भाग घेतलेले आहे.
इमरान हाशमी बरोबर होती दिसणार
सूत्रांच्या माहिती नुसार मालविका राज इमरान हाशमी सोबत एका चित्रपटात दिसणार होती, ज्याचे पोस्टर सुद्धा २०१७ मध्ये रिलीज झाले होते. पण काही कारणाने चित्रपट अर्ध्यावरच राहिला, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. मीडियाच्या रिपोर्टनुसार मालविका राज ‘स्कॉईड” मधे दिसेल. पण तिची इमरान हाशमी सोबत चित्रपट करण्याची खूप इच्छा होती, जो चित्रपट काही कारणास्तव रिलीज होऊ शकला नाही.
मालविका राजचे आहेत लाखो फॅन्स
जेव्हा छोट्या पुजाची भूमिका तिने केली होती, तेव्हा कोणालाही माहिती नव्हते की ती एवढी देखणी दिसेल. पण आत्ता हे बदलून गेले आहे. आत्ता मालविका राज खूप सुंदर दिसते. आणि ती सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यां साठी एक नवीन फोटो शेअर करीत असते. त्यामुळे तिचे लाखो चाहते आहेत. इतक्या मोठ्या कालावधीमध्ये मालविकाच्या लूक मध्ये खूप बदल झाला आहे, काही फोटोंमध्ये तर तिला ओळखणे देखील कठीण आहे.