बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान ह्याला आता बॉलिवूडमध्ये ३० वर्षांपेक्षा सुद्धा जास्त काळ झाला आहे. इतक्या वर्षांमध्ये सलमानने अनेक चित्रपटांमध्ये कामे केली, परंतु मैने प्यार किया हा चित्रपट नेहमीच त्याच्या हृदयाच्या जवळ स्थान असलेला चित्रपट आहे. १९८९ मध्ये आलेल्या ह्या चित्रपटातून सलमानला चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच यशाची गोडी चाखता आली होती. बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आज एक खूप मोठा सुपरस्टार आहे. केवळ त्याच्या नावाच्या जोरावरसुद्धा अनेक चित्रपट सुपरहिट झाली आहेत. जर त्याच्या फीस बद्दल बोलाल तर आज कोणताही निर्माता त्याला चित्रपटासाठी साइन करण्याअगोदर १०० वेळा विचार करतो. सलमान बॉलिवूडमधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सहजरित्या ३०० ते ४०० कोटी रुपये कमावतात.
आज सलमान खान आपल्या एका चित्रपटासाठी १०० कोटीपेक्षासुद्धा जास्त मानधन घेतो. परंतु तुम्हांला माहिती आहे का, सलमानने आपला पहिला सुपरहिट चित्रपट किती रुपयांमध्ये साईन केला होता. सलमान खानने ‘मैने प्यार किया’ ह्या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून पर्दापण केले होते. परंतु हा सलमान खानचा पहिला चित्रपट नव्हता. सलमान खानने आपल्या करिअरची सुरुवात ‘बीवी हो तो ऐसी’ ह्या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट १९८९ मध्ये रिलीज झाला होता. एका मुलाखतीदरम्यान सलमान खान ने सांगितले होते कि, त्याचा एक मित्र ताज हॉटेलमध्ये मागे डान्स करायला गेला होता आणि तो सोबत मला सुद्धा घेऊन गेला होता. मी फक्त मजेसाठीच काम केले होते. तिथे त्याला ह्या कामासाठी ७५ रुपये दिले गेले. ह्यानंतर सलमान खान एका सॉफ्ट ड्रिंक कॅम्पा कोला मध्ये काम करू लागला. ह्यासाठी इथे त्याला सुरुवातीला ७५० रुपये मिळाले आणि काही वेळानंतर १५०० रुपये मिळू लागले.
सलमानला मुख्य अभिनेता म्हणून एक चित्रपट ऑफर झाला. त्याला त्याच्या मुख्य अभिनेता म्हणून पहिल्या चित्रपटासाठी केवळ ३१ हजार रुपये मिळाले होते. हा चित्रपट होता ‘मैने प्यार किया’. खरंतर, सलमान त्यावेळी चित्रपटसृष्टीत खूप नवीन होता आणि त्याचे करिअर सुद्धा विशेष काही खास नव्हते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला. त्यामुळे सलमानचे इंडस्ट्रीतले वजन वाढले. ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्यानंतर ह्या चित्रपटाचे निर्माता सुरज बडजात्या ह्यांनी त्याला अजून ७५,००० रुपये दिले. सलमानचा हा चित्रपट ३१ वर्षाअगोदर आला होता. ह्या चित्रपटात सलमान खूपच सडपातळ होता. सलमानने सांगितले कि त्यावेळी वजन वाढवण्यासाठी संघर्ष असायचा. त्यावेळपासूनच सलमान आपल्या फिटनेसवर खूप लक्ष द्यायचा. त्याने सांगितले कि तो त्यावेळी वजन वाढवण्यासाठी जे मिळेल ते खात असायचा. मैने प्यार किया चित्रपटादरम्यान सलमानने ३० रोटी आणि केळी खायचा. सुरुवातीपासून फिटनेसकडे लक्ष दिल्यामुळे तो तरुणांचा फिटनेस आयडल झाला. आताही वयाची पन्नाशी पार करूनही त्याचे फिटनेस तरुणांना लाजवेल असे आहे.