चित्रपटसृष्टीत रोज अनेक लोकं येतात आणि रोज अनेक लोकं निघून सुद्धा जातात. ह्यातीलच काही लोकं असे सुद्धा असतात जे इथे खूप मोठी स्वप्ने घेऊन येतात, परंतु त्या स्वप्नांना अर्धवट सोडूनच एका अनोळख्या जगात निघून जातात. काही स्टार्सना तर चित्रपट आणि नाटकांमध्ये तर काम मिळते परंतु ते फक्त ‘वन टाइम वंडर’ बनून राहतात. त्यानंतर त्यांचा काही ठावठिकाणाच नसतो. आज आपण अश्याच एका स्टारबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही शाहरुख आणि प्रीती झिंटाचा ‘कल हो ना हो’ हा चित्रपट तर पाहिलाच असेल. त्या चित्रपटात तुम्ही क्युट अश्या एका छोट्याश्या मुलीला सुद्धा पाहिलं असेल. आम्ही झनक शुक्ला हिच्या बद्दल बोलत आहोत. झनक शुक्लाने ९० च्या दशकात टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘करिश्मा का करिश्मा’ मध्ये काम केले होते. खूप काळापर्यंत चाललेल्या ह्या शो मध्ये झनक ला प्रेक्षकांचे खूप प्रेम लाभले. झनकचे हे यश पाहून कोणालाच अंदाज नव्हता कि हि मुलगी एके दिवशी अनोळखी जगाचा भाग बनून जाईल.
झनक आर्कियॉलॉजिस्ट असून सध्या जीवनाचा आनंद घेत आहे. काही दिवसांअगोदर झनकचा एक व्हिडीओ वायरल झाला होता, ह्या व्हिडीओ मध्ये तिने सांगितले कि, शाहरुखच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटासाठी तिने दिलेले ऑडिशन खूप खराब गेले होते. झनकने बालकलाकार म्हणून ‘कल हो ना हो’ चित्रपटात जिया कपूरची भूमिका निभावली होती. ह्यासोबतच झनकने इरफान खानच्या सोबत डे’डलाईन चित्रपटात सुद्धा उत्कृष्ट काम केले होते. बालकलाकार म्हणून देशभरात आपली एक वेगळी ओळख बनवणारी झनक आता खूप मोठी झाली आहे. जर ती आता तुमच्या समोर जरी आली तरी तुम्ही कदाचित ओळखूही शकणार नाहीत.
झणकणे सांगितले कि, ‘माझे रिटायरमेंट आता पासूनच चालू झाले आहे, असे माझे आईवडील सांगतात.’ ती पुढे म्हणाली कि अगोदर ती खूप म’स्तीखोर होती, परंतु आता त्याच्या अगदी त्याच्या उलट आणि खूप शांत झाली आहे. माझ्या पालकांनी सांगितले कि बालपणी मी अभिनयाचे खूप काम केले आहे, ह्यामुळे आता मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. असं बिलकुल नाही कि तिला अभिनयक्षेत्रात पुन्हा परत यायचे नाही वैगेरे.
झनकने पुढे सांगितले कि तिच्या पालकांना सुद्धा वाटत होते कि तिने अभिनायातून थोडा ब्रेक घ्यावा आणि तिला इतिहास ह्या विषयात खूप रुची होती, त्यामुळे आता ती आर्कियॉलॉजिस्टचे काम करत आहे. तिने सोबतच आपल्या बालपणाबद्दलसुद्धा सांगितले. तिच्या मतानुसार ती विचार करायची कि २४ च्या वयामध्ये लग्न करून सेटल होईल वैगेरे. तिने पुढे सांगितले कि, जे मला करायचे आहे त्यासाठी मला पै’श्यांची गरज असणार, परंतु त्याचे अर्थ असे नाही कि मी माझे ध्येय मध्येच सोडून देऊ.
तुमच्या माहितीसाठी, झनकची आई सुद्धा इंडस्ट्रीमध्ये खूप काळापासून काम करत आहे. ती अनेक लोकप्रिय सीरिअल्सचा भाग राहिलेली आहे. त्यांचे नाव सुप्रिया शुक्ला आहे. सुप्रिया शुक्ला टेलिव्हिजन दुनियेचा एक यशस्वी चेहरा आहे. सध्या त्या ‘कुंडली भाग्य’ सिरीयल मध्ये सरला अरोरा हे पात्र निभावत आहेत.