लग्न असो हळद असो वा गणेशोत्सव असो… कार्यक्रम कोणताही असो आपल्याकडं नाचणं कम्पलसरी असतं. नाचणाऱ्यांमध्ये पण 2 प्रकार येतात. एक स्वतःहुन नाचायला सुरुवात करणारे. आणि दुसरे कुणीतरी आपल्याला नाचायला ओढील, ही आशा मनात ठेवुन जागच्या जागी पाय हलवत नाचणारे. कधी कधी मोठा हिरमोड पण होतो. कारण कुणी नाचायला ओढुनही नेत नाही आणि कुणी बोलवत पण नाही. मात्र कुणी बोलवो न बोलवो… आपल्याच जगात रममाण असणारे लोक नाचायला सगळ्यात पुढे तयार असतात. जोडीला कुणी नसलं तरीही हे एकटे नाचू शकतात. आता नाचणं हे नाचणं असतं. त्याला आपण चांगलं वाईट ठरवू शकत नाही. कारण एखादा माणूस 5 मिनिटात असे नाचून दाखवतो की, सगळ्यांचे होश उडतील. आणि एखादा माणूस दोन्ही हाताची अंगठ्याशेजारची 2 बोट वर करून किमान तासभर नाचू शकतो. तर नाचणं म्हणजे एकेकाची वेगवेगळी स्टाईल असते. आता आपल्याकडे गणेशोत्सव सुरू झालेला आहे. त्यात नाचणं गाणं चालू असेल. अर्थात हे सगळं को’रोनामुळे बंधनात चालू आहे.
आमच्या हाती आता एक असा व्हिडीओ आला आहे, जो मागच्या 2 वर्षांपूर्वीचा असावा. कारण तेव्हा को’रोना नव्हता आणि लोकं बिनधास्त नाचायची, बागडायची आणि गळाभेट घ्यायची. आता या गोष्टी केल्या जात नाहीत. मात्र तरीही गणेशोत्सव आणि मनमोकळं नाचणे, हे एक कधीच तुटणार नाही असं दमदार समीकरण आहे. ज्याला नाचता येत तो तर नाचतोच पण ज्याला नाचता येत नाही, असाही माणूस गणपतीच्या 10 दिवसात एकदा का होईना पाय आपटून नाचतोच नाचतो. आणि जो हलणार नाही, डुलणार नाही तो माणूसच कसला भाई…. आता आमच्या हाती लागलेला व्हिडीओ भलताच व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ बघून भले भले डान्सर थक्क होत आहेत. अनेक लोकांनी यावर एकदम गमतीदार प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कारण या व्हिडीओत असणाऱ्या व्यक्तीने डान्सच असला भयंकर केलेला आहे. म्हणजे हा व्हिडिओ नाचणारा व्यक्ती ना मनमोकळं नाचत आहे, ना एकदम अंग चोरून नाचत आहे. यांनी केलेला डान्सचा प्रकार नेमका कोणता हे बघायचं झाल्यास एखादा नवीन नृत्य प्रकार समोर येईल.
कधी कधी तर या माणसाने ‘देशी’ घेऊन डान्स केला की काय? अशी शंका येते. पण काय आहे ना… प्रत्येकाची डान्स करायची की एक स्टाईल असते. तशीच या व्हिडीओतील काकांची ही डान्स स्टाईल असावी. यांच्या नाचण्याची अजून एक भारी गोष्ट आहे. ती म्हणजे सर्वसामान्य माणसाला नाचण्यासाठी जोडीदार असेल तर अजून मजा येते. मात्र या माणसाने एकट्यानेच नाचत स्वतःच डान्स एन्जॉय केला आहे. आणि आपण वेड्यासारखा नाचत आहोत, याची कल्पना असूनही त्यांनी डान्स थांबवला नाही. ते तसे नाचताना अजिबात लाजलेही नाहीत. आता ते कसे नाचलेत, हे बघण्यासाठी तर व्हिडीओ बघावाच लागेल ना भाऊ…
आता तुम्हीही लक्षात ठेवा, तुम्हाला नाचता येवो न येवो… अजिबात लाजू नका, मागेपुढे बघू नका…. कुठेही असलात तरी बिनधास्त नाचा. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :