Breaking News
Home / बॉलीवुड / काजोलअगोदर ह्या अभिनेत्रीसोबत जुळले होते अजय देवगणचे नाव, जीवदेण्याची धमकी दिली होती

काजोलअगोदर ह्या अभिनेत्रीसोबत जुळले होते अजय देवगणचे नाव, जीवदेण्याची धमकी दिली होती

बॉलिवूडमध्ये अश्या अनेक जोड्या आहेत ज्यांनी खऱ्या आयुष्यात एक दुसऱ्यांचे हाथ धरून जगासमोर आपल्या प्रेमाचा आदर्श निर्माण केला आहे. ह्याच जोडींपैकी एक जोडी आहे काजोल आणि अजय देवगण ह्यांची. हे दोघेही इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे सितारे आहेत आणि त्यांचे लाखों दिवाने आहेत. तर दुसरीकडे अजय आणि काजोल फक्त एमकेमकांचे दिवाने आहेत. दोघांच्या लग्नाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. अजय आणि काजोल ह्यांनी २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केले होते. काजोलला तर अजय आवडला होताच, परंतु खूपच कमी लोकांना माहिती आहे कि अजयच्या आयुष्यात काजोलच्या अगोदर कोणी दुसरी अभिनेत्री होती.

अजयसाठी जीव देण्यास तयार होती रविना
सूत्रांच्या म्हणण्यानुसार अजय देवगणचे अफेअर एकेकाळी रविना टंडन सोबत होते. खरंतर हि गोष्ट त्या काळची आहे, जेव्हा रविना आणि अजय ‘दिलवाले’ चित्रपटात सोबत काम करत होते. त्या वेळी रविना अजयवर खूप प्रेम करू लागली होती. दोघांच्या अफेअरच्या गोष्टी समोर येऊ लागल्या होत्या. परंतु अजयने स्पष्टपणे रविना सोबत आपल्या नात्याची खुलेपणाने कबुली दिली नव्हती. दुसरीकडे अजय करिष्मा कपूरसोबत ‘जिगर’ चित्रपटाची शूटिंग करत होता. अशामध्ये अजय आणि करिष्मामध्ये जवळीकता निर्माण होऊ लागली होती. असे बोललं जाते कि, अजयला करिष्माच्या जवळ जाताना पाहून रविना डिप्रे शन मध्ये गेली होती. इतकंच काय तर ती आत्मह त्या करायचा सुद्धा विचार करू लागली होती. परंतु अजय देवगणने एका मुलाखतीत रविनाच्या ह्या प्रयत्नाला फक्त एक पब्लिसिटी स्टंट म्हणून संबोधले होते. त्याचे म्हणणे होते कि, रविनाला प्रसिद्धीच्या झोतात राहायचे होते म्हणून ती अश्या गोष्टी करत आहे.

अजयने प्रेमाला दिला होता नकार
तर दुसरीकडे रवीनाने अजयवर आरोप केला होता कि, अजयने तिला प्रेमपत्रे लिहिली होती आणि आता तो तिला फसवत आहे. ह्या आरोपांचे अजयने खंडन केले होते आणि सांगितले होते कि रविनाला वेड्यांच्या डॉक्टरांची गरज आहे. ती कधीच माझी मैत्रीण नव्हती आणि मी तिच्यावर कधी प्रेम केले नव्हते. हे प्रेमपत्र सुद्धा तिने तिच्या नावाने स्वतःलाच लिहिली आहेत. ह्यानंतर हि घटना खूप चर्चेत आली होती. अजय देवगणने एका मुलाखतीत रवीनाला धमकी देत सांगितले कि, जर तिने अशाप्रकारच्या गोष्टी बंद केल्या नाहीत तर तो तिचे अनेक रहस्य उघडेल. तर दुसरीकडे रविना अक्षय कुमार सोबत ‘मोहरा’ चित्रपटात काम करू लागली. ह्या सोबतच अजय आणि रविना दूर होत गेले आणि रविना अक्षयमध्ये जवळीकता निर्माण झाली. परंतु अक्षय सोबत रविनाचे रिलेशन जास्त दिवस टिकू शकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.

काजोलवर प्रेम होऊन बसले
अजयसुद्धा करिश्मापासून दूर होऊ लागला होता. ह्यानंतर अजयची भेट काजोल सोबत ‘हलचल’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली. अजय नेहमी शांत स्वभावाचा असायचा, तर दुसरीकडे काजोल खूपच बडबडी असल्यामुळे सेटवर अनेकांशी गप्पा मारायची. जेव्हा काजोलने अजयला पाहिले तेव्हा तिला विचित्रच वाटले कि हि व्यक्ती कोण आहे, जी जरासुद्धा बोलत नाही आहे. ह्यानंतर जसजशी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली, तसे दोघांमध्ये संभाषण सुरु होऊ लागले. ज्यानंतर दोघांचे बोलणे सुरु झाल्यानंतर त्यांना समजले कि, दोघेही एकमेकांच्या बिलकुल विरुद्ध स्वभावाचे आहेत, तरीसुद्धा त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर दोघांनी एकत्र अनेक चित्रपटात कामे केलीत. त्यात ‘इष्क’, ‘प्यार तो होना ही था’, ‘राजू चाचा’ आणि ‘यु मी और हम’ ह्यासारखे चित्रपट होते. जेव्हा दोघांची मैत्री वाढत गेली, तेव्हा दोघांना समजलं कि ते एकमेकांसाठीच बनले आहे. ह्यासोबतच दोघांना एकमेकांसोबत प्रेम होऊ लागले आणि १९९९ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर काजोलने सांगितले कि तिच्याजवळ पैसे, प्रसिद्धी सर्व काही होते फक्त प्रेमाची कमतरता होती. आज २१ वर्षानंतर सुद्धा हि जोडी प्रेम आणि विश्वासाच्या आधारावर टिकून आहे. दोघांनाही दोन मुले असून ते आपल्या ह्या छोट्याश्या परिवारासोबत आनंदाने जीवन जगत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *