Breaking News
Home / मराठी तडका / कानपूरमध्ये दुकानाच्या बाहेर पोलिसांनी जे कृत्य केले ते पाहून तुम्हांला देखील राग येईल, बघा व्हिडीओ

कानपूरमध्ये दुकानाच्या बाहेर पोलिसांनी जे कृत्य केले ते पाहून तुम्हांला देखील राग येईल, बघा व्हिडीओ

सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ हसवणारे, डोळ्यात पाणी आणणारे तर काही व्हिडिओ आश्चर्यचकित करणारे असतात. आजकाल असाच एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. ज्यामध्ये दोन ड्यूटी वर असणाऱ्या पोलिसांचा वेडेपणा पाहून लोक डोक्याला हात लावत आहेत. तर हा व्हिडीओ आहे युपी मधला. आता विषय असा आहे की, भारतीय लोक जुगाडू असतात, हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण हा जुगाड करण्याच्या नादात काहीतरी अति होऊन जातं. आणि अति तिथे माती असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता “पोलीस झाले भक्षक” असे अनेकदा तुम्ही वाचले असेल पण इथे तुम्ही पाहू शकता. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची चौकशी लागल्याची अनेक प्रकरणे समोर आली. अगदी मुंबई पोलिसात काम करणाऱ्या सचिन वाझे प्रकरणापासून लोकांच्या मनात पोलिसांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती.

अशातच पुन्हा लॉकडाऊन पडला आणि सामान्य लोकांचे हाल सुरू झाले. मग या लॉकडाऊनचा बंदोबस्त राखण्यासाठी पोलिसांना सांगितले गेले. सरतेशेवटी पोलिसही नियम पाळण्यास मजबूर असतात. मात्र काही काही पोलिसांची भूमिका थोडी कठोरच असते. दरम्यानच्या काळात गरीब भाजी-विक्रेत्यांच्या हातगाड्या उलटून लावणाऱ्या पोलिसांचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. पोलिसांनी भाजी आणि इतर हातावर पोट असणाऱ्या सामान्य विक्रेत्यांना प्रचंड वाईट वागणूक दिली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसून आले होते. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे मात्र पोलिसांची प्रतिमा थोडी का होईना खराब झाली हे नक्कीच. अशातच आता अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओत आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की, रात्रीची गस्त घालताना 2 पोलिसांनी संगनमताने चोरी केली. सुदैवाने याचे फुटेज भेटले अन्यथा पोलिसांनी चोरी केली, यावर कुणाचा तरी विश्वास बसला असता का?

कानपूरच्या महाराजपूरच्या छतमारा चौकातील ही घटना आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असता दुकानाजवळील सीसीटीव्ही कॅमेरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला. फुटेज पाहून पोलिसांच्याही झोपा उडाल्या. गस्तीदरम्यान लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी झोपलेल्या तरुणाचा मोबाईल चोरला होता. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रकरण जास्तच व्हायरल झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलंय. कॉन्स्टेबलसोबत एक होमगार्ड जवानही घटनास्थळी होता. होमगार्ड जवानावरही कारवाई करण्यात येणार आहे. आता पोलिसच असे वागू लागल्यानंतर सामान्य जनतेचे काय होणार? असा सवाल आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *