Breaking News
Home / मनोरंजन / काय भी झाला तरी हलद नाय सोडायची, अंगभर बँडेज असूनसुद्धा काकांनी गाजवली हळद, बघा व्हिडीओ

काय भी झाला तरी हलद नाय सोडायची, अंगभर बँडेज असूनसुद्धा काकांनी गाजवली हळद, बघा व्हिडीओ

नृत्य ही अशी गोष्ट आहे जिचा एकदा नाद लागला की मग तुम्ही पागल झालेच म्हणून समजा. जसं एखाद्या बे’वड्या माणसाला संध्याकाळी 6 वाजता थरथर सुरू होते, जशी एखाद्या अभ्यासू मुलाला खूपवेळ खेळल्यावर एकदम अभ्यासाची आठवण होते अगदी तशीच ही पण न’शा असते. माणूस गावाकडचा असो वा शहरातला… लहान पोरगा असो वा म्हातारा वयस्कर… एकदा का नाचायचा नाद लागला की मग विषयच संपला. आता या नादच 2 प्रकार असतात. पहिल्या प्रकारात येतात ते प्रोफेशनल डान्सर जे असे कुठेही नाचत नाहीत. नाचण्यासाठी ते पैसे घेतात. दुसऱ्या प्रकारात येतात, ते माझ्यासारखे लोक. जे कुठेही नाचू लागतात तेही कशापण परिस्थितीत. म्हणजे अगदी प्रवास चालू असतो, मध्येच हायवेला लग्नाच्या ठिकाणी डीजे वाजत असतो, अशावेळी आवडीचं गाणं डिजेवर लागलेलं असतं म्हणून आम्ही गाडी साईडला घेतो आणि लग्नात डीजेसमोर त्या गाण्यावर मनसोक्त नाचून पुन्हा प्रवासाला लागतो. हा आमचा खराखुरा अनुभव आहे मंडळीहो… पण हे सगळं करण्यासाठी अंगात नाचणारा किडा असावा लागतो. जो खूप कमी लोकांमध्ये असतो, पण ज्यांच्यात असतो त्यांना नाचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

असाच एक व्हिडिओ आमच्या हाती लागला आहे. व्हिडीओ भयंकर व्हायरल झाला आहे. सध्या विषय असाय की पुन्हा को’रोना वाढला आहे, असं दिसतंय. त्यामुळे को’रोना लॉकडाउन आणि वर्क फ्रॉम होममुळे चर्चा, बातम्या, फोटो, व्हिडीओ यांचा इंटरनेटवर खच पडलाय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. लग्न हळद या गोष्टींवर पुन्हा बंधने येण्याची शक्यता आहे. याआधी भरपूर बंधने घातली होती, पण लग्नासारखा कार्यक्रम लोक पुरेपूर एन्जॉय करतात. त्यात हळद आणि वरात हे तर स्पेशल नाचण्यासाठी पर्वणी असते. कोरोनासारख्या काळात लग्नाचा पुरेपूर आनंद घेणारी मंडळी आपण बघितली असतील. पण अख्ख्या शरीराची वाट लागली असताना एखादा माणूस डान्स किती एन्जॉय करू शकतो, हे दाखवणारा एका व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हळदी समारंभ सुरु असल्याचे दिसत आहे. मोठ्या थाटामाटात हा समारंभ पार पाडत आहे. यावेळी अनेक महिला, पुरुष तसेच मुलीही नाचत आहेत. मात्र या व्हायरल व्हिडीओत आपले लक्ष एकाच व्यक्तीकडे जात आहे. तर व्हिडीओमध्ये आकर्षण ठरलेले हे काका हळदीने नाही तर बँडेजने भरलेले आहेत. कुठेतरी धडपडत आलेले हे काका किती ऊर्जेने डान्स करत आहेत, हे पाहून तर आमची शुद्ध हरपली होती.

हळदीच्या बाजूला एकदम भारी भन्नाट बेंजो लावलेला आहे आणि हे काका त्यावर डान्स करत आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की, त्यात काय नवीन? पण या काकांची अवस्था बघता त्यांनी ऍडमिट व्हायला पाहिजे आणि आराम करायला पाहिजे पण नाचायचा कंड कुणालाच स्वस्थ बसू देत नाही. एवढं लागलेलं असताना अंगावर सलाईन असताना हे काका सलाईन घेऊन भल्या दणक्यात नाचत आहेत. विशेष म्हणजे नाचताना ते स्वतः इतके एन्जॉय करत आहेत की, त्यांना दुसरं काहीही दिसत नाहीय. कोण काय म्हणेल, याचा विचारही त्यांच्या मनाला शिवलेला नाही.

या महिला एका बाजूला नाचत असताना काकासुद्धा लै भारी मजेदार डान्स करत आहेत. एवढा छोटा व्हिडीओ या काकांनी व्हायरल करून दाखवला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ते डान्स करत असताना त्याचे शूट होत आहे, याचा पुसटशीही कल्पना त्यांना नाही. ज्या पद्धतीने काकांनी मनसोक्तपणे डान्स केला आहे, त्याच पद्धतीने काका आयुष्यात पण जगत असतील. आपणही तसंच मनसोक्तपणे जगण्याचा आणि नाचण्याचा प्रयत्न करूयात. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *