गावची ओढ प्रत्येकालाच असते. आपलं गाव कुणाला नकोसं वाटतं, आपलं गाव ते आपलं गाव. आपल्या गावाची माती आणि आपल्या गावची माणसं सगळ्यांनाच हक्काची वाटतात. गाव सोडून जावं, असं कोणाला वाटतं? कितीही मागासलेला असला, कितीही गरिबीतलं असलं, तरी गावाकडची ओढ ही प्रत्येकालाच असते. शहरात सिमेंट काँक्रीटच्या जंगलापेक्षा गावातली साधी मळलेली पायवाट कायम पायाला आराम देणारी वाटते. जगात कुठेही फिरा कितीही लांब जा पण आपल्या गावाकडे आल्यावरती वाटणारं सुख आणि समाधान कुठेही नसतं. त्यामुळेच थोर मोठ्या माणसांनी आपल्या गावाचा महिमा ज्याला तितका जमेल तितका सांगून ठेवलाय. पुढच्या पिढीनेही तो तसाच जपला पाहिजे म्हणून त्यांच्याकडेही वारसा सोपवलाय.
आता काही मंडळी मात्र हा वारसा पुढे घेऊन जातील की नाही यात कायम शंकाच आहे. पण असे व्हिडिओ पाहिले की मनाला एक ओलावा तर मिळतोच, शिवाय गाव कुठेही विस्मृतीत जाणार नाहीत किंवा शहरांपासून गावाची माळ तुटणार नाही, असा ठाम विश्वास वाटू लागतो.
या गावाकडून शहराकडे निघालेल्या गावच्या सुपुत्रांना गावासाठी म्हटलेलं हे गीत किंवा कविता डोळे ओले केल्याशिवाय राहत नाही. गावातील म्हातारा आणि म्हातारीचे वर्णन ज्या प्रकारे कवी करतोय त्या प्रकारे त्यांच्या मायेचा आभाळ आणि प्रथा परंपरा राखण्याची त्यांची पद्धत आणि वारसा किती मोठा आहे हे पण कळून चुकले. गावाकडं येणाऱ्या जाणाऱ्यांना विशेषता जाणवणारी एक गोष्ट म्हणजे गरिबी. जो गाव सोडून शहरात गेला तो पक्कड पैसा कमवून मोठा झाला, पण जो गावाकडेच राहिला तो मागासलेलाच राहिला.
पण आता तोही एकत्र येऊ लागलाय शहरासारखा पैसा गावातही कमावता येईल, हे दाखवून त्याने आपण जिद्दीला भेटून उठलोय असं सांगितलं. गावाकडच्या बया, बापड्या, म्हाताऱ्या आजही डोक्यावरती पदर घेतात, हे सांगून त्यांना शहराकडच्या गरजेपेक्षा जास्त असलेल्या स्वातंत्र्याला तर परात मारली आहे. शहरा आणि गावात ज्या प्रकारे मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या असतात मात्र त्यात बऱ्याचदा गावाकडच्या विद्यार्थ्यांना न मिळणाऱ्या शिक्षणाला त्या खुजाच वाटू लागल्या. शांतीच्या पोराची दहावी सुटत नसल्याचं कवी सांगतो आणि शहराकडच्या मोठाल्या इमारतीत असलेल्या शिक्षणाच्या बाजारी करण्यात अडकलेल्या लोकांना चपराकी देतो. ही कविता नसून वास्तव आहे. गावाकडून शहराकडे आलेल्या प्रत्येक माणसाला भावणारी अशीही कविता आहे.
बघा व्हिडीओ :