म्युझिक कंपोजर आणि गायक बप्पी लहरीने गेलाच महिन्यात आपला जन्मदिवस 27 नोव्हेंबरला साजरा केला. बप्पी लहरी मागील काही वर्षां पासून गाण्या सोबत एका कारणाने चर्चेत आहे. ते म्हणजे त्याच्या अंगावरचे भारी भक्कम सोन्याच्या (gold) दागीन्या वरील त्याचे प्रेम. भारी भक्कम ज्वेलरी बप्पी दा ची ओळख आहे. परंतू आपल्याला माहिती आहे बप्पी दा किती किंमतीची त्यापेक्षाही किती वजनाची ज्वेलरी घालतो ते. म्युझिक व्यतिरिक्त बप्पी दा ची ओळख म्हणजे त्याची ज्वेलरी. बप्पी दा गळ्यात आणि हातात भारी भक्कम दागिने घालतो. तुम्हाला माहिती नसेल, साल 2014 मधे लोकसभा निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज भरताना त्याने आपल्या संपत्ती विषयी माहिती दिली होती. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या माहिती नुसार बप्पी दा जवळ 754 ग्राम सोने आणि 4.62 किलो चांदी. कदाचित चालू काळात यात आणखी बदल झाला असेल.
त्याच बरोबर बप्पी दा च्या सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती विषयी बोलायचे झाले तर, आजच्या सोन्याच्या भावानुसार त्यांच्या जवळ कमीत कमी 30 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आहेत आणि 2 लाख किमतीचे चांदीचे दागिने आहेत. फक्त बप्पी दा एकटेच सोन्याचे शौकीन नाहीत तर त्यांच्या अर्धांगिनी (पत्नी) जवळ त्यांच्याही पेक्षा जास्त ज्वेलरी आहे. 2014 साली त्यांच्या पत्नी जवळ 967 ग्राम सोना, 8.9 चांदी आणि 4 लाखाचे हिरे (डायमंड ) होते. त्यांच्याशी जवळ पास 20 करोडची संपत्ती होती. आत्ता त्यात थोडा फार बदल झाला असेल. तर आत्ता तुम्हाला कळलं असेल बप्पी दा किती किमतीची आणि किती वजनाची ज्वेलरी घालतात. पण आपल्याला माहिती आहे ते एवढी ज्वेलरी का घालतात. बप्पी दा ने एका मुलाखतीत याविषयी सांगताना म्हणाले, हॉलिवुड मधे एलविस प्रेस्ली सोन्याची चैन घालायचे आणि ते मला खूप आवडायचे. त्याच वेळी मी ठरवले की मी जर प्रसिद्ध झालो तर माझी वेगळी छाप निर्माण करेन. मी एवढा सोना वापरायला लागलो आणि तो मला लाभदायक ठरला.