Breaking News
Home / मनोरंजन / कितीही संकटं आली तरी लग्न होणार… आता हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हेच म्हणाल

कितीही संकटं आली तरी लग्न होणार… आता हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील हेच म्हणाल

को’रोनामध्ये ज्याप्रकारे लग्न करण्याचा सपाटा लग्नाळू जोडप्यांनी लावला होता, त्यानुसार आत्ता काही टाळकी फक्त लग्न करायची शिल्लक राहते की काय अशी भीती होती. पन्नास लग्न मुहूर्त खायचं म्हणून अनेकांची लगबग सुरू होती. अशातच मोठा आघा’त झाला होता. सरकारने आणखी नियम कडक केले होते आणि काही दिवसाची मुदतही वाढवून दिली होती. त्यामुळे लग्न आटपायचंय तर काहीही झालं तरी लॉकडाऊन पूर्वीच उरकायचं, असं या व्हीडिओतल्या नवऱ्यानं ठरवलं होतं. काहीही झालं तरी आज मांडवात पोहोचायचं म्हणून त्याने घोडी वर बसून स्वार होऊन मंडप गाठण्यासाठी लगबग केली, पण इतक्यात धो-धो पाऊस कोसळू लागला. सारे रस्ते पाण्याखाली गेले, घोडा ही जागाचा हलेना… तरी वाट काढत नवरोबा मांडवा कडे निघाले. त्याची नवरी आतुरतेने वऱ्हाडी मंडळीची वाट पाहत होती. भिजत भिजत वराड निघाले पण कपडे भिजले नवऱ्या मुलाच्या बहिणींचा मेकअपही वाहून गेला.

 

काहीही झालं तरी मांडव गाठायचा, या निश्चयाने निघालेल्या नवर्‍याने कोणाचाही काहीच ऐकलं नाही आणि तो सरळ भिजत भिजतच निघाला. कुणीतरी सांगितलं की बाबा किमान छत्री तरी घे, म्हणून मग काय ते छत्री त्याने नावाला डोक्यावर घेतली. तरीही एवढा महागडा शेरवानीचा कपडा भिजला. भरभर साठलेल्या चिखलातुन सजल्या बुजलेल्या बाया तशाच मंडपाकडे निघाल्या काय करावं, कुणाला काय सूचेना. नवरोबाच्या हट्टापायी त्यांनाही नाईलाज झाला होता, बरं एवढं करून सुद्धा दोन पाट राखी मी सोबत पाहिजेलच म्हणून त्यांची फरफट होत होत. इतकच काय म्हणून पावसात भिजता भिजता नवरोबा रस्ता चुकले त्यांना पुढे काय करावे समजलेच नाही म्हणून मग गल्लीबोळातून मार्ग काढत काढत ते मंडप शोधू लागले होते. गर्दीतुन वाट काढून पोहोचायला नवऱ्याचा गोंधळ सुरू आहे.

ज्यावेळी लग्नमंडपात पोहोचेल तेव्हा सगळ्या वऱ्हाडी मंडळींना हायसं वाटेल. पोचला एकदाचा नवरा मंडपात. आता टाका अक्षता, असं म्हणत सुटलो एकदाचे असा सुस्कारा टाकला जाईल. पाऊस आला म्हणून काय झालं, आपण वेळेत पोहोचून वेळ चुकता कामा नये, म्हणून सगळा हा खटाटोप.

एक किस्सा सांगतो, एकदा असंच झालं होतं वेळेत नवरा पोहोचला नाही, म्हणून नवरीला अपमान सहन झाला नाही. माझ्या घरच्यांना वाट कसली बघायला लावतो म्हणून नवरिन मांडवातल्या एकाला पाटावर उभा केलं आणि भटजींना म्हणाली काका म्हणून टाका अक्षता. भटजींना काय लवकर मोकळा होता येईल म्हणून त्यांनी सुरू केलं. काही कळायच्या आत लग्न विधी सुरू झाले. आता मध्येच कोण खो घालणार म्हणून कोणाची काही बोललेही नाही. अक्षता टाकल्या घातले त्यानंतर नवरा तिथं पोहोचला. आता वेळेची किंमत आयुष्यभर लक्षात ठेव, असं म्हणते. नवरी ना त्या आधीच्या इच्छुक वराला धडा शिकवला आणि दुसऱ्याचे वेळेत पोहोचल्यामुळे लॉटरी लागली. आता हाच किस्सा या नवरोबाने कदाचित ऐकला असणार म्हणून पावसाची वाट बघता तो गुडघाभर पाण्यातून वाट काढत काढत त्यांनं मंडपाकडं मोर्चा वळवलायं.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *