Breaking News
Home / मराठी तडका / “कुणाला कळले नाही पाहिजे की आपण नाचताना आपटलोय ते…” व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

“कुणाला कळले नाही पाहिजे की आपण नाचताना आपटलोय ते…” व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

आपली टीम वायरल व्हिडियोज विषयी लिहिते हे आपण जाणताच. आम्ही हाताळत असलेल्या विषयांपैकी हा एक महत्वाचा विषय असतो. यातून मनोरंजन ही होतं आणि अनेकवेळा बऱ्याच गोष्टी शिकायला ही मिळतात. आमच्या टीमला तर जवळपास प्रत्येक व्हिडियो बघून झाल्यावर निदान एक तरी म्हण वा वाक्प्रचार हा आठवतोच. कारण हे व्हिडियोच एवढे भन्नाट असतात.

बरं व्हिडियो भन्नाट होण्यासाठी म्हणून त्यात सतराशे साठ गोष्टी असण्याचं कारण नसतं. एखादी अतरंगी गोष्ट सुद्धा पुरेशी असते. आता आमच्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोच उदाहरण घेऊ. हा व्हिडियो एका समारंभातला आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एके ठिकाणी मंचावर दोन जण उभे असलेले दिसतात. अर्थात बाकीचे ही असतात. पण त्यातील हे दोन महत्वाचे वाटतात. यातील एक व्यक्ती हा त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असावा. पण दुसरा माणूस काय करत असेल याविषयी कल्पना येत नाही. पण थोड्याच वेळासाठी ! काहीच क्षणांत सगळा मामला लक्षात येतो. डोळ्यावर गॉगल चढवलेला हा भाऊ, सगळ्यांना बाजूला व्हायला सांगत असतो. म्हणजे हा काहीतरी करेल हे जाणवतं. बहुधा उडी मारेल असंच वाटतं.

ते खरही ठरतं. पण मंडळी, सरळ उडी मारणं आणि कोलांटी उडी मारणं यात फरक असतोच ना. बरं त्यातही मंच हा उंच असतो. त्यामुळे हे साहेब जोशात येऊन कोलांटी उडी मारतात. पुढे काय होणार हे वाटत असताना, सुदैवाने पाठीवरच पडतात. चुकून काही झालं असतं तर असं वाटून जातं. पण एवढा विचार करायला वेळच देत नाही हे साहेब. कारण आता एवढ्या उंचीवरून पडलं तर माणूस कळवळतो. पण भाऊ म्हणजे, गिरे तो भी टांग उपर स्वभावाचे असतात. आपल्याला काहीच झालं नाही अशा स्वरूपात, त्याच अवस्थेत भाऊ नाचायला लागतात ना. त्यांना नसली तरी बाकीच्यांना काळजी वाटायला लागते आणि काही जणं धावून येतात. पण कसलं काय. भाऊ रंगात आलेले असतात. एवढंच नव्हे तर या सगळ्या नादात आपला गॉगल कुठे गेला वगैरे विसरूनच जातात. पुढेही व्हिडियो चालू राहतो पण ते मात्र केवळ आणि केवळ डान्स करत राहतात. गॉगलचा पत्ताच नसतो. असो. आपणही हा व्हिडियो बघितला असेल आपल्याला ही आवडून गेला असेल. पण नसेल बघितला तर जरूर बघा.

आमच्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. अर्थात या भाऊंनी उडी मारली तेव्हा काळजी वाटली. पण नंतर त्यांनी जो काही डान्स केला त्यामुळे हसून हसून वेडे झालो. तेव्हा आपणही हा व्हिडियो जरूर बघा आणि त्याचा आनंद घ्या. त्यासाठी आपल्या टीमने सदर व्हिडियो, या लेखाच्या खाली शेअर केलेला आहे.

बरं तर मंडळी, आता हा लेख इथेच संपवतो. आपण मात्र व्हिडियो बघूनच जा. आणि बघितला असेल तर हा लेख शेअर करा. जेणेकरून या व्हिडियोची आणि आमच्या या लेखाची मजा आपल्या मित्र मंडळी आणि परिवाराला सुद्धा घेता येईल. तसेच आपल्या टीमकडून दररोज नवनवीन लेखन केलं जात असतं. त्यातही मनोरंजक विषय असतात. तसेच अन्य विषय ही असतात. आपल्याला ते नक्की आवडतील. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आनंदी राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *