Breaking News
Home / मनोरंजन / कॅमेरासमोर चालू मोटारसायकलवर उभं राहून स्टंट करत होता तरुण, परंतु पुढं जे घडलं त्याची कल्पना करू शकणार नाहीत

कॅमेरासमोर चालू मोटारसायकलवर उभं राहून स्टंट करत होता तरुण, परंतु पुढं जे घडलं त्याची कल्पना करू शकणार नाहीत

‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण आजवर आपण ऐकली असेलच. पण जो स्वतःला ही तारू शकत नाही, त्याला देव पण तारीत नाही. देव तारतो त्यालाच, ज्याच्या ठायी आत्मविश्वास असतो, अतिआत्मविश्वास नाही. ज्याच्या ठायी धाडस असते, आततायी पणा नाही. कारण माणसाचा एखादा अवगुण त्याच्या सर्व गुणांना भारी ठरतो. म्हणजेच काय तर एखाद्या माणसाकडे सर्व चांगले गुण आहेत पण अतिधाडस किंवा अतिआत्मविश्वास माणसाचा कधी घात करीन, ते सांगता येत नाही.

तुम्हाला गाडी व्यवस्थित चालवता येते, हा झाला आत्मविश्वास आणि तुम्हाला स्टंट करता येईल, हा झाला अतिआत्मविश्वास आणि हाच अतिआत्मविश्वास कधी कधी आयुष्यभरासाठी आपल्याला अधू बनवू शकतो. रस्ते अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बहुतेक अपघात हे चालकाचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि हिरोगिरीच्या नादात होतात. कित्येक तरुण ड्रायव्हिंग करताना स्टंट करण्याचा प्रयत्न करतात आणि हाच स्टंट त्यांच्या जीवावर बेततो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बाईक स्टंट असताना 2 तरुणांचा भयंकर अपघात झाला आहे.

बाईकवर स्टंट करणं हा काही ‘बच्चो का खेल’ नाही. स्टंट करताना छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. आपणही अनेक स्टंट व्हिडिओ बघितले असतील. सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओ फिरत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अत्यंत खतरनाक आहे. या व्हिडिओत स्टंट करणाऱ्या दोघांचा कसा अपघात झाला हे दिसत आहे. सोशल मिडियावर लोक या स्टंट करणाऱ्या तरुणाच्या सुरक्षेसाठी प्रार्थनाही करत आहेत.

अनेकदा तुम्ही लोकांना रस्त्यावर धोकादायक स्टंट करतानाही पाहिले असेल. खरं म्हणजे जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करणारे हे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे करत असतात. पण स्टंट दाखवण्याच्या प्रक्रियेत ते हे विसरतात की असं करणं त्याच्या जीवावरही बेतू शकतं. अशाच स्टंटबाजीमुळे अनेकांनी जीव गमवला आहे. पण काही लोक असे असतात की, त्यांना अशा गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये 2 व्यक्ती रस्त्याने दुचाकीवरून जाताना दिसत आहे. यापैकी एक जण गाडीच्या उलट्या दिशेला तोंड करून बसलेला आहे म्हणजे तो गाडीवरून उडी पण मारू शकत नाही. त्याच्या हातात गाडीचा कुठलाच कंट्रोल नाही तर दुसरा व्यक्ती गाडीवर उभा आहे. तो उभा असल्याने गाडीचा कंट्रोल त्याच्याही हातात नाही. मात्र दोघांनी पण गाडीचा बॅलन्स व्यवस्थित साधला आहे.

पण अचानक उभा राहिलेला व्यक्ती, जो आधी बसलेला असतो तो गाडी रस्त्यावर जोरात गाडी पळवतो. काही सेकंदांपर्यंत ही गाडी तो दामटवत राहतो. पण तितक्यात त्याला गाडीवर उभं राहण्याची हुक्की येते. तिथपर्यंत सगळं ओके चालू होतं… पण पुन्हा खाली बसताना त्याचा तोल सुटतो आणि त्यानंतर जे होतं ते पाहिल्यानंतर असे स्टंट किती धोकादायक असू शकतात हे समजतं. अगदी क्षणात होत्याचं नव्हतं होतं. व्हिडिओमध्ये तरुण स्टंट करण्यासाठी बाईकवर सरळ उभं राहण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा तोल जातो आणि तो केवळ दोन सेकंदांतच खाली कोसळतो. व्हिडिओच्या शेवटी बाईक सरळ जाताना दिसत आहे. आणि पुढे जाऊन बसलेला व्यक्तीही जखमी झालेला दिसतो…

भावांनो एक लक्षात घ्या… असले जीवघेणे स्टंट करताना जिवाला सांभाळा, शक्य असेल तर हे असले स्टंट करूच नका. काहीच अडत नाही आपलं यावाचून…
तरुणांनो तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत नाही. हे असले स्टंट करताना एक क्षण तुम्हाला पार बरबाद करू शकतो. कुणीतरी कौतुक करते म्हणून स्टंट करणारे तर हे असे जिवानिशी जातात. भावांनो, आपण ‘प्रसंगी’ आग लावणाऱ्यांना थांबवू शकत नाही, पण आगीत उडी घेण्यापासून स्वतःला रोखू तरी नक्कीच शकतो.
आपल्या धडावर आपले डोके असले की स्वतःसकट कुटुंबाचेसुध्दा हित साधता येते, नसले की होरपळ अटळ असते.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *