Breaking News
Home / मनोरंजन / केमिस्ट्रीच्या शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने सांगितलेली लव्हस्टोरी ऐकून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

केमिस्ट्रीच्या शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने सांगितलेली लव्हस्टोरी ऐकून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आपण शाळा कॉलेज मध्ये असताना अनेक शिक्षकांच्या हाताखालून जातो. या काळात आपल्याला संपर्कात येणारा प्रत्येक शिक्षक वा शिक्षिका या त्यांच्या शैलीमुळे लक्षात राहतात. अनेकांची बोलण्याची ढब, चालण्याची तऱ्हा, शिकवण्याची पद्धती या आणि अशा अनेक शैलींमुळे पुढे आयुष्यभर ही मंडळी आपल्या लक्षात राहतात. त्यातही गप्पीष्ट मास्तर असतील तर ते जास्त लक्षात राहतात. कारण ते शिकवताहेत की गप्पा मारताहेत हेच कळत नसतं. पण आज मोठं झाल्यावर कळतं की ही तर त्यांची शिक्षणाची एक पद्धत असते आणि ती उत्तम कामही करून जाते. कारण त्यांनी एखाद्या वेळी शिकवताना सांगितलेल्या किस्स्यांमुळे आपण आपसूक ती गोष्ट लक्षात ठेवतो आणि त्याच्याशी निगडित अभ्यास ही आपोआप लक्षात राहतो. याचीच अनुभूती देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने नुकताच पाहिला. हा व्हिडियो तसा चार मिनिटांहुन जास्त चालतो. पण यातील मास्तर एकदम गप्पीष्ट असल्याने मजा येते हा व्हिडियो बघताना.

यात जेव्हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला वर्ग एकदम पूर्णपणे भरलेला दिसून येतो. जुन्या दिवसांची आठवण आपसूक ताजी होते. असो. तर या भरलेल्या वर्गासमोर तीन शिक्षक उभे असतात. त्यातील आपल्या उजव्या बाजूला असलेले शिक्षक अगदी अथपासून ते इतिपर्यंत या व्हिडियोभर बोलत राहतात. वेळ घेतात पण गंमत आणतात. या व्हिडियोत आपल्याला कळून येतं की हा वर्ग केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांचा आहे. आणि आज हे शिक्षक या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीतील उदाहरणं देत एक कहाणी सांगणार आहेत. ही कहाणी तरी कसली असणार असते? तर ती असते या शिक्षकांची प्रेमकथा. आता खरं खोटं देवच जाणे. पण प्रेमकथा म्हंटल्यावर प्रत्येकाचे कान टवकारले जातात. त्यात वर्गात उपस्थित सगळे जण तरुण वयाचे म्हणजे हा तर अगदी आवडता विषय. त्यामुळे ही कथा ऐकताना होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी हे शिक्षक मुलांना एकच सूचना देतात. ती सूचना असते की गोष्ट आवडली किंवा नाही आवडली तर मधेच बोलायचं नाही. जे काही आवाज मजा मस्ती आहे ती नंतर करायची. कारण काय तर म्हणे त्यांना गोष्टी विसरायला होतात.

मुलं मुंड्या तर हलवतात. पण एकदा का गोष्ट सुरू झाली की मग कसचं काय. कारण गोष्ट सुरू होतेच मुळी केमिस्ट्री लॅब मधून. आवडीचा विषय. मग तेथे या कथेचे नायक नायिका भेटतात. तिथेच मग प्रेम ही जमतं. पुढे हे प्रेम एवढं वाढतं की ही बाब नायिकेच्या वडिलांना सांगण्याची वेळ येते. पण नायिकेचे वडीलच ते ! एका बैठकीत ऐकतील तर शपथ. त्यात ते नायकाला त्याची सद्य परिस्थिती दाखवून देतात आणि मग काय. नायकाचा देवदास व्हायला वेळ लागत नाही. बरं गोष्ट नेहमी सारखी वाटते. पण आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपण बघितलं असेल की प्रत्येक घटनेचं वर्णन करताना हे शिक्षक केमिस्ट्री मधले विविध उदाहरणं देतात. अनेक रसायनांची नावं यात ऐकायला मिळतात. आपल्यापैकी ज्यांना केमिस्ट्री बद्दल जास्त जाण आहे त्यांच्या साठी अजून जास्त गंमत असलेला हा व्हिडियो असेल. पण आपल्याला केमिस्ट्री कळत नसली तरी हरकत नाही. उपस्थित विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून आपल्याला जे समजायचं ते समजतच. आणि गोष्ट अगदीच काही वाईट नाही त्यामुळे तिचा आधार घेत या गुरुजींनी अगदी पध्दतशीरपणे मुलांच्या डोक्यात केमिस्ट्री विषयक उत्सुकता पेरली हे नक्की.

त्यामुळे या व्हिडियोत काही गोष्टी अनभिज्ञ वाटल्या तरी फरक पडत नाही. आपलं हमखास मनोरंजन होतं आणि मुलांना ही दिलेल्या उदाहरणातून केमिस्ट्रीतील काही गोष्टी नक्की लक्षात राहतात. साध्या वाटणाऱ्या पण अगदी चोख काम करणारी ही शिकवण्याची स्टाईल आपल्या टीमला तर आवडली. आपणही हा व्हिडियो पाहिल्यास आपल्याही पसंतीस उतरेल हे नक्की.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला वाचकांना आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. कारण आपल्या कमेंट्स मधून आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि त्यातूनच अनेक उत्तमोत्तम लेख जन्माला येतात. त्यासाठी आपलं हे प्रोत्साहन सातत्याने मिळत राहणं आवश्यक आहे. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला कायम मिळत राहू द्या ही सदिच्छा. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.