आपण काही काळापूर्वी एका लहान मुलीच्या गंमतीशीर वायरल व्हिडियो विषयी मराठी गप्पावर एक लेख वाचला आहेच. या व्हिडियोमध्ये त्या मुलीला मालिका पहायच्या असतात आणि घरचे तिला अभ्यास करायला सांगत असतात, असा तो गंमतीशीर व्हिडीओ होता. या लेखाला असंख्य वाचक लाभले. आज अशाच एका लहान मुलाच्या वायरल व्हिडियो विषयी आपण या लेखातून वाचूयात आणि व्हिडीओ पाहुयात. लहान मुलं रागावली की अजून गोड दिसतात हे आपल्याला माहिती आहेच. तो राग त्यांना माहिती असलेल्या शब्दांतून व्यक्त होतो तेव्हा तर अजून गंमत येते. या वायरल व्हिडियो मध्ये असाच एक लहान मुलगा आहे, ज्याचे केस का पण्यासाठी न्हावी काका घरी आले आहेत. पण त्याला केस का पू द्यायचे नाहीयेत. आपणही नाही का, केस का पताना लहानपणी दंगा मस्ती केलेली असते आणि आई बाबांच्या हातचा मा र खाल्लेला असतो.
काही जण तर अगदी भोकाड पसरतात की बाजूच्या इमारतीत कळावं की या मुलाचे केस का पणं चालू आहे. या मुलाच्या बाबतीत असंच काहीसं होत आहे. तो न्हावी काकांना सांगतोय, अरे यार बाल क्यूँ का ट रहे हो. न्हावी स्वतःहून त्याला शांत करण्यासाठी त्याला काही प्रश्न विचारतात. त्यात त्याचं नाव, वडिलांचं नाव विचारतात. तो त्यांची उत्तरं तर देतो पण दरम्यान त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र गंमतीशीर असतात. त्यामुळे बघणाऱ्याला त्याची किवही येते आणि हसूही फुटतं. लहान मुलांना खासकरून कैचीचा स्पर्श झाला की भीती वाटत असावी, त्याप्रमाणे त्याचं होतं आहे. कैचीचा स्पर्श होण्याआधी बडबड करणारा हा छोटा, कैचीचा स्पर्श झाला की मात्र डोळे गच्च मिटून घेतो. पुढे पुढे तर तो या न्हावी काकांना ध मकी सुद्धा देतो की मी मोठा आहे, मी पण तुम्हाला त्रास देणार. या सगळ्या प्रकारात त्याचं केस का पणं होऊन जातं, तोपर्यंत त्याच्या डोळ्यात पाणी तरळलेलं असतं. केस का पून झाल्यावरही अर्थात ही स्वारी, खाशी रागावलेलीच असते. नंतरही बोलणं चालू असतंच. तो भाजी खात नाही म्हणून बोललं जातं, तर त्यावरही त्याची उत्तरं तयार असतात. तसंच त्याला विचारलं जातं, की या काकांनी तुझे केस का पलेत, त्यांचं नाव काय ? तर तो उत्तरतो, कटिंगवाले अंकल आणि एकच हशा पिकतो आणि व्हिडियो समाप्त होतो.
हा व्हिडियो एवढा प्रसिद्ध झाला आहे की, मुंबई पो लिसांच्या ऑ फिशियल इन्स्टाग्राम अकाउंटला सुद्धा हा शेअर करावासा वाटला. या व्हिडिओतील काही भाग वापरून, जागरूक मुंबईकर, मास्क न घालणाऱ्यांना काय संदेश देतात अशी संकल्पना या पोस्ट मध्ये वापरली गेली आहे. या लहान मुलाच्या व्हिडियोप्रमाणेच मराठी गप्पाची टीम वेळोवेळी विविध वायरल व्हिडियोजवर लेख लिहीत असते आणि ते तुमच्या भेटीस आणत असते. तुम्हाला अजूनही काही वायरल व्हिडियोज विषयी वाचायचं असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. सर्च मध्ये जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)