Breaking News
Home / मनोरंजन / केसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

केसं कापत असताना ह्या मुलाची रिऍक्शन पाहून तुमचा सुद्धा दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

सोशल मीडिया सध्या फक्त व्हायरल व्हिडीओसाठी ओळखला जातो. ग्रामीण भागात आणि म्हाताऱ्या मंडळींसाठी तर अजूनही व्हायरल होणारे व्हिडीओ म्हणजेच सोशल मीडिया अशी ओळख आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा अंदाज कुणालाच नाही. गाण्यापासून तर भांडणापर्यंत… सुरांपासून तर शिव्यांपर्यंत इथं सगळं काही व्हायरल होत असतं. लहान मुलांचे तर असले असले व्हिडीओ व्हायरल होतात, ते पाहून आपण एकतर हसून हसून लोटपोट होतो किंवा त्यांच्या करामती बघून आश्चर्यचकित तरी होतो. मात्र आज आमच्या हाती एक असा व्हिडीओ लागला आहे, जो तुम्हाला हसवणार पण आहे आणि आश्चर्यचकित सुद्धा करणार आहे. आजवर ज्यांनी ज्यांनी आपल्या घरातील लहान मुलाला जेव्हा जेव्हा केसं कटिंगला नेले असेल, त्यांना हा व्हिडिओ बघून स्वतःच्या सलूनमधील अवस्थेवर हसू येईल. तसेच जे सलूनमध्ये काम करतात, तेही या व्हिडीओला बघून पोटधरून हसतील.

हा व्हायरल झालेला व्हिडीओत एक मुलगा आहे, ज्याचं वय साधारण 2 वर्षाच्या आसपास असेल. हा व्हिडीओ व्हायरल व्हावा, यासाठी त्याने काय केलं आहे तर काहीच नाही. आता तुम्ही म्हणाल… असं कसं राव? या पोराने काही तरी केलं असेल म्हणून तर व्हिडीओ व्हायरल झाला. पण नाही या मुलाने काहीच केलं नाही म्हणूनच हा व्हिडिओ व्हायरल झाला. सर्वसामान्यपणे जेव्हा जेव्हा मुले सलूनमध्ये कटिंगला जातात, तेव्हा तेव्हा ते मोकार वैताग देतात. कटिंगला बसल्यावर रडतात. किरकोळ ताकद असणारी मुले कटिंगवेळी 2-2 माणसांना आवरत नाहीत, इतकं वेड्यासारखं वागतात. कधी कधी कटिंग करणारा वैतागून “याला घरी न्या, आता जमणार नाही” असं म्हणतो. लग्न जुळवण्यापासून तर लग्न झाल्यावर मुलगी वाट लावण्यापर्यंत एखादा पाहुणा जेवढा थकत नाही ना.. त्यापेक्षा जास्त लहान मुलांची कटिंग करताना पालकांची आणि सलून कारागिराची दमछाक होते. काही पोरं मुळातच डांबरट असतात तर काही लाजाळू असतात.

मात्र जेव्हा ही विविध स्वभावाची पोरं कटिंगसाठी जातात, तेव्हा मात्र त्यांचा एकच धोशा किंवा स्वभाव असतो तो म्हणजे त्यांचा आक्रस्ताळेपणा… आजचा हा व्हिडीओ अशाच एका अतरंगी मुलाचा आहे. मात्र हा मुलगा इतरांच्या तुलनेत स्वभावाने एकदम वेगळा आहे. कटिंग करताना जिथं बाकीची मुलं रडतात, तिथं हा चक्क मनमोकळं हसताना दिसत आहे. एवढंच काय हा साधा हसत नाही तर सातमजली हसत आहे. आश्चर्य वाटलं ना… व्हिडीओ बघा मग अजून आश्चर्य वाटेल. व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच मजा येईल, हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो. फेसबुक, युट्युब आणि इन्स्टाग्रामवर लहान मुलांचे असे बरेच व्हिडीओ अपलोड होतात मात्र या भन्नाट व्हिडीओने लाखोंपेक्षा अधिक लोकांची पसंती मिळवली आहे. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *