आयुष्यात तुम्ही काहीही करू शकता. फक्त तुमच्याकडे कॉन्फिडन्स नावाची गोष्ट पाहिजे. ज्या मिस्टर बिनला बघून तुम्ही खदाखदा हसता. ज्याच्यासाठी आज अख्ख जग वेडं आहे, त्या मिस्टर बिनला आधी नीट बोलता यायचं नाही. आणि म्हणूनच त्याने कुठलाही संवाद नसलेला शो काढला आणि आज तो काय आहे, हे आपल्यालाही चांगलंच माहिती आहे. ज्या तरुणाला एकेकाळी रेडिओमध्ये एन्ट्री दिली गेली नव्हती. तोच तरुण आज बॉलिवूडचा बेताज शेहंशाह आहे आणि बॉलिवूडबाहेर व्हॉईस ओव्हरसाठी त्यांचा आवाज वापरला जातो, असे अमिताभ बच्चन. वयाच्या 75 व्या वर्षी जगातील सर्वात पॉवरफुल देशाचे राष्ट्राध्यक्ष व्हायचे स्वप्न बघणारे आणि यश मिळवणारे डोनाल्ड ट्रम्प हे एकेकाळी इतके कर्जबाजारी झाले होते की ते एकटे रस्त्यावर फिरायचे. धीरूभाई अंबानी तर आपल्या भारतातील तरुणांची उत्तुंग प्रेरणा आहेत. परवापर्यंत ज्याला कुणी ओळखत नव्हतं त्याला काल भालाफेकीत गोल्ड मेडल मिळाल्याने त्याला आज जगभर ओळख मिळाली, असं नीरज चोप्रा अनेकांची प्रेरणा होणार आहे. या सगळ्यांकडे एकच गोष्ट कॉमन होती, तो म्हणजे आत्मविश्वास…
आज आमच्या टीमच्या हाती एक व्हिडिओ लागलेला आहे. जो पाहून तुम्ही लोळून लोळून हसाल. मात्र या व्हिडीओत असणाऱ्या मुलाचा आत्मविश्वास बघून पाहून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. तुम्ही म्हणाल… काय बोलता राव… इथं भले भले आम्हाला प्रेरणा देऊन गेले. विश्वास नांगरे पाटील, नाना पाटेकर, विवेक बिंद्रा, संदीप माहेश्वरी यांचे मोटिव्हेशनल लेक्चर ऐकून आम्ही 2 दिवस एकदम सिरीयस झालो. परत पहिले पाढे पंचावन्न… आणि हा व्हिडीओ काय आम्हाला प्रेरणा देणार?… समजा तुम्हाला नीट बोलत येत नाही. अशातच तुमची जीभ वळत नसल्याने तुम्ही बोबडे बोलता. तुम्ही हजारो लोकांच्या समोर आहात. आणि आता तुम्हाला एखाद्या विषयावर थेट स्टेजवर जाऊन बोलायला सांगितले तर… तुम्ही नक्कीच नाही म्हणणार. आणि हीच गोष्ट त्या लहानग्या पोराने केली आहे. विशेष म्हणजे मध्ये मध्ये बोलताना तो विसरलाही आहे. तरीही तो थांबला नाही. बोबड आणि अडखळत बोलणं, हजारो लोक समोर, मध्ये मध्ये वाक्य विसरन एवढं सगळं करूनही हा पठ्ठ्या बोलत राहिला… फक्त एका गोष्टींच्या जीवावर ती म्हणजे कॉन्फिडन्स बोले तो आत्मविश्वास.
मराठी शाळेत जो कॉन्फिडन्स मिळतो ना, तो आयुष्यभर टिकून राहतो. हा पोरगाही मराठी शाळेत आणि मराठी भाषेतच बोलत आहे. मध्ये तो चुकल्यावर लोक हसतात, शेजारी बसलेल्या मुलीही हसतात, अगदी व्यासपीठावर असणाऱ्या पाहुण्यासुद्धा हसताना दिसतात. पण हा बोलका पोरगा मात्र थांबत नाही. व्हिडीओ बघितल्यावर आपल्यालाही वाटून जातं की, असाच कॉन्फिडन्स पाहिजे बॉस आपल्याकडे…
विशेष बाब म्हणजे मराठी माणसासह अवघ्या जगाची प्रेरणा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीही तो बोलतो आहे. हा व्हायरल व्हिडीओ अनेक लोकांनी शेअर केला आहे. एवढंच नाही तर सेलिब्रिटी लोकांनी पण शेअर केला आहे. हास्य कलाकार अंशुमन विचारे यांनीही हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, बाकी गेलं तेल लावत… कॉन्फिडन्स महत्वाचा.
बघा व्हिडीओ :