Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये तीन विद्यार्थ्यांनी मिळून केलेला हा अतरंगी डान्स प्रकार होत आहे वायर’ल

कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये तीन विद्यार्थ्यांनी मिळून केलेला हा अतरंगी डान्स प्रकार होत आहे वायर’ल

डान्स करावा तर मनापासून. तसं असेल तरच डान्स करणाऱ्यांना आणि पाहणाऱ्यांना मजा येते. त्यातही हा डान्स उत्तम कोरिओग्राफ केलेला असेल तर सोन्याहून पिवळं. मध्यंतरी आपल्या टीमने एका वायरल व्हिडियो विषयी लेखन केलं होतं जे बरंच प्रसिद्धीस पावलं होतं. हा व्हिडियो होता, महाविद्यालयीन वार्षिक समारंभातील काही विद्यार्थ्यांच्या एका डान्स परफॉर्मन्स चा. यातील विद्यार्थ्यांनी एका सुप्रसिद्ध गाण्यावर डान्सचं सादरीकरण केलेलं होतं. याचीच आठवण व्हावी असा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला आणि त्यावर लेख लिहायचं ठरलं कारण हा लेख तुम्हाला आवडेल असा विश्वास आहे. आज आम्ही पाहिलेला व्हिडियो आहे एम.एस. के. महाविद्यालयातील वार्षिक समारंभाचा. यात अर्थातच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणारच. या मांदियाळीत एक डान्स परफॉर्मन्स असा असतो ज्याची वाट सगळे जण अगदी आतुरतेने पाहत असतात. कारण या महाविद्यालयातील तीन जिगरी मित्र हा डान्स सादर करणार असतात.

जेव्हा त्यांच्या परफॉर्मन्स ची वेळ येते आणि हे तिघेही मंचाकडे जाऊ लागतात तेव्हा एकच जल्लोष होतो. त्यांनाही हे स्वागत आवडलेलं असतं. मग रंगमंचावर तिघेही आपली जागा बघून उभे राहतात. पहिलं गाणं सुरू होतं. होय यांच्यात एक नाही तर जवळपास सात ते आठ गाणी वाजवली गेली होती. पहिलं गाणं सुरू होतं ते कोई मिल गया चित्रपटातलं – इट्स मॅजिक हे ते गाणं. त्यावर प्रहसनात्मक डान्स करताना हे तिघेही उपस्थितांची वाहवा मिळवतात. या तिघांचा विनोदी स्वभाव ही यानिमित्ताने पुढे येतो. सोबत हे ही कळतं की तिघेही उत्तम डान्सर आहेत. मग दुसरं गाणं येतं – बन ठन चली देखो ए चाची रे. सुखविंदर सिंघ यांनी गायलेलं हे गाणं फारच लोकप्रिय आहे. हे तिघेही यावर अगदी मस्त स्टेप्स करतात. लडका आंख मारे हे गाणं, त्यामागून मग रेडी चित्रपटातलं ढिकां चिका हे गाणं, क्या लगती है हाय रब्बा हे राजा बाबू चित्रपटातलं गाणं अशी सुपरहिट बॉलिवूड गाण्यांची लाईनच लागते. या उडत्या गाण्यांच्या चालींबरोबर या तिघांचा डान्स ही रंगत जातो. उपस्थितांना ही त्यांचा डान्स आवडत असल्याचं जाणवत असतं. आपणही मस्त मजा घेत असतो. पण यात मराठी गाणी नसल्याचं ही आपल्याला जाणवतं. मधेच एखादं मराठी कडवं गायलंही जातं पण कॅमेऱ्यामागील आवाजात ते विरून जातं.

पण या मुलांनी मात्र अतिशय काळजीपूर्वक गाण्यांची निवड केलेली असते. सोबतच कोरिओग्राफी सुद्धा. त्यामुळे मराठी गाणी नाहीत असं वाटत असताना दोन तुफान प्रसिद्ध मराठी गाण्यांवर ही मंडळी डान्स करतात आणि आपलं मनोरंजन करतात. मराठी गाण्यांवर डान्स बघण्याची आपली इच्छाही पूर्ण होते. त्यातील पहिलं गाणं म्हणजे ढगाला लागली कळं. एवढं लोकप्रिय गाणं आणि त्यावर या तिकडीचा डान्स म्हणजे मस्त धमाल. त्यांनतर येणारं गाणं म्हणजे ‘खंडेराया झाली माझी दैना’ हे गाणं. वैभव लोंढे हे याचे गीतकार, संगीतकार आणि गायक सुद्धा. २०१८ साली आलेल्या या गाण्याला युट्युब वर जवळपास ९ करोड हुन अधिकांनी पाहिलं आहे. असं हे लोकप्रिय गाणं वाजतं तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो. त्यात या तीन जिवलग मित्रांच्या धमाल मस्त डान्स ने या आनंदात भरच पडते. या व्हिडियोतील काही क्षण अगदी भाव खाऊन जातात. जसे की सुरवातीस जेव्हा एक मित्र पडतो आणि मग धमाल नाचतो तो क्षण आणि बरेचसे. एकूणच काय तर हा व्हिडियो अगदी आनंद देऊन जातो. हा व्हिडियो तसा जुना आहे पण तरीही आजही मनोरंजक आहे. आपल्या सगळ्यांना आनंद देणाऱ्या या तीनही मित्रांचे धन्यवाद.

आपल्याला हा लेख वाचून आनंद झाला असेल अशी आशा आहे. आपला आनंद आपल्या कमेंट्स मधून आणि आपण आमचे हे लेख शेअर करता त्यातून कळून येतो. यातून आपल्या टीमलाही प्रोत्साहन मिळते. त्यामुळे आपल्यासाठी विविध विषयांवर लेख लिहिण्याची ऊर्जा आम्हाला मिळते. यापुढेही अशीच ऊर्जा मिळत राहो. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *