Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांनी कोळी गाण्यांवर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांनी कोळी गाण्यांवर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

आपल्याकडे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असला की विविध गाण्यांची, डान्सची अगदी रेलचेल असते. त्यातही कोळीनृत्य हा तर अगदी आपल्या आवडीचा नृत्यप्रकार यात हमखास सामील असतो. आणि असायलाच हवा. कारण कोळी गीतांमुळे जो माहोल बनतो ना, तो इतर कोणत्याही गाण्यांमुळे बनत नाही. अगदी शाळेपासून आठवून बघा. आपल्या शाळेतील प्रत्येक वर्षीच्या गॅदरिंग मध्ये एकदा तरी, ‘मी हाय कोली’ हे गाणं वाजलं असण्याच्या आपल्या आठवणी ताज्या होतील बघा. पण हे परफॉर्मन्स काही वेळेस एकाच गाण्यावर केले जात. पण आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो मात्र जवळपास पाच कोळी गीतांची मेजवानी घेऊन येतो. त्यावर डान्स परफॉर्मन्स ही आहेतच. म्हणजे सोने पे सुहागा. असं असल्यावर आपली टीम थोडी पाठी राहतेय. म्हंटलं आपल्या वाचकांसाठी याविषयी लिहिलं पाहिजे. चला तर मग जास्त वेळ न दवडता, या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो म्हणजे दयानंद सायन्स कॉलेज, लातूर येथील विद्यार्थ्यांनी केलेला डान्स परफॉर्मन्सचा व्हिडियो आहे.

या व्हिडियोला गेल्या दीड पावणे दोन वर्षात जवळपास ११ लाखांहून अधिकांनी पाहिलं आहे आणि त्याचप्रमाणात पसंत ही केलेलं आहे. यावरून या व्हिडियोच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला पाच विद्यार्थी आणि पाच विद्यार्थिनी पारंपरिक कोळी वेशात उपस्थित असलेले दिसतात. सोबतच मुलांच्या हातात वल्ही आणि मुलींच्या हातात टोपल्या दिलेल्या असल्यामुळे हा कोळी लूक अजून खुलून दिसत असतो. जर आपण हा व्हिडियो जेव्हाही सर्वप्रथम पाहणार असाल तर पहिली १५ सेकंद स्कीप करा. कारण त्या वेळेस ही सगळी मंडळी केवळ उभी असतात आणि गाण्यांची तयारी चालू असते. पण हा वेळ सोडला तर बाकीचा पूर्ण व्हिडियोभर ही मंडळी धमाल मजा मस्ती करताना दिसतात. या सगळ्यांची सुरुवात होते ते ती ‘मी हाय कोली’ या गाण्याने. हे गाणं वर उल्लेख केल्याप्रमाणे लोकप्रिय आहेच. येथेही याचा प्रत्यय येतोच. जवळपास दीड मिनिटं या गाण्यावर आपण या सगळ्यांचा धमाल परफॉर्मन्स पाहतो. यात आवडून जाणारी बाब म्हणजे या मुलामुलींचा उत्साह, ऊर्जा आणि गाण्याची मजा घेत घेत डान्स करण्याची वृत्ती. त्यात वेगवेगळ्या डान्स स्टेप्सची रेलचेल असल्याने मजा येते. तसेच यात सुरुवातीला जोड्या केलेल्या दिसून येतात. या जोड्यांना केंद्रस्थानी येत डान्स करण्याची संधी या स्टेप्स मधून मिळल्याचं दिसतं.

मग वेळ असते ती अजून एका धमाल कोळी गीताची. ‘नाखवा बोटीने फिरवाल का’ हे गाणं माहिती नसणारा एखादा विरळाच असेल, इतकं हे गाणं लोकांच्या मनात घर करून बसलं आहे. या गाण्यावर ही या जोड्या मस्त स्टेप्स करतात. आपणही कधी कोळी गीतांवर डान्स केला असेल त्याच्या आठवणी एव्हाना मनात दाटून यायला लागलेल्या असतात. तेवढ्यात मग या गाण्याचं म्युझिक वाजू लागतं आणि तिसऱ्या गाण्याची नांदी मिळते. पण यावेळेस मात्र तिसऱ्या गाण्याचं केवळ म्युझिकच वाजतं. पण आपल्या विद्यार्थी मित्रांचं कौतुक करायला हवं. या वेळेत खरं तर स्टेप्स करणं कठीण ठरू शकतं. पण ते डोकेबाजपणे दोन गट करतात. त्यामुळे मुलींचा गट हा डान्स स्टेप्स करत राहतो आणि मुलांचा गट हा मासोळी पकडून घेऊन जाण्याचा अभिनय करत राहतो. त्यामुळे दुसऱ्या आणि चवथ्या गाण्याच्या मध्ये ही मुलं अवघडून जात नाहीत. तस झालं असतं तर कोणत्याही परफॉर्मन्सची मजा जाऊ शकते. तसेच अजून एक बाब म्हणजे तिसऱ्या गाण्याची धूनच एवढी प्रभावशाली ठरते की उपस्थित सगळे आनंदित होतात. हे गाणं म्हणजे टाईमपास चित्रपटातलं ‘पहिल्या धारेच्या प्रेमाने साला काळीज केलंय बाद’. पण हा तर परफॉर्मन्सचा मध्यबिंदू असतो.

अजून दोन जबरदस्त गाणी बाकी असतात. यातलं चौथं गाणं सुरू होतं आणि आनंदाची एक लहर सगळ्या उपस्थितांमध्ये निर्माण होते. हे गाणं असतं – दर्या किनारी एक बंगलो गं पोरी, जय गो जयी’. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासून डान्स स्टेप्स या वेगळ्या केल्या जातात. नाचण्याची पद्धत बदलते. एका फोटोग्राफर दादांना ही एखादं दुसरे फोटो घेण्याचा मोह आवरत नाही. हे गाणं पूर्ण होतं होत एव्हाना व्हिडियो संपत आलेला असतो. पण एवढा जबरदस्त परफॉर्मन्स दिल्यावर त्याचा शेवटही तसाच असायला हवा ना. तो तसाच जबरदस्त होतो. गाणंही आपल्या सगळ्यांच्या आवडीचं निवडलेलं असतं. ‘कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ, कोळी लोकांचा मान तुझं देऊळ’ हे ते गाणं. हे गाणं आपल्याला नकळत एवढी ऊर्जा देऊन जात की तो अनुभव शब्दात व्यक्त करता येत नाही. पण आपण या परफॉर्मन्स मध्ये बघू शकतो. कारण सलग चार गाण्यांवर नाचून ही मंडळी थकली असण्याची शक्यता असते. पण हे गाणं सूरु झाल्यापासून ते संपेपर्यंत या मुलांचा उत्साह तर द्विगुणित झाल्यासारखा वाटत असतो. तसेच त्यांच्या डान्स स्टेप्स देवीचं रूप आपल्या समोर उभं करण्यात ते यशस्वी होतात. सगळी मुलं जेव्हा बाजूला जातात आणि एकटी मुलगी हात जोडत मध्यभागी उभी राहते तेव्हा हा अनुभव येतो. पुढे पूर्ण व्हिडियोभर हा आनंद टिकून राहतो आणि याच प्रसन्न वातावरणात हा व्हिडियो संपतो.

खरं तर पाच मिनिटांचे डान्स व्हिडियोज खूप जास्त वेळेचे वाटू शकतात. पण अशी उर्जावान कोळी गीतं आणि डान्स असेल तर मग ती पाच मिनिटं पण अपुरी वाटायला लागतात. असो. हा परफॉर्मन्स आपला मूड अगदी खुश करून जातो. आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आम्ही काय म्हणतो आहोत याचा अंदाज आला असेलच. पण आपण जर हा व्हिडियो पाहिला नसेल तर आवर्जून बघा. आपलं उत्तम मनोरंजन होईल.

तसच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. कारण खास आपल्यासाठी म्हणून आपली टीम सातत्याने लेखन करत असते आणि करत राहील. त्यामुळे आपण जेव्हा आम्हाला प्रोत्साहन देता तेव्हा मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू द्या. आम्हीही नवनवीन विषयांवरील उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस आणत राहूच याची खात्री बाळगा. लवकरच नवीन विषयासह भेट होईल. तोपर्यंत आपल्या टीमचे न वाचलेले लेखही आवडीने वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *