Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या ग्रुपने फ्रेशर्स पार्टीमध्ये केलेला हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

कॉलेजच्या ग्रुपने फ्रेशर्स पार्टीमध्ये केलेला हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही

भूतकाळ ही अशी एक बाब आहे की काही केल्या मनातून त्याच्या छटा पुसता येत नाहीत. त्यामुळेच की काय काही वेळेस भूतकाळातील आठवणी बहुतांश वेळेस हसवतात, खुश करतात तर कधी कधी रडवतात आणि बराच विचार करायला लावतात. पण एक मात्र मान्य करायला हवं की गत काळातील सकारात्मक आठवणी एकदा का आठवल्या की त्यातून बाहेर पडावसं वाटत नाही. त्यातच आपला बराच वेळ निघून जातो. आणि नीट बघितलं ना मंडळी तर यातील बहुतांश आठवणी या आपल्या तारुण्याच्या काळातल्या असतात. अर्थात या आठवणी पुन्हा मनःपटलावर यायला एखादं कारणही पुरतं.

कदाचित या काळात आपलं मन त्यामानाने कोवळं असतं, अजून अल्लड असतं म्हणून असेल, पण आपण बऱ्याच गोष्टी अगदी मनाला लावून घेतो. तसेच गोष्टी मनापासून करतो सुद्धा. त्यामुळे पुढे जाऊन या क्षणांच्या आठवणी आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून राहतात. कारण त्यांना सच्च्या भावनांची जोड असते. अर्थात एकदा कामाला किंवा संसाराला लागलं की मग सगळंच बदलत जातं. असो.

पण मुद्दा काय तर या काळात आपण जी धमाल मस्ती करतो ती सदैव आपल्या स्मरणात असते. त्यातही सगळ्यांत जास्त आठवणी या कॉलेज काळातील फेस्टिव्हल्सच्या असतात. कारण आपल्याला जे काही जमत असेल नसेल ती सादर करण्याची खुमखुमी आपल्यांत असते. तसेच आपण करतो ते सगळंच चांगलं असा एक उगाचच असलेला पण काही वेळा महत्वपूर्ण ठरणारा आत्मविश्वास असतो. यामुळे मग आपसूक एखादा फेस्टिवल किंवा इव्हेंट असला की आपली पाऊलं आपसूक तिथे वळतात. त्यातही फ्रेशर्स पार्टी असेल तर बाबा रे बाबा. सगळ्यांत जास्त उत्साह असतो. आपल्या ज्युनिअर्स साठी एखादा इव्हेंट तयार करणं म्हणजे सिनियर्सचा आवडीचा विषय. त्यात ती सगळी मूलमुली नवीन नवीन येतात तेव्हा बावरलेली असतात. या पार्टीमुळे निदान थोडी रुळतील असाही यामागे विचार असतोच. आता तुम्ही म्हणाल यांना आज अचानक झालंय काय एवढं. भूतकाळ, फ्रेशर्स पार्टी वगैरे विषय हाती घेतला आहे एकदम. कारण आहे आज आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो. हा व्हिडियो सुश्मिता थापा यांच्या युट्युब चॅनेल वरून बघायला मिळतो. या व्हिडियोतून त्यांच्या कॉलेजमधील फ्रेशर्स पार्टी चा डान्स आपल्याला बघायला मिळतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे एखादं कारणही भूतकाळातील सकारात्मक आठवणींना मनावर तरंगायला पुरेसं असतं. हा व्हिडियो आमच्या बाबतीत हेच करता झाला. आपल्या टीमच्या कॉलेजमधील सगळ्या आठवणी जाग्या झाल्या अगदी.

आपणही हा व्हिडियो बघितला असेल आणि हा लेख इथपर्यंत वाचला असेल तर आपल्या वैयक्तिक आठवणी ही ताज्या झाल्या असतीलच. अहो काय नाहीये या व्हिडियोत. सगळ्या मस्त आणि प्रसिद्ध गाणी यात तुम्हाला ऐकायला मिळतात. त्यावर या कॉलेजमधील मुलं मुली मस्त असा डान्स परफॉर्मन्स ही देतात. बरं जुनी नवीन सगळीच गाणी यात आहेत म्हंटल्यावर अजून मजा येते. त्यात यातील स्टेप्स ही चट्कन जमून जातील अशा आहेत. पण सगळ्यांत महत्वाचं म्हणजे यात आहे तो सगळ्या तरुणाईचा उत्साह. तो जसा आपल्याला स्टेजवर परफॉर्मन्स देणाऱ्या मुलामुलींमध्ये दिसून येतो. तसाच तो कॅमेऱ्यामागून या परफॉर्मन्सची मजा घेणाऱ्या प्रत्येक तरुण तरुणीच्या आवाजातून कळून येतो. म्हंटलं ना, नकळत आपले जुने दिवस आठवतात. ते याच उत्साह आणि ऊर्जेमुळे. त्यामुळेच जर आपण हा व्हिडियो अजूनही बघितला नसेल, तर जरूर बघा. आपण आपल्या आठवणींमध्ये गुंगून जाल हे नक्की.

आपण त्या आठवणींच्या गोतावळ्यात गुंगून जाण्याआधी हा लेख आठवणीने शेअर करायला विसरू नका. कारण आपलं प्रोत्साहन मिळत राहतं आणि आमचे हात ही लिहिते राहतात. तेव्हा आपलं प्रोत्साहन आमच्या पूढे शेअर आणि कमेंट्स द्वारे पोहोचू द्यात. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आठवणींच्या झोपल्यावर झुला, आपल्या टीमचे अन्य लेखही वाचा आणि त्यांचाही आनंद घ्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *