Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या तरुणींनी केलेला ग्रुप डान्स पाहून तुमचेदेखील पाय थिरकल्याशिवाय राहणार नाही, बघा अप्रतिम डान्स व्हिडीओ

कॉलेजच्या तरुणींनी केलेला ग्रुप डान्स पाहून तुमचेदेखील पाय थिरकल्याशिवाय राहणार नाही, बघा अप्रतिम डान्स व्हिडीओ

इंटरनेटचं जग हजारो आणि लाखो व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेलं आहे. इथं दररोज अनेक व्हिडिओ आणि फोटो पाहिले आणि अपलोड केले जातात. पण काही असे आहेत जे सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. विशेषतः डान्स व्हिडिओ. अलीकडच्या काळातही एक डान्स व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे. आपल्या देशात नृत्याचे अनेक प्रकार आहेत आणि त्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी भोजपुरी गाण्यावरचा डान्स व्हायरल होतो, तर कधी वराच्या लग्नात केलेला डान्स इंटरनेटवर कहर करतो. अजून एक डान्सचा प्रकार आहे, जो सध्या खूप चालतोय, त्या नृत्याचं नाव आहे नागीण डान्स. आपल्या देशातल्या जवळपास प्रत्येक लग्नात हा पाहायला मिळेल. हे नृत्य करण्याची प्रत्येकाची स्वतःची नवीन आणि वेगळी शैली आहे. यानंतर उरतो तो गणपती उत्सव डान्स… गणपती बाप्पा बसल्यावर जे डान्स सादर होतात किंवा मिरवणुकीत जो जबरदस्त डान्स केला जातो, त्याला तर काहीच तोड नाही.

पण आता आमच्याकडे एक असा डान्स व्हिडीओ आला आहे, ज्यात सगळ्याच डान्स प्रकारांचे मिश्रण आहे. अगदी शास्त्रीय पासून तर गणपती मिरवणूक डान्सपर्यंत सगळे डान्स या व्हिडीओत आपल्याला दिसून येईल. 5-7 पोरींनी एकत्र येऊन केलेला हा डान्स सोशल मीडियावर खूपच व्हायरल।होताना दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की 5-7 मुली डान्स करताना बेभान झाल्या आहेत. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात त्यांनी पालकांसमोर एकदम भारी आणि अफलातून असा डान्स केला आहे.

त्यांचा डान्स आणि गाण्यांची चॉईस बघून पालकही नाचताहेत की काय? असेच आपल्याला वाटून जाते. आता व्हिडीओ पाहिल्यावर कदाचित तुम्हाला असेही वाटू शकते की, या व्हिडीओत तर विशेष काहीच नाही. मुलींनी डान्स छान केला आहे पण तुम्ही कौतुक करताय एवढं काहीच वेगळेपण नाही, असं तुमच्या मनात येऊ शकतं. पण लक्षात घ्या… यातील वेगळेपणा तुम्हाला सहजपणे लक्षात येणार नाही.

खरं पाहता, भारतातील लोकनृत्ये ही समाजाची संस्कृती आणि परंपरेचे प्रतिनिधित्व करतात जिथून त्याचा उगम झाला. लोकनृत्य सामान्यतः संबंधित समुदायाच्या उत्सवादरम्यान सादर केले जातात – बाळंतपण, सण, विवाह इ. भारतात लोक व शास्त्रीय नृत्यांचे विविध प्रकार आहेत. हे नृत्याचे प्रकार एकाच गाण्यात आजवर तुम्ही पाहिले नसतील. पण लोकांना बोर न करता बऱ्यापैकी नृत्यप्रकार या मुलींनी केले आहेत. प्रत्येक नृत्यप्रकारची थोडीशी का होईना झलक या नाचणाऱ्या विद्यार्थ्यांना दाखवली आहे.

अगदी आपले रोज टीव्हीवर लागणारे कोळीगीतामधील एक पारंपरिक डान्स स्टेप सुद्धा या मुलींनी घेतली आहे, आणि हेच या व्हिडीओचे वेगळेपण आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *