शाळा कॉलेजमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, इव्हेंट्स यांची सर कशालाच नाही. कारण ते इव्हेंट अथपासून इतिपर्यंत नेताना जी काही मजा येते, तसेच दमछाक होते, ती सगळी आपल्या आठवणींच्या खजिन्यात बंदिस्त होते. तसेच ज्या व्यक्ती, त्यात सहभागी होत असतात, त्यांच्यासाठी वेगळीच घालमेल सुरू असते. सगळं व्यवस्थित होईल ना, आपण जे सादरीकरण करतोय ते ठरल्याप्रमाणे पार पडेल ना, ही विचारसरणी त्यापाठी असते. पण काही जण, या सगळ्या विचारांवर मात करून उत्तम परफॉर्मन्स देतात. त्यांचं सादरीकरण सगळ्यांना आवडून जातं.
असंच एक सादरीकरण बघण्याचा योग आला. एक व्हिडियो सोशल मीडियावर गेली काही वर्षे होता. या काळात तब्बल १.८ कोटी या व्हिडियोने मिळवले होते. म्हणजे जबरदस्त वायरल ठरला होता. आज आम्ही तो बघितला आणि आम्हालाही आवडून गेला. म्हंटलं त्यावर लिहुया. हा व्हिडियो आहे केंद्रीय विद्यालय या नामांकित संस्थेतला ! अंकलेश्वर येथील संस्थेच्या इमारतीत सादर झालेला हा परफॉर्मन्स खूपच वायरल झाला होता. सहा मुलींनी मिळून हा परफॉर्मन्स दिला होता. जवळपास तीन ते साडे तीन मिनिटे हा परफॉर्मन्स चालतो.
या वेळेत कदाचित आपल्याला एखाद्या गाण्यावर सादरीकरण बघायला मिळेल अस वाटलं असेल तर आपण चूक आहात. कारण, तब्बल पाच गाण्यांच्या मॅश अप वर या मुली परफॉर्मन्स करत असतात. सुरुवात खरं तर अशा गाण्याने होते की हे गाणं वाजवायला परवानगी दिली कशी अस वाटावं? पण नंतर लक्षात येतं की सुरुवातीचं संगीत तेवढं वापरलं गेलेलं आहे. त्यामुळे पुढील (निदान शाळा कॉलेज आवारात अब्रह्मण्य वाटणारे) शब्द, मात्र आपल्या कानावर पडत नाहीत. मग पुढे लंबरगिनी हे गाणं वाजायला लागतं. त्यावरही या मुलींचा परफॉर्मन्स छान होतो. पुढे , ‘बुद्ध सा मन हैं’, ‘तुम्ही हो बंधू सखा तुम्ही’ ही गाणी ऐकायला मिळतात. या दरम्यान मुलींनी डान्स करताना आपल्या जागा बदललेल्या असतात. त्यामुळे आपसूक वेगवेगळे चेहरे प्रकाश झोतात येतात. बरं प्रत्येकीची स्वतःची म्हणून एक डान्स स्टाईल असते. त्यामुळे प्रत्येकीला केंद्रस्थानी यायला मिळो न मिळो, सगळ्यांचा डान्स लक्षात राहतो. तसेच त्यांनी केलेल्या कोरिओग्राफीचं कौतुक ही वाटतं.
पुढे ‘बाकी सब फर्स्ट क्लास हैं’ म्हणत या परफॉर्मन्सचा शेवट होतो. त्यावेळी दिले गेलेले ठुमके विशेष लक्षात राहतात. कारण त्या स्टेपमध्ये सगळ्या जणींनी अगदी एकसंध होऊन परफॉर्मन्स दिलेला जाणवून येतो. आपणही हा परफॉर्मन्स बघितलेला असेल तर आपल्याला हे जाणवेल. पण आपण हा परफॉर्मन्स बघितला नसेल तर मात्र एका सुंदर परफॉर्मन्सला आपण मुकला आहात. पण काळजी नसावी. आपली टीम, सदर व्हिडियो आपल्या वाचकांसाठी या लेखाच्या शेवटी शेअर करते आहे. त्यामुळे आपण या डान्सचा आनंद घेऊ शकाल.
बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :