Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या प्रिन्सिपलने विध्यार्थ्यासोबत केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

कॉलेजच्या प्रिन्सिपलने विध्यार्थ्यासोबत केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आपली टीम ही उत्तम शिक्षक आणि त्यांच्या विद्यार्थिभिमुख कार्याविषयी सातत्याने लिहीत आलेली आहे. तसेच अनेक विद्यार्थीप्रिय शिक्षकांविषयी सुदधा लिहीत आलेली आहे. कारण, आम्ही स्वतः विद्यार्थीदशेत असताना विद्यार्थीप्रिय शिक्षक आम्हालाही आवडायचे. आपणही यास अपवाद नसालच. विद्यार्थीप्रिय म्हणजे अर्थातच विद्यार्थ्यांना समजून घेणारे, त्यांच्यात सरमिसळून जाणारे, त्यांच्या कलाने घेत त्यांना शिकवणारे शिक्षक होय.

त्यांच्यातील हे सगळे गुण जसे त्यांच्या शिकवण्याच्या पद्ध्तीतून कळून येतात, तसेच त्यांच्या वागण्यातून ही कळून येतात. असे हे शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये अगदी आपलेपणाने वावरतात. त्यांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात. याचंच एक उत्तम उदाहरण असलेला व्हिडियो काही काळापूर्वी आला होता. आजतागायत त्या व्हिडियोने दशलक्षाहुन अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. यावरून त्या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. पण या लोकप्रियतेमागे काही कारण असेलच की? होय आहे ना, या व्हिडियोत उत्साहाने नाचणारे शिक्षक हे ते कारण होय. खरं तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत डान्स करणं वगैरे म्हणजे अंमळ अवघड गोष्टच असते. कारण शिक्षक हे अतिशय शिस्तीचे गणले जातात. तसेच स्वतःचा आब राखून वागावं अशी ही मानसिकता असते. त्यात काहीच चूक नाही. बरोबरच आहे ते ! पण काळानुसार बदलायला ही हवं.

हीच बाब या शिक्षकांच्या वर्तनातून दिसून येते. बरं हे काही साधेसुधे शिक्षक नसतात. चर्च मध्ये जे फादर असतात त्यांच्या सारखा यांचा पोशाख असतो. म्हणजे हे सदर शिक्षक मुख्याध्यापक वगैरे असावेत असा अंदाज करायला हरकत नाही. त्यामुळे या व्हिडियोचं महत्व अजून वाढतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला फेअरवेलचा समारंभ चालू असलेला दिसून येतो. अर्थातच उत्साही विद्यार्थीमंडळ हे असतंच. सोबतच वर उल्लेख केलेले प्राध्यापक ही असतात. तेवढ्यात एक गाणं वाजायला लागतं. सहा ते सात वर्षांपूर्वी आलेलं हे गाणं आहे. ‘बहा किलीक्की’ असं या गाण्याचं नाव आहे. टीम बाहुबली यांच्यासाठी स्मिता या लोकप्रिय गायिकेने सादर केलेलं हे गीत आहे. अतिशय लोकप्रिय आहे. या गाण्याच्या व्हिडियोने तब्बल १३ कोटींहून अधिक व्ह्यूज कमावले आहेत. आता बोला ! तर अशा या लोकप्रिय गाण्यावर ही विद्यार्थी आणि शिक्षकाची जोडी डान्स करत असते. सुरुवातीला वाटतं, हा विद्यार्थी या शिक्षकांना डान्स स्टेप्स शिकवेल आणि मग ते त्या डान्स स्टेप्स करतील. हे खरंही ठरतं. पण व्हिडियोच्या शेवटी. कारण व्हिडियोच्या सुरुवातीपासून या प्राध्यापकांनी डान्स फ्लोअरचा ताबा घेतलेला असतो. त्यांच्या बाबतीतची कौतुकाची गोष्ट म्हणजे ते बिट्स अगदी वेळेवर पकडत असतात. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही जाणवलं असेल. आणि जे डान्सर बिट्स पकडून डान्स करू शकतात ते उत्तम परफॉर्मन्स देऊ शकतात.

इथेही तेच होताना दिसत. बरं नुसतं बिट्स पकडून परफॉर्मन्स उत्तम देऊ शकतो. पण त्याला तेवढ्याच उत्तम डान्स स्टेप्सची जोड हवी. ती असेल तर मग सोने पे सुहागा अशी परिस्थिती येते. या व्हिडियोत तेच दिसून येतं. आणि या सगळ्याला त्या प्राध्यापकांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाची जोड मिळाल्याने न भूतो न भविष्यती परफॉर्मन्स बघायला मिळतो. अर्थात त्या प्राध्यापकांना स्वतःला डान्सची आवड असावी हे उघडच आहे. पण ती तशी नसेल तर मात्र आश्चर्याचा धक्काच आहे. कारण एवढ्या कमी वेळात एवढा उत्तम डान्स, फक्त डान्सची प्रचंड आवड असणारी व्यक्तीच करू शकते. आपण हा व्हिडियो जर बघितला नसेल तर जरूर बघा. कारण या व्हिडियो विषयी आम्ही लिहीत जाऊ, तुम्हीही वाचत जाल. पण खरी मजा व्हिडियो बघण्यात आहे. ती तुम्हाला मिळावी या हेतूने आमच्या टीमने सदर व्हिडियो या लेखाच्या खाली शेअर केलेला आहे. आपण त्या व्हिडियोचा आनंद जरूर घ्या. तसेच तो आनंद घेऊन झाला की आमच्या टीमचे अन्य लेखही जरूर वाचा आणि आठवणीने शेअर करा.

आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *