Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या मुलांनी केलेला हा जबरदस्त ग्रुप डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

कॉलेजच्या मुलांनी केलेला हा जबरदस्त ग्रुप डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

शाळा असो वा कोलेज, त्यातील कोणतंही स्नेहसंमेलन असो एक असा ग्रुप नेहमी आपल्याला भेटतो जो प्रत्येक समारंभाला डान्स करण्यास अगदी उत्सुक असतो. एवढंच नव्हे तर डान्सही उत्तम करतो. त्यामुळेच आपल्याला ही प्रत्येक वर्षी त्यांच्या डान्स परफॉर्मन्सची उत्सुकता लागून राहिलेली असते. आज आपल्या टीमने अशाच एका हरहुन्नरी डान्स ग्रुपचा परफॉर्मन्स एका वायरल व्हिडियो मार्फत पाहिला. म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना कळायला हवं. कारण हा डान्स तीन वर्षांपूर्वी केलेला असला तरी आजही आपल्याला आनंद देऊन जातो. चला तर मग वेळ न दवडता, या वायरल व्हिडियोविषयी जाणून घेऊयात.

या व्हिडियोतील डान्स परफॉर्मन्स हा VIT, पुणे या संस्थेच्या विश्वकरंडक २०१८ या स्पर्धेदरम्यान सादर केलेला होता. या डान्स परफॉर्मन्स मध्ये जुन्या, नव्या, उत्साहाने भरलेल्या तर काहीशा शांत अशा पाच गाण्यांचा अनुभव घेता येतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला स्टेजवर काही मुलं मुली दिसतात. स्टेजच्या खाली हा परफॉर्मन्स जज करण्यासाठी माननीय पाहुण्या आसनस्थ झालेल्या असतात. डान्स परफॉर्मन्सच्या सुरुवातीला ही मंडळी थोडासा विनोदी अभिनय करून दाखवतात. त्यामुळे एक हलकं फुलकं वातावरण तयार होण्यास मदत होते. मग याच्याशीच निगडित गाणं ही आपल्या कानावर येतं. ‘कोई मिल गया’ चित्रपटामधील ‘इट्स मॅजिक’ हे ते गाणं असतं. पहिल्याच गाण्यात या मुलांची ऊर्जा ही थक्क करणारी असते. तसेच त्यास जबरदस्त अशा डान्स स्टेप्सची जोड ही मिळालेली असते. यात अजून आनंदाची भर टाकणारी बाब म्हणजे हृतिक रोशन यांनी केलेल्या डान्स मधील काही जुन्या डान्स मुव्ह्ज आपल्याला येथे पाहायला मिळतात. मजा येते.

हाच सिलसिला दुसऱ्या गाण्यातही दिसून येतो. ‘स्त्री’ चित्रपटातील ‘मिलेगी मिलेगी’ हे गाणं यावेळी वाजत असतं. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या डान्सने आणि तडकत्या फडक्त्या म्युझिक ने गाजलेलं हे गाणं ही मुलं पुन्हा एकदा गाजवतात. यावेळी त्यांना मुलींची ही सोबत मिळालेली असते. आधीच्या गाण्यावर फक्त मुलंच डान्स करताना दिसत असतात. पुढे मात्र एकापेक्षा एक फॉर्मेशन करत मुलं मुली जबरदस्त डान्स परफॉर्मन्स देत राहतात. हे गाणं संपत तेव्हा मूळ परफॉर्मन्समधील स्टेप करत ही मुलं तिसऱ्या गाण्याकडे वळतात. तिसरं गाणं मात्र काहीसं शांत असतं. दोन धमाल गाण्यांनंतर एवढं शांत गाणं काहीसा मूड शांत करते. या गाण्यावर एक मुलगा आणि मुलगी परफॉर्मन्स देतात. गाणं शांत असल्याने ह्या दोघांच्या डान्स स्टेप्सचा वेग ही मंदावलेला असतो. पण हा परफॉर्मन्स ही आवडून जातो. मग थोडंसं नॉस्टॅल्जिक करणारी दोन गाणी आपल्या भेटीस येतात. चौथं गाणं हे खाकी चित्रपटातलं अक्षय कुमार आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं गाणं असतं. एकदम गतिमान नसलं तरी आधीच्या गाण्याच्या मानाने जास्त वेगवान असतं. ‘दिलं डुबा’ हे या गाण्याचे शब्द. या मुलांनी यावरही उत्तम डान्स केलेला असतो हे काही वेगळं सांगायला नकोच.

मग वेळ येते पाचव्या आणि शेवटच्या गाण्याची. एवढा उत्तम परफॉर्मन्सचा शेवटही उत्तम असावा अशी आपली अपेक्षा तयार झालेली असते आणि तो ही तसाच असतो. कुली नं १ या सुपरहिट चित्रपटातील ‘हुस्न हैं सुहाना’ या गाण्यावर ही मंडळी आपल्याला पुन्हा एकदा जबरदस्त असा डान्स करताना दिसतात. एव्हाना चार गाण्यांवर डान्स करून ते त्यांची ऊर्जा थोडी कमी वाटत असते, पण तरीही उत्साह एवढा दांडगा असतो की हा डान्स सुद्धा अफलातून होऊन जातो. आपण हा व्हिडियो पाहिला असल्यास आपलंही हेच मत झालं असणार यात शंका नाही. आमच्या टीमला ही हा वायरल व्हिडियो खूप आवडला. आपण जर हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. आपल्याला ही आवडेल.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असणार हे नक्की. आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. त्यासाठी आवश्यक असलेलं प्रोत्साहन हे आपल्याकडूनच मिळत असतं. यापुढेही हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहू दे ही सदिच्छा. लवकरच एका नवीन विषयावरिल लेखासह भेटूच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपण न वाचलेले लेख आवर्जून वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *