Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या मुलांनी ‘गेली माझी सख्खी बायको गेली’ गाण्यावर केलेला डान्स होतोय वायरल, बघा हा मजेशीर व्हिडीओ

कॉलेजच्या मुलांनी ‘गेली माझी सख्खी बायको गेली’ गाण्यावर केलेला डान्स होतोय वायरल, बघा हा मजेशीर व्हिडीओ

सध्या शाळा कॉलेजेस बंद आहेत आणि त्यामूळे लेक्चर्स पासून ते अगदी छोटेखानी समारंभांपर्यंत अनेक गोष्टी आता ऑनलाईन झाल्या आहेत. या ऑनलाईन गोष्टींना शिक्षक आणि विद्यार्थी तेवढेच वैतागलेले असले तरीही आपल्या समोर काही पर्याय नाही. पण असं असलं तरीही शाळा कॉलेजमधील आपल्या जुन्या आठवणी आपल्याला आंनद देऊन जातातच की. खासकरून शाळा कॉलेजेस मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आपण घेतलेला सहभाग आपल्याला हमखास आठवतो. त्या काळात कमी बजेट असलं तरीही सगळं ‘मॅनेज’ कसं करायचं हे आपण शिकतो. पण या सगळ्यात जी मजा असते ना ती काही पैशात मोजता येत नाही बघा. अशाच एका महाविद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता. मागील वर्षी लॉक डाऊन लागण्याच्या आधीची गोष्ट आहे. या फार्मा महाविद्यालयात एका वार्षिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. या कार्यक्रमात फार्मा बॉईज आणि गर्ल्स ने एक धमाल परफॉर्मन्स दिला होता.

त्या परफॉर्मन्सचा व्हिडियो हा वायरल झाला होता, ज्या विषयी आमच्या टीमला आठवलं. कारण तेच ! आम्ही आमच्या कॉलेज जीवनातल्या आठवणी आठवत होतो तेव्हा या व्हिडियोची आठवण झाली. मग वायरल व्हिडियो म्हंटला की त्यावर वायरल लेख लिहिणं आलंच. हा वायरल व्हिडियो आहे एका प्रसिद्ध गाण्यावरचा. ‘माझी सख्खी बायको गेली’ हे ते गाणं. आपण युट्युब वर बघितलं तर असं जाणवतं की अनेक कॉलेजचा सांस्कृतिक कार्यक्रमात या गाण्यावर परफॉर्मन्स केलेला दिसून येतो. तर या वायरल व्हिडियोची सुरुवात होते ती ‘बहारो फुल बरसाओ, मेरा मेहबूब आया है’ या गाण्याने. या परफॉर्मन्स मधली मुलं मुली एक एक करून आपल्या समोर येतात. रंगमंचाच्या बाहेरून कलाकारांनी एन्ट्री घेतली की सहसा प्रेक्षकांना आवडतेच. कारण त्यात प्रेक्षाकांचा सहभाग असतो. अशी ही दमदार एन्ट्री करत ही सगळी मंडळी रंगमंचावर दाखल होतात. हिंदी गाणं थांबतं. मध्ये काही क्षण पॉज घेतला जातो. प्रेक्षक मुला मुलींच्या टाळ्या शिट्यांचा आवाज पूर्ण घुमतो.

सूत्रसंचालक ही विशेष गंमतीशीर सूचना करतो आणि हशा पिकतो. तेवढ्यात ‘गेली माझी सख्खी बायको गेली’ हे गाणं वाजायला लागतं. मग काय रंगमंचावरच्या ‘कल्ला’कारांमध्ये अचानक जी ऊर्जा संचारते की काय विचारू नका. त्यातही दा’रू पिण्याचा अभिनय करणारी मुलं तर अफलातून. आपली रिकामी बाटली मे’लेल्या बायकोची भूमिका साकार करणाऱ्या मुलाच्या तोंडाला लावतात. आपण हसत सुटतो. आपणही या वयात केलेले कि’डे आठवतात. मग पुढे हा परफॉर्मन्स चालू असताना गाणं अचानक थांबतं. त्यावर नवऱ्याची आणि त्याच्या मित्रांची भूमिका करणारे विद्यार्थी चपापतात. आता गोंधळ होतो की काय असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात. पण सुदैवाने पुढे पूर्ण व्हिडिओभर तसं काही होत नाही. या कल्लाकारांची धमाल मात्र पुढचे काही मिनिटं आपण बघतो. त्यात जे जे संवाद आहेत ते संवादसुद्धा धमाल आणतात.

हा परफॉर्मन्स बघून आपण किंवा आपल्या मित्र मैत्रिणींनी केलेले परफॉर्मन्स आठवतात. त्यासोबत केलेले कि’डे तर विशेष आठवतात. आपला मूड ताजातवाना होण्यासाठी या व्हिडियोची खूप मदत होते. या वायरल व्हिडियो वरील आमच्या टीमने लिहिलेला लेख आवडल्यास नक्की शे’अर करा. तसेच तुम्हाला आमच्या वे’बसाई’टवर वायरल व्हिडियोज, मनोरंजन क्षेत्र, कलाकार, वायरल बा’तम्या अशा विविध विषयांवर आमच्या टीमने लिहिलेले लेख उ’पलब्ध आहेतच. आपण या लेखांचाही आस्वाद घ्या. त्यासाठी वर उपलब्ध असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करायला विसरू नका. आपण देत असलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.