Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या मुलांनी ‘लल्लाटी भंडार’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

कॉलेजच्या मुलांनी ‘लल्लाटी भंडार’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

शाळा कॉलेज मधल्या आठवणींत जेव्हा जेव्हा मन रमत तेव्हा तेव्हा त्या आठवणी आपल्याला सुखावून जातात. काही दुःखद आठवणी सुद्धा असतात. पण चांगल्या आणि लक्षात ठेवाव्या अशा आठवणींची संख्या जास्त असते. यातील अनेक आठवणी या कॉलेज जीवनात केलेल्या इव्हेंट्स च्या असतात. ज्यांनी यात डान्स, गाणं आणि इतर बाबीत भाग घेतलेला असतो त्यांच्या आठवणी असतातच पण ज्यांनी केवळ हे परफॉर्मन्स पाहिलेले असतात त्यांच्याही आठवणी असतात. सध्याच्या काळात कोलेजस बंद त्यामुळे या सगळ्यांना खीळ बसल्या सारखी झाली आहे. पण यावेळी सोशल मीडिया हा आपल्यास उपयुक्त पडतो. यावर जुन्या जुन्या वायरल व्हिडियोज मधून आपल्याला या आठवणी पुन्हा जगता येतात. असंच काहीसं आपल्या टीमच्या बाबतीत झालं. नुकताच एक वायरल व्हिडियो बघण्याचा योग आला आणि आपल्या टीमच्या कॉलेजे जीवनातील आठवणी ताज्या झाल्या. म्हंटलं आपल्या वाचकांना या वर एक लेख लिहिला तर नक्की आवडेल म्हणून हा लेखप्रपंच.

हा व्हिडियो आहे मुंबईतील राष्ट्रीय विद्या भवन्स या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा. जवळजवळ एका दशकापूर्वीचा हा व्हिडियो आहे. २०११-१२ च्या दरम्यान कधी तरी स्नेहसंमेलन झालं असावं आणि त्याप्रसंगी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जो डान्स केला त्याचा हा व्हिडियो आहे. व्हिडियोची सुरवात होते तेव्हा सूत्रसंचालक आपल्याला कोरिओग्राफर आणि गाण्याची ओळख करून देतात. किरण सकपाळ यांनी हा डान्स कोरिओग्राफ केल्याचं कळतं. यातील डान्सर्स ची नाव मात्र कळू शकत नाहीत. पण ही मुलं जो काही डान्स करतात ना त्यास तोड नाही. त्यांच्या डान्स मधून आपल्याला एक गोष्ट सहज अधोरेखित करता येते ती म्हणजे त्यांच्यात असलेली अपरिमित ऊर्जा. ते डान्स करत असलेलं गाणं ही तेवढंच ऊर्जावान गाणं आहे. ‘जोगवा’ चित्रपटातलं ‘लल्लाटी भंडार’ हे ते गाणं. एवढी वर्ष झाली तरी ते गाणं ऐकलं तरी आजही उत्साहित वाटायला लागतं. त्यामुळे ही मंडळी ज्या सहजतेने या गाण्याशी एकरूप होतात ते बघून थक्क व्हायला होतं. नऊ जणांच्या ग्रुप ने हा डान्स सादर केला आहे.

यातील प्रत्येकाने आपापल्या परीने डान्स करत हे नृत्य कसं उत्तम होईल हे पाहिलं आहे. त्यातही कडव्यांनुसार त्यांनी आपल्या स्टेप्सच्या वेगात केलेले बदल ही लक्षणीय. तसेच वेगवेगळ्या स्टेप्स घेत हा डान्स केल्याने त्याची रंगत वाढते. त्यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जेव्हा ही नऊ जण एकत्र एकदम ऐटीत चालत येतात तेव्हा तर उपस्थितांचा जल्लोष अगदी टोकाला पोहोचलेला असतो. संपूर्ण व्हिडियोभर उपस्थितांकडून या ग्रुपला मिळणारा पाठींबा हा अगदी लक्षणीय असतो. आपण वाचक म्हणून आपल्या टीमला जसा भक्कम पाठींबा देता, त्याची आठवण होते. व्हिडियोची अजून एक जमेची बाजू म्हणजे यात वेळोवेळी बदल केलेले लाईट इफेक्ट्स. त्यांच्यामुळेही या परफॉर्मन्सची परिणामकारकता वाढते. अर्थात प्रथम स्थान जातं ते या मुलांच्या सकारात्मक उर्जेला. डान्स करणारा जर अगदी आत्मविश्वासाने डान्स करत असेल तर बघणाऱ्याला त्याचा आनंद घेता येतो. किंबहुना हा आनंद द्विगुणित होतो. हाच अनुभव आपल्याला हा व्हिडियो बघताना येतो. तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या जुन्या आठवणींना ताजा करणारा असा हा व्हिडियो आहे.

आपल्या पैकी बहुतेकांनी शाळा आणि कॉलेज इव्हेंट्स मध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाग घेतलेला असतो. हा व्हिडियो बघून आपल्या या सुखद आठवणी ताज्या झाल्याचं असतील हे नक्की. आपली टीमही यास अपवाद नाही. तर असा हा सुखद आठवणी जागा करणारा व्हिडियो एवढ्या वर्षानंतर बघायला मिळाला याचा आनंदच आहे. आपण हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला हा व्हिडियो आवडला का आणि त्यातील कोणती गोष्ट आवडली हे कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. तसेच आपल्या टीमने लिहिलेल्या प्रत्येक लेखाला आपण ज्या उत्तमरीत्या प्रोत्साहन देता त्याबद्दल धन्यवाद. आपण केलेली प्रत्येक सकारात्मक कमेंट् आणि सोशल मीडिया वर हे लेख शेअर करणं आम्हाला सुखावून जातं. येत्या काळातही आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी कायम राहील हे नक्की. आपल्या टीमवर आपल्या समस्त वाचकवर्गाचा लोभ कायम असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *