Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या मुलांनी स्टेजवर केलेला हा अतरंगी ‘लेझी डान्स’ पाहून तुमचे सुद्धा हसू आवरणार नाही

कॉलेजच्या मुलांनी स्टेजवर केलेला हा अतरंगी ‘लेझी डान्स’ पाहून तुमचे सुद्धा हसू आवरणार नाही

कॉलेज जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींमधील एक गोष्ट म्हणजे कॉलेज मधील इव्हेंट्स. मग त्या इव्हेंट्सपाठची कारण कोणतंही असो, पण हरहुन्नरी मुलामुलींना काही ना काही कला सादर करण्याची ही एक नामी संधी असते. सोबतच कॉलेज मधला एक उचापत्या ग्रुप ही असतो जो ही संधी शोधत असतो. कारण यानिमित्ताने सगळ्यांसमोर अतरंगी मजा मस्ती करण्याची संधी त्यांना मिळणार असते. मग काय, एक तर कुठंच तरी अतरंगी गाणं घेऊन ही मुलं एखादा भन्नाट डान्स सादर करतात किंवा अजून एक डान्स प्रकार तर या मजा मस्ती करणाऱ्या मंडळींचा हक्काचा आहे. लेझी किंवा इमोशनलेस डान्स. या प्रकारात डान्स करणारी ही सगळी मंडळी मंचावर जातात आणि विविध गाण्यांवर पाच ते सहा मिनिटं प्रहसनात्मक नाचतात. सोप्प्या भाषेत किडे करतात. असाच एक वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला. यात सहभागी घेतलेली मुलं असा काही लेझी डान्स करतात की काय विचारू नका. फुल्ल धमाल. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा ट्रेनच्या डब्यांसारखे एकत्र येत मित्रांचा एक ग्रुप मंचावर येतो.

त्याच क्षणी कॅमेऱ्यामागून सगळ्यांनी हसायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे मित्रांचा हा ग्रुप भारी प्रसिद्ध असणार हे कळून येतं. बरं त्यांचा पोशाख पण तसाच. फुटबॉल जर्सी आणि हाफ पॅन्ट. सोबत एका पायात मोजा, बूट आणि दुसरा पाय असाच. आपणही मनात म्हणत असतो हे लोक धुमाकूळ घालणार. ते खरं ही होतं. पहिलं गाणं म्हणजे एका प्रसिद्ध जाहिरातीची जिंगल असते. वॉशिंग पावडर निरमा या नाममुद्रेची ही जाहिरात. त्यातल्या स्टेप्समुळे हा ग्रुप सगळ्यांची वाहवा मिळवतो. मग काही क्षण जातात आणि नवीन गाणं सुरु होतं. ‘हाय हुकू हाय हुकू हाय हाय’ हे ते गाणं. त्यावरही आधी सारखाच मस्त प्रतिसाद मिळतो. पण या दोघांपेक्षा तिसऱ्या गाण्यावरील परफॉर्मन्स जास्त हशा टाळ्या मिळवून जातो. हुस्न हे सुहाना या गाण्यावर केलेल्या या स्टेप्स खूप भाव खाऊन जातात. मग अजून एक ब्लॉकबस्टर गाणं वाजतं. ‘चोली के पिछे क्या है’ हे ते गाणं. मग सुप्रसिद्ध कलाकार गोविंदा यांचा प्रसिद्ध डान्स असलेलं गाणं – तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू – वाजतं. या गाण्यातही हा ग्रुप यात रंगत भरतो हे नक्की.

एव्हाना सगळीकडे टाळ्या, बोलण्याचा आवाज झालेला असतो की पुढची दोन गाणी कोणती हे कळत नाहीत. तसेच पाच मिनिटं कधी झाली हे सुदधा कळत नाही. या पाच मिनिटांत या मुलांनी एवढी धमाल आणलेली असते की या डान्स परफॉर्मन्सचा शेवटही मस्त व्हावा असंच वाटत असतं. आपली निराशा होत नाही. शेवटचं गाणं वाजतं. ‘अपने जिगर को थाम के बेठो’. आंटी नंबर वन या चित्रपटातील हे गाणं. पुन्हा गोविंदा जी यांनी केलेला अप्रतिम डान्स या निमित्ताने आठवतो. यावेळी या ग्रुप कडून मजेशीर अशा स्टेप्स केल्या जातात. शेवट मात्र टिपिकल ग्रुप डान्स ने होतो. ज्यात स्टेप्स पेक्षा आनंद घेत घेत डान्स करणं महत्वाचं असतं. जवळपास सवा सहा मिनिटे हा परफॉर्मन्स चालतो. पण यामुळे आपल्या ज्या जुन्या आठवणी जाग्या होतात त्या बराच वेळ टिकतात. अगदी स्वतःच्या कॉलेज जीवनापासून ते या सगळ्या गाण्यांच्या आठवणी सुदधा.

आपल्या मराठी गप्पा टीमला तर हा परफॉर्मन्स भारी आवडला. आपल्यालाही आवडला असेलच. सोबतच आपल्याला आमच्या टीमने लिहिलेला हा लेख ही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा आमचे लेख आवडतात तेव्हा तेव्हा आपण ते शेअर करत असता. तुम्ही केलेला एक एक शेअर आम्हाला प्रोत्साहन देऊन जातो. आपल्यासाठी अजून छान छान विषयांवर लेखन करावं यासाठी हे एक प्रकारे प्रोत्साहन असतं. त्यामुळे यापुढे ही आपलं प्रोत्साहन आम्हाला मिळत राहू दे. आमच्या मराठी गप्पा टीमवर लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *