Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा अफलातून डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा अफलातून डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

सध्याच्या घडीला सोशल मीडियावर जर कोणता ट्रेंड लोकांच्या डोक्यात फिरत असेल तर तो म्हणजे उठसूट कोणत्याही लेटेस्ट गाण्यावर रिल्स करण्याचा. गाणं ‘कच्चा बदाम’ असो मग डिंचाक पुजाचं असो… रिल्स पडणार म्हणजे पडणारच. त्यातही आता डीजे गाण्यांनी घातलेली भर हा एक वेगळाच विषय आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या काही गाण्यांनी सर्वसामान्यांनाच नव्हे, तर बड्या सेलिब्रिटींनाही नाचायला भाग पाडले आहे. आता या गाण्यावर अनेक लोक रिल्स करत असतात. मात्र रिल्स वगैरे सब झूट है, असली मस्ती इधर है, असे सांगणारा एक व्हिडिओ आमच्या समोर आला आहे. या व्हिडीओमुळे ‘सोशल मीडियाच्या जगात’ खऱ्या अर्थाने धुमाकूळ निर्माण झाला आहे. आता तुम्हाला वाटलं असेल हा कॉमेडी व्हिडीओ असेल किंवा एखाद्या सुंदर मुलीचा व्हिडीओ असेल. पण असं काहीही नाही. हा एक भन्नाट ग्रुप डान्सचा व्हिडीओ आहे.

सध्या कॉलेज आणि सार्वजनिक स्थळांवर ग्रुप डान्स खूप प्रसिद्ध होत आहे. नुकतेच एका कॉलेजमध्ये मुला-मुलींनी एकत्र येऊन एक शानदार डान्स केला आहे. हा ग्रुप डान्स आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. तब्बल 34 मिलियन्स विव्ह्ज या व्हायरल व्हिडीओला आहेत.

तर नॉर्मली आता नाचणं म्हटलं की डीजे आलाच. पण इथल्या या ग्रुप डान्स करणाऱ्या पोरां-पोरींनी ठरवलं की, डीजे-बीजे हटाव और पारंपरिक वाद्य लाव… जसे की आपल्याकडे… ढोल-ताशा, संबळ, हलगी असे वाद्य असतात तसेच तिथली पारंपरिक वाद्यांवर यांनी डान्स केला. तर हे मुलं काही डान्स शिकलेले नाहीत, हे आपल्याला त्यांच्या गणपती उत्सव मिरवणूक स्टाईल डान्सवरून लक्षात येतं. या पोरांनी एकदम हटके स्टाईल डान्स केला नसला तरीही मनसोक्त आनंद घेऊन डान्स केला आहे. लोकांच्या टाळ्यासाठी डान्स केला नसून स्वतःच्या समाधानासाठी केला आहे.

तर झालं असं की, एका कॉलेजमध्ये एका मुलीने सर्वात प्रथम डान्स करायला सुरूवात केली, त्यानंतर हळुहळू सर्व मुला-मुलींनी तिला साथ दिली. मग झाला एक कमालीचा ग्रुप डान्स. या मुला-मुलींनी आपल्याला पध्दतीने वेगवेगळ्या स्टाईलने पण एकाच गाण्यावर डान्स केला. या ग्रुप डान्समध्ये साऊथ स्टाईलचा फूल तडका पाहायला मिळतो. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे अगदी आपलं कुणीतरी शूट करत आहे, याकडे त्यांचं लक्षही नाही.

नेटकऱ्यांकडून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील 1 मुलीचा आणि 1 मुलाचा जोडीने केलेला डान्स मात्र कमाल आहे. या व्हायरल व्हिडीओतील पोरांचे लटके आणि झटके पाहून नेटकरी भलतेच खूश झाले आहेत. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.