Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेजच्या शिक्षिकेने संपूर्ण वर्गासमोर केला जबरदस्त डान्स, मॅडमचे एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल

कॉलेजच्या शिक्षिकेने संपूर्ण वर्गासमोर केला जबरदस्त डान्स, मॅडमचे एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल

आपल्या सगळ्यांच्या शाळा कॉलेजमधील आठवणी या तहहयात ताज्या असतात. कारण त्या दिवसांत केलेली मजा, मस्ती, गंमत यांमुळे जे क्षण निर्माण होतात ते आयुष्यभर पुरतात. बरं हे क्षण निर्माण करत असताना व्यवहरिकपणा वगैरे नसतो. असते ती फक्त आयुष्याची मजा घेण्याची उर्मी ! आणि या आपल्या इच्छेला आपल्या मित्रमंडळींच पाठबळ मिळतं आणि ती ‘आपली’ मित्रमंडळी होतात. क्वचितप्रसंगी अस ही होतं की आपल्या शिक्षकांपैकी काही जण ही आपले खास शिक्षक वाटायला लागतात. पण त्यांचं अस खास वाटणं का असतं?

कारण ही मंडळी आपले शिक्षक म्हणून वावरत असली तरी त्यांच्यात आपल्याला एक मितवा सापडलेला वा सापडलेली असतो/ते. त्यामुळे त्यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन ही मिळत राहतं आणि काही प्रसंगी ही मंडळी आपल्यासोबत मजा मस्ती करण्यात ही सामील होतात. अर्थात हे प्रमाण अतिशय कमी असतं. पण जेव्हा शिक्षक आपल्यासोबत मजा मस्ती करायला येतात तेव्हा जी काही धमाल उडते ना की विचारता सोय नाही. अर्थात असे क्षण कधी येतात? बहुधा आपल्या शाळा वा कॉलेजमध्ये एखादा समारंभ असेल तेव्हा ! यावेळी मग गाणी वगैरे असतील किंवा अगदी डान्स स्पर्धा असेल आणि अगदी बाकी काही नसलं तरी स्नेहसंमेलन असेल, फेअरवेल असेल तरी शिक्षकांचा वर उल्लेख केलेला सहभाग आणि सहवास प्राप्त होतो.

आता आज आमच्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घेऊ. हा व्हिडियो बहुधा तामिळनाडू राज्यातील असावा असा अंदाज आहे. पण खात्रीलायक माहिती नाही. असो. पण हा व्हिडियो म्हणजे एका कॉलेज फेअरवेल दरम्यान झालेली घटना आहे. ही घटना म्हणजे त्या कॉलेजच्या शिक्षिकेने केलेला डान्स होय. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षकांचा घोळका एके ठिकाणी दिसून येतो. विद्यार्थी उभे असतात तर शिक्षक हे बाकांवर बसलेले असतात. पण त्यांच्यातील एक शिक्षिका मात्र उभ्या असतात. हे सगळं न्याहाळत असताना आपल्याला गाण्याचे सूर कानी पडतात. ते कानी पडत असताना येथे या शिक्षिका डान्स करताना ही दिसतात. हे गाणं बहुधा त्यांच्या आवडीचं असावं असं वाटून जातं. तसेच त्यांना डान्सची ही आवड असावी हे लक्षात येतं. कारण या ताईंचा डान्स अगदी जबरा डान्स होऊन जातो. आपल्या शिक्षिका आपल्यासोबत मजा म्हणून डान्स करताहेत हे बघून त्या विद्यार्थ्यांना ही आनंद होतो. एक जण तर शेवटी येऊन त्यांच्या सोबत नाचायला लागतो. पण त्या आधी त्यांचा मस्त अशा हावभावांसकट केलेला डान्स आवडून जातो. बरं त्यांना गाणंही पाठ असतं. त्यामुळे त्या गाण्यातील डायलॉग्जही त्या सहजपणे बोलून जातात.

खरं तर आपल्याला गाणं माहिती नसतं आणि ते डायलॉग्ज ही पटकन बोलले जातात. त्यामुळे काही कळत नाही. पण या शिक्षिका ताईंना मात्र हे सगळं गाणं पाठ असतं. त्यामुळे त्यांचं लिपसिंक अगदी चपखल होऊन जातं. त्यामुळे एकंदर परफॉर्मन्सला एक वेगळाच आयाम मिळून जातो. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा, आपलाही दिवस बनून जाईल. आमच्या टीमला ही हा व्हिडियो बघून खूप आनंद झाला होता. म्हणूनच म्हंटलं आपल्या वाचकांना ही याविषयी कळू दे. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे.

आमच्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. या लेखाच्या शेवटी आपल्याला वर उल्लेख केलेला व्हिडियो बघता येईल जेणेकरून आपल्याला ही त्याचा आनंद घेता यावा. तसेच मंडळी आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण त्यामुळे लेख उत्तम होतात. त्यात आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *