Breaking News
Home / मनोरंजन / कॉलेज फेस्टिवलमध्ये ह्या तरुणाने सर्वांसमोर केलेला रोबोटिक्स डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

कॉलेज फेस्टिवलमध्ये ह्या तरुणाने सर्वांसमोर केलेला रोबोटिक्स डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

मराठी गप्पाची टीम ही तरुण, नाविन्याचा ध्यास असलेली पण त्याचवेळी आपल्या परंपरांबद्दल आदर असलेली अशी टीम आहे. त्यामुळे मराठी गप्पाच्या विविध वयोगटातील वाचकांना वैविध्यपूर्ण लेख वाचता यावेत याकडे आमचं लक्ष असतं. तसेच विविध आवडीनिवडी असणाऱ्या वाचकांसाठी सुद्धा आपली टीम विशेष विचार करत असते. यातूनच आपल्या टीमने एक मस्त मनोरंजन करणारा व्हिडियो पाहिला. हा व्हिडियो आहे एका कॉलेज युवकाचा जो एक युट्यु’बर पण आहे. जी.एन.ई. कॉलेज, लुधियाना या कॉलेजचा हा विद्यार्थी. अमन असं त्याचं नाव आणि युट्युबवर तो (Drill Dancer) ड्रिल डान्सर म्हणून लोकप्रिय आहे. त्याने २०१८ साली कॉलेमधील एका फेस्टिवल मध्ये केलेला परफॉर्मन्स युट्यु’बवर खूप लोकप्रिय ठरला होता. आजतागायत १.६ करोड लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे. त्यामुळे या व्हिडियो विषयीचा लेख आपल्याला आवडेल, असं लक्षात घेऊन आजचा हा लेख प्रपंच.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा ड्रिल डान्सर मंचावर आपल्या जागी जाऊन उभा असतो. गाण्याची धून सुरू होते – तुमको पाया है तो जैसे खोया हुं. ओम शांती ओम या चित्रपटातलं हे गाणं. आपला ड्रिल डान्सर अमन हे गाणं रोबोटिक्स या डान्स प्रकारात सादर करतो. त्यात व्हायोलिन वाजवण्याची त्याची स्टेप आपल्याला आणि उपस्थितांनाही आवडते. आता या गाण्यावर आपल्याला पूर्णवेळ डान्स बघायला मिळणार, असं वाटत असताना गाणं बदलतं. लक्ष्य या चित्रपटातील ‘मैं ऐसा क्यूँ हुं’ हे गाणं वाजायला लागतं. मग डोक्यावरची टोपी घेऊन अमन आपल्याला मस्त मस्त स्टेप्स दाखवतो. त्यात त्याने सादर केलेल्या माईम्स प्रकारच्या स्टेप्स भाव खाऊन जातात. तेवढ्यात गाणं पुन्हा बदलतं. यावेळी गॉगल आणि टोपी बाजूला फेकत अमन नवीन गाण्यासाठी तयार होत असतो. गाणं वाजायला लागतं – ‘लैला मैं लैला’.पण डान्स परफॉर्मन्स मध्ये काही विनोदी जागा असतात ना. हे गाणंही या परफॉर्मन्स मध्ये तीच भूमिका बजावतं. पूढे गाणं येतं ते ‘मैं हुं ना’ चित्रपटातलं सुप्रसिद्ध गाणं.

या गाण्यात अमन ने केलेली पैंजण वाजण्याची स्टेप अगदी कमाल. कौतुकास्पद. मग येते पाळी ती बॉलिवूड सुपर डुपरस्टार सलमान खान यांच्या वर चित्रित झालेल्या गाण्याची. अपेक्षेप्रमाणे ह्या गाण्यातही अमन a.k.a.ड्रिल डान्सर भाव खाऊन जातो. त्यातही एक विशेष स्टेप असतेच. पण परफॉर्मन्स होतोय लुधियाना इथे. मग यात भांगडा नसणार का? शक्यच नाही. पण म्हणतात ना, परफॉर्मन्स मधील जे महत्वाचं असतं ते सगळ्यात शेवटच्या क्षणांसाठी राखून ठेवलेलं असतं. या डान्स परफॉर्मन्स चा भांगाड्याने जो शेवट होतो तो काही औरच. शेवटी पंजाबच्या, मातीतला डान्स आहे तो. त्यामुळे एकंदर मनोरंजक ठरलेला हा परफॉर्मन्स संपताना सुद्धा तेवढाच चांगला आणि आपलासा वाटतो. तसेच प्रत्येक गाण्यातील विशेष जागा शोधून त्याला विशेष स्टेप्स ने अधोरेखित करण्याची त्याची युक्ती ही आवडते. एकूणच पाच मिनिटांचा हा व्हिडियो मनोरंजक ठरतो. या डान्स परफॉर्मन्स ने आपल्याला आनंद देणाऱ्या या ड्रिल डान्सरला मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवर्जून वाचा. कारण तुम्हाला डोळ्यासमोर ठेऊन आपली टीम विषय निवडत असते आणि लेखन करत असते. त्यामुळे तुम्ही लेख शेअर करता तेव्हा एकप्रकारे आम्हाला प्रोत्साहन देत असता असं आम्ही समजतो. या पुढेही आपला पाठिंबा आणि प्रोत्साहन असंच मिळत राहू दे ही इच्छा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.