प्रिया पुनिया भारतीय महिला क्रिकेट संघातील अप्रतिम खेळाडू आहे. खूपच कमी वेळात प्रियाने आपल्या खेळातील कामगिरीने लाखों चाहत्यांच्या मनात आपली एक खास ओळख बनवली आहे. परंतु तुम्हांला माहिती आहे का कि भारतीय क्रिकेटर प्रिया पुनिया आपल्या खेळासोबतच आपल्या सौंदर्यतेबद्दल सुद्धा लोकांमध्ये चर्चेत राहत असते. जेव्हा पासून प्रिया पुनियाने भारतीय क्रिकेट संघात पाऊल ठेवले आहे, तेव्हापासूनच आपल्या सुंदरतेद्वारा ती लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे. प्रिया अनेकदा आपले सुंदर फोटोज सोशिअल मीडियावर पोस्ट करत असते, जे फॅन्स ना खूप आवडतात. भलेही प्रिया खेळादरम्यान खूपच सिम्पल लूक मध्ये दिसून येत असेल परंतु जर तुम्ही प्रियाला कोणत्या पार्टी किंवा इव्हेंट मध्ये पाहाल तर तिला ओळखू शकणार नाहीत. खेळाच्या मैदानात खूपच सिम्पल वाटणारी प्रिया मेकअप केल्यानंतर कोणत्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही.
जर तुम्हांला विश्वास होत नसेल, तर तुम्ही स्वतःच प्रिया पुनियाचे सुंदर आणि दिलखेचक लूक पाहू शकता. ह्या फोटोंना पाहिल्यानंतर तुम्हांला स्वतः प्रियाच्या सुंदरतेचे प्रमाण मिळेल. ह्या दोन्ही फोटोत प्रिया ग्लॅमरस आणि सुंदर दिसून येत आहे. प्रिया भरतीय महिला क्रिकेट संघात एक फलंदाज (बॅट्समन) म्हणून खेळते. प्रियाच्या सुंदर आणि ग्लॅमरस लूकचे लाखों चाहते आहेत. प्रियाने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत ५ एकदिवसीय (ODI) सामने खेळले आहेत. ह्या सामन्यांमध्ये प्रियाने ४३.८ च्या सरासरीने १७५ धावा केल्या आहेत. ९ ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रियाने साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध एकदिवसीय करियरमध्ये आपला सामना खेळला होता. तर टी-ट्वेन्टी मध्ये मागच्या वर्षी ६ फेब्रुवारी २०१९ मध्ये न्यूझीलॅंड विरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. प्रियाचा जन्म ६ ऑगस्ट १९९६ मध्ये जनाऊ खारी ह्या गावी झाला होता. प्रियाच्या वडिलांचे नाव सुरेंद्र पुनिया आहे. प्रियाचे वडील सरकारी नोकरीत कार्यरत होते ज्यामुळे त्यांची पोस्टिंग वेगवेगळ्या जागी होत असायची.
ट्रान्स्फर च्या कारणामुळे अजमेर, जयपूर आणि दिल्ली ह्यासारख्या ठिकाणी प्रियाच्या वडिलांची पोस्टिंग झाल्या होत्या. दिल्लीमधूनच प्रियाने आपली ग्रॅज्युएशनची डिग्री पूर्ण केली. आजच्या काळात प्रिया राष्ट्रीय महिला संघाकडून क्रिकेट खेळत आहे. सर्वात मुख्य गोष्ट हि आहे कि ती मागील दहा वर्षांपासून प्रिया एक ओपनिंग गोलंदाज (बॉलर) च्या रूपात मैदानात उतरत होती. प्रिया पुनिया एक सुंदर उंजव्या हाताची (राईड हॅन्ड) फलंदाज आहे. मागील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये झालेल्या सिनियर वुमन वनडे चॅम्पिअनशिप मध्ये प्रियाने आठ सामन्यात दोन शतकाच्या जोरावर ४०७ धावा केल्या होत्या. हि चॅम्पिअनशिप बंगलोर मध्ये खेळली गेली होती. ह्या चॅम्पियनशिप मध्ये प्रियाला बेस्ट तीन खेळाडूंमध्ये जागा मिळाली. ह्याच प्रदर्शनामुळे ह्या तिला ह्या वर्षीच्या सुरुवातीला न्यूझीलँडच्या दौऱ्यासाठी सिलेक्ट केले होते.