जगात आजकाल लोकं लोकप्रिय होण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. मग ते अश्या प्रकारच्यासुद्धा करामती करतात ज्यामुळे आपला जीव सुद्धा जाईल हे माहिती असून सुद्धा घाबरत नाहीत. जगात असे खूपच कमी लोक असतील ज्यांना सापांपासून भीती वाटत नसेल. सापाचे नाव ऐकल्यावर भल्या भल्या लोकांची बोबडी वळते. सापांना जगातील सर्वात खतरनाक जीवांपैकी एक मानलं जातं. जगभरात सापांच्या २ हजार पेक्षा सुद्धा अधिक प्रजाती आहेत, परंतु सर्वच साप विषारी नसतात. परंतु काही साप खूपच विषारी असतात. असे साप जर कोण्या माणसाला चावले तर त्यांचा जीव वाचणं खूप कठीण होऊन बसतं. ह्यामध्ये कोब्रा सारख्या विषारी सापांचा समावेश होतो. ह्या सापांना चुकूनसुद्धा कमी लेखण्याची चूक करू नका. नाहीतर ते तुमच्या जीवावर बेतु शकतं.
सोशल मीडियावर आजकाल एक असा व्हिडीओ वायरल होत आहे, ज्यात कोब्रा सोबत मस्करी करणं एका व्यक्तीला खूपच महागात पडलं. आश्चर्याची गोष्ट अशी कि ह्या व्यक्तीने हुशारी दाखवत विषारी कोब्राचे चुंबन घ्यायचे ठरवले. परंतु त्याला ह्या गोष्टीचा जरा सुद्धा अंदाज नव्हता कि त्याची हि हुशारी त्यालाच महागात पडेल आणि त्याला हॉस्पिटल मध्ये जावे लागेल. ह्या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता कि, त्या व्यक्तीने आपल्या हाताने कोब्राला पकडलं आहे आणि त्याचे मागून चुंबन घेण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याच दरम्यान अचानक कोब्रा मागे फिरतो आणि त्याचा चावा घेतो. ह्यानंतर लगेच तो व्यक्ती कोब्राला सोडून देतो.
ह्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांनी कोब्राला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु भीतीमुळे कोणी त्याला पकडलं नाही. अश्यातच कोब्रा तिथून पळून जातो. मीडिया सुत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार हि घटना कर्नाटक येथील शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती येथील बोम्मनकट्टे ह्या गावातील आहे. हि घटना काही दिवसांपूर्वीची असून ज्या व्यक्तीला सापाने चावलं आहे तो सर्पमित्र असून तो घरात, परिसरात घुसलेल्या सापांना पकडून त्यांना जंगलात सोडून देतो. परंतु ह्यावेळी तोच सापांचा शिकार झाला. ह्या घटनेनंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले. सध्या त्याची प्रकृती ठीक असून त्याला हॉस्पिटल मधून सोडण्यात आले आहेत. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा ह्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला. तुम्ही सुद्धा सतर्क राहा आणि कोणत्याही प्राण्यांसोबत अश्याप्रकारचे कृत्य करू नका, कारण तुमची अशाप्रकारची मस्ती तुमच्यासाठीच जीवघेणी ठरू शकते.
बघा व्हिडीओ :