Breaking News
Home / जरा हटके / कोब्राला पकडत असताना सर्पमित्राचा तोल गेला आणि कोब्रा हल्ला करणारच इतक्यात बघा पुढे काय घडलं ते

कोब्राला पकडत असताना सर्पमित्राचा तोल गेला आणि कोब्रा हल्ला करणारच इतक्यात बघा पुढे काय घडलं ते

वरचं हेडिंग बघून आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो कसा असेल याची आपल्याला कल्पना आली असेलच. वर उल्लेख केलेला शब्दन शब्द खरा ठरेल अशी एक घटना व्हिडियोत कैद झाली आणि तो व्हिडियो आज आपल्या टीमने पाहिला. त्यातील थरार इतका श्वास रोखून धरणारा होता की त्याविषयी आपल्या वाचकांना कळायला हवं असं पहिल्याच फटक्यात वाटलं आणि हा लेख लिहिला जातो आहे.

सदर घटना ही मट्टीगट्टा या तामिळनाडू राज्यातील गावात घडते. यावर्षीच्या जानेवारी महिन्यातली ही घटना. या गावात प्रभाकर नामक एक व्यक्ती सर्पमित्र म्हणून कार्यरत असतात. त्यांना एके दिवशी एक कॉल येतो आणि एका नदीजवळ एक मोठ्ठाला साप आढळून आल्याचं सांगण्यात येतं. कॉल आल्याबरोबर प्रभाकर घटनास्थळी पोहोचतात. सोबत एक मित्र आणि सहकारी असतो. सोबत साप पकडण्यासाठी आयुधं ही असतातच. ते घटनास्थळी पोहोचतात आणि साप पकडण्यासाठी जातात तेव्हापासून पुढील घटना आपण व्हिडियोत पाहू शकतो. प्रभाकर कॅमेरामनला एका सुरक्षित जागी उभं राहायला सांगतात हे आपण पाहतो.

कारण सरळच असतं. कारण समोरच एक साप पाण्यात पहुडलेला दिसत असतो. बरं असा तसा साप नाही. जगात ज्याची ख्याती आणि भीती वाटते असा हा किंग कोब्रा प्रकारातील साप असतो. म्हणजेच पाण्यावर जो त्याच्या शरीराचा भाग दिसत असतो त्यापेक्षा हा खूप मोठा साप असणार हे कळून येतं. एव्हाना प्रभाकर त्या सापाच्या काहीसे जवळ पोहोचलेले असतात. जवळच एक भलं मोठं झाड उन्मळून पडलेलं असतं. प्रभाकर त्यावर व्यवस्थित उभे राहतात. त्यांच्या हातात साप पकडण्यासाठी चिमटा ही असतोच. आता आपण पडणार नाही याची खात्री झाल्यावर हातातील चिमट्याने ते सापाच तोंड पकडतात. एक कामगिरी पार पडलेली असते. पुढची कामगिरी म्हणजे त्या सापाला व्यवस्थित उचलून जंगलात दूर नेणं. पण आज मात्र नियतीने जणू प्रभाकर यांची परीक्षा बघायचं ठरवलेलं असतं. त्या पडलेल्या झाडाच्या मुळांच्या जंजाळातून त्या किंग कोब्राला बाहेर काढताना केवळ क्षणभर प्रभाकर यांची पकड सैल होते. त्या केवळ एका क्षणात जगातला हा सगळ्यात विषारी सर्प उचल खातो.

प्रभाकर आपल्यापरीने त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. पण तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडत त्यांच्या जवळ पोहोचतो. आता ते स्वतःला वाचवायला जात असतात तर तो त्यांना चावायला पुढे सरसावत असतो. एका क्षणी तो यशस्वी होतो की काय असं वाटून जातं. कारण त्याचा जबडा त्यांच्या पायापर्यंत पोहोचलेला असतो. पण तसं होत नाही. त्या क्षणी ते त्याला हाताने दूर लोटण्याचा प्रयत्न करतात. साप मागे फिरतो तो परतण्यासाठी. या धांदलीत ते खाली पडतात. एक पाय चिखलात आणि अर्ध शरीर त्या झाडावर अशी त्यांची अवस्था असते आणि समोर जणू सर्परूपात काळच उभा असतो. एक वेळ अशी येते की हे दोघे समोरासमोर येतात. हे सगळं अगदी काही क्षणात घडत असतं. हे लिहायला जेवढा वेळ लागतो आहे त्याच्यापेक्षा कमी वेळात हे सगळं घडतं. पण प्रभाकर यांची आणि त्यांच्या सहकाऱ्याची चपळाई कामाला येते. ते त्या प्राणघातक कोब्राच्या फण्याला पकडण्यात यशस्वी होतात. बरं हे होत असताना काही क्षणांसाठी प्रभाकर आणि कोब्रा हे काही क्षणांसाठी दृष्टीआड होतात आणि आपल्याला केवळ प्रभाकर यांचा सहकारी दिसत असतो. त्यामुळे त्यांना काही दुखापत वगैरे झाली आहे का काय हे कळत नाही.

पण त्याच्या फण्याला पकडण्यात यश मिळाल्यावर मात्र प्रभाकर आणि त्यांचा सहकारी हे उभे रहातात. प्रभाकर यांच्या पॅन्टचा एक भाग चिखलाने माखलेला असतो. बाकीची पॅन्ट आणि शर्ट सुद्धा खराब झालेला असतो. पण त्याची पर्वा कोणालाच नसते. सगळ्यांना प्रभाकर व्यवस्थित आहेत का हे पाहायचं असतं. सुदैवाने ते व्यवस्थित असतात. त्यांच्या सोबत असलेला त्यांचा सहकारी आता बाकीची हालचाल करत असतो आणि ते एके ठिकाणी उभे असतात. कॅमेरामन त्यांच्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातच हा थरारक असा व्हिडियो संपतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा व्हिडियो. व्हिडियोसोबत आलेल्या माहितीच्या आधारे असं कळतं की पूढे प्रभाकर त्या सर्पराजाला जंगलात दूर सोडण्यात यशस्वी होतात हे कळतं. त्यामुळे ज्या साठी केला होता अट्टाहास तो कार्यभाग येथे साधला गेला हे कळून येतं आणि बरं वाटतं. तसेच कौतुक करावंसं वाटतं ते प्रभाकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं. सर्पमित्र म्हणून काम करणं हे तसंही जिकरीचे आहे. पण अशा घटना बघितल्या की त्यातील जोखीम कळून येते आणि नकळत आपण प्रभाकर आणि त्यांच्या सारख्या प्रत्येक सर्पमित्रांना नमन करतो.

आपण हा व्हिडियो बघितला असल्यास त्यावरील हा लेख आपल्याला आवडला असावा. आपली टीम नेहमीच विविध वाचकप्रिय विषयांवर लेखन करत असते आणि यापुढेही करत राहील हे नक्की. या सगळ्यांत आम्हाला आपलं प्रोत्साहन अपेक्षित आहे आणि जे आम्हाला मोठ्याप्रमाणात मिळतं ही आहे. हेच प्रेम, प्रोत्साहन आणि पाठिंबा येत्या काळातही मिळत राहील हे नक्की. आपला स्नेहबंध अजून दृढ होत राहू दे ही सदिच्छा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.