सोशल मीडियावर सध्या पुराचे आणि कॉमेडी असणारे व्हिडीओ जोरदारपणे व्हायरल होत आहेत. त्यासोबतच काही पावसाळ्यात जमलेल्या लग्नाचे, लग्नाच्या गमती-जमतीचे तर काही प्राण्यांचेही व्हिडीओ व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत. हे प्राणी पावसाने साचलेल्या पाण्यामुळे बिळाच्या बाहेर आलेले आहेत आणि आता माणसांचे सोशल मीडिया मार्केट प्राण्यांनी काबीज केले असल्याने त्यांचे व्हिडीओ जास्तच व्हायरल होत आहेत. खरं तर सोशल मीडियावर अतिशय मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ तर असे असतात जे पाहून हसू आवरणं कठीण होतं. आपल्या सर्वांना प्राण्यांचेही अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय भीतीदायक तर काही गमतीदार असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. फक्त अतरंगी माणसांचेच नाही तर अतरंगी प्राण्यांचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात.
कधी जंगलातले प्राणी असतात तर कधी घरचे पाळीव. या सगळ्यातुन एकच निष्कर्ष निघतो, ते म्हणजे सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होऊ शकतं. प्राण्यांचे व्हिडीओ आवर्जून बघणारे अनेक लोक आहेत. या प्राण्यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये काहीवेळा दोन प्राण्यांची हाणामारी असते. तर काही व्हिडीओमध्ये एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असल्याचं आपण पाहिलं असेल. प्राण्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला तर त्या व्हिडीओमध्ये काय आहे, हे त्या प्राण्यावर ठरते. म्हणजे वाघ, सिंह असेल तर नक्कीच शिकारीची व्हिडीओ असतो. कुत्र्याचा असेल तर कधी गमतीदार तर कधी प्रामाणिकपणा दाखवणारा व्हिडीओ असतो. आणि माकड असेल तर 100 नाही 101% धमाल उडवणारा व्हिडीओ असतो. मुंगूस किंवा साप असेल तर दुष्मनीचा व्हिडीओ असतो. असाच एक व्हिडिओ आमच्यासमोर आला आहे. हा व्हिडीओ एका शाळेत असणाऱ्या शिक्षकाने शूट केला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्याला मुंगूस आणि सापाची झटापट दिसून आहे.
तर झालं असं की, शाळेतील पोरांना दुपारी जेवणाची सुट्टी मिळाली, पोरं गेटसमोर आली तर त्यांनी पाहिलं की, नाग आणि मुंगूस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आणि बघता बघता अख्खी शाळा ही फाईट बघायला गोळा झाली. रस्त्याच्या मधोमध जबरदस्त जातीच्या सापाची आणि मुंगूस यांच्यात झुंज सुरु झाली. या लढाईतील मुंगुस तसं लहान दिसत होतं आणि नाग मात्र चांगलाच ताकदवान वाटत होता. अशी विषम वाटणाऱ्या लढाईतही मुंगसाने नागाला जेरीस आणलं. साप आणि मुंगसाच्या लढाईचा हा प्रकार एका शिक्षकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात काढला. आणि त्यांच्या लढाईचा हा विडिओ व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या लढाईत शेवटी कोण जिंकलं, हे तुम्हीच पहा.
हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :